उभारी देणारे असे काही

Submitted by बावरा मन on 23 February, 2014 - 00:42

struggle शब्दाचा एक लोचा आहे . आपल्याकडे हा शब्द आर्टस ला admission घेणाऱ्या , नाटक -चित्रपट क्षेत्रात career करू इच्छिणार्यां आणि दहा ते पाच ची चाकोरी सोडून वेगळी वाट चोखाळणार्या लोकाना उद्देशुन वापरला जातो . मुळात मला अस वाटत की प्रत्येकजण हा त्याच्या / तिच्या पातळीवर एक struggle करतच असतो. म्हणजे बापाशी बिघडलेले संबंध पुर्ववत करण्यासाठी धडपडणारा पोरगा हा एक struggle च करत असतो . नौकरी मध्ये बॉस आपली ठासत आहे हे कळत असून पण नौकरी टिकवण्यासाठी धडपड करणारा मध्यमवर्गीय माणूस पण रोज संघर्ष करीतच असतो. पण कधी कधी हा संघर्ष खुप लांबतो . इतका लांबतो की आता याला शेवटच नाही अस वाटायला लागत . खुप लोक अशावेळेस Give Up करतात . आणि आयुष्यभर 'काश …' च मधुन टोचणी देणार फिलिंग घेऊन जगतात . काहि लोक मात्र याला अपवाद असतात . ते टिकून राहतात , लढतात आणि जिंकतात पण . अशीच एक हृदयस्पर्शी संघर्षाची कथा आहे आंग ली ची . इंग्रजी चित्रपट पाहणाऱ्या लोकांसाठी हे नाव अपरिचित नाही . Brokeback Mountain , नुकताच येउन गेलेला आणि गाजलेला life of pie असे अनेक चित्रपट आंग ली ने दिग्दर्शित केले आहेत . आज जगातल्या आघाडीच्या दिग्दर्शकांमध्ये त्याचा समावेश होतो . पण इथपर्यंत मजल मारण्यासाठी त्याने जो भावनिक , आर्थिक संघर्ष केला त्याची हि कुठलाही आव न आणणारी , melodramatic नसणारी पण हृदयस्पर्शी कहाणी त्याच्याच शब्दात :

१९७८ मध्ये मी Illinois University मध्ये चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेण्याचा निर्णय पक्का केला . माझ्या वडिलांचा या माझ्या निर्णयाला तीव्र विरोध होता . त्यांनी माझ्या तोंडावर काही आकडेवारी फेकून मारली .: ' दरवर्षी तुझ्यासारखे ५०००० लोक हे असल कुचकामी शिक्षण घेऊन कॉलेज च्या बाहेर पडतात आणि त्यांच्यासाठी नौकर्या किती असतात , तर फ़क़्त २००. ' तरी त्यांचा हा सल्ला ठोकरून मी अमेरिकेला जाणाऱ्या विमानात बसलो . पण त्यामुळे पिता - पुत्राच्या नात्याला कधीही न भरून येणारा तडा गेला . पुढच्या दोन दशकात आम्ही शंभरहून कमी वाक्य एकमेकांशी बोललो असू .

पण जेंव्हा मी माझ शिक्षण संपवून बाहेर पडलो तेंव्हा माझ्या वडिलांनी व्यक्त केलेली भीती किती खरी होती हे मला पदोपदी जाणवायला लागल . एक चिनी वंशाचा माणूस hollywood मध्ये काहीतरी करून दाखवेल असे कुणालापण वाटत नव्हत . कॉलेज मधून बाहेर पडल्यानंतरची पुढची सहा वर्ष हि कधीही संपणार नाही असे वाटणाऱ्या अनिश्चिततेने भरलेली होती . या सहा वर्षांमधला बहुतांश वेळ मी अनेक दिग्दर्शक व संकलक यांचा सहायक म्हणून छोटी मोठी किरकोळ काम करण्यात व्यतीत केला . सगळ्यात वेदनादायक भाग हा मी लिहिलेलं स्क्रिप्ट घेऊन निर्मात्यांचे उंबरठे झिजवणे हा होता . त्याकाळात मला साधारणतः ३० निर्मात्यांकडून नकार मिळाला .

त्याच वर्षी मी ३० वर्षाचा झालो . एक जुनी चीनी म्हण आहे : तिशीत माणूस त्याच्या स्वतःच्या पायावर ठाम उभा असतो अशा अर्थाची . पण मी तर अजूनही धड स्वतःच्या प्राथमिक गरजा पूर्ण करू शकत नव्हतो . या अशा पडत्या काळात माझ्यासमोर फार कमी पर्याय शिल्लक होते . एक तर काही घडेपर्यंत वाट बघत बसायचं अथवा चित्रपट बनवण्याचं माझ स्वप्न सोडून द्याच .

या अनिश्चिततेच्या अंधाराने भरलेल्या काळात मला माझ्या बायकोने पाठबळ दिल . तिने तिची पदवी जीवशास्त्र या विषयातून घेतली होती आणि ती एका प्रयोगशाळेत नौकरी करत होती . पण तिच्या नौकरी मधून मिळणारे उत्पन्न आम्हाला पुरेल एवढे नव्हते . त्याचकाळात आम्हाला एक पुत्ररत्न झाले आणि आमच्या जबाबदाऱ्या अजून वाढल्या . घरात मी पैसे आणू शकत नाही या अपराधी भावनेतून मी घरकामांची जबाबदारी घ्यायला सुरुवात केली . जेंव्हा बायको कामावर जायची तेंव्हा मी स्वयंपाक , साफसफाई आणि आमच्या मुलाच संगोपन अशी काम करत असे . फावल्या वेळात वाचन आणि संहिता लेखन चालूच होते . रात्रीच जेवण बनवून झाल की मी आमच्या मुलाला , घेऊन घरासमोरच्या पायऱ्यांवर बसून राही . मी माझ्या बायकोची आणि तो त्याच्या आईची वाट बघत .

हे असल आयुष्य कुठल्याही पुरुषासाठी मानहानीकारक च . माझ्या सासू सासर्याना हे डाचत असाव . त्यांनी माझ्या बायको ला काही पैसे देऊ केले . त्यांच्या मते मी या भांडवलातून एखाद चायनीज हॉटेल सुरु कराव जेणेकरून माझ स्वतःच काही उत्पन्न सुरु होईल . माझ्या बायकोने हे पैसे घ्यायला इन्कार केला . जेंव्हा मला याबद्दल कळल तेंव्हा मी सुन्न झालो . अनेक रात्री जागून काढल्यावर शेवटी मी निर्णयाप्रत आलो : माझ चित्रपट बनवण्याचं स्वप्न हे पूर्ण होणार नाही . सत्याला सामोरे जाण्याची वेळ आली आहे

जड अंतकरणाने मी जवळच्या एका कॉलेज मध्ये मी Computer Course ला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला . हा निर्णय घेतल्यावर मी निराशेच्या गर्तेत बुडून गेलो . माझ्या बायको ला हा माझ्या स्वभावातला फरक जाणवला . Computer Class च वेळापत्रक तिने माझ्या bag मध्ये पाहिलं . त्या रात्री ती काहीच बोलली नाही .

दुसऱ्या दिवशी ती तिच्या कामाला जायला निघाली . मी सुन्न पणे बसून होतो . ती घराबाहेर पडली . पण अचानक तिच्या मनात काय आल कुणास ठाऊक . घराबाहेरच्या पायऱ्यांवर असताना ती पुन्हा वळली आणि एवढच म्हणाली , "आंग , तुझ्या स्वप्नांचा विसर पडू देऊ नकोस ." तिच्या या एका वाक्याने जादूची कांडी फिरली . निराशेच्या गर्तेत गटांगळ्या खाणार माझ स्वप्न पुन्हा जिवंत झाल . त्याचा पुनर्जन्म झाला .

मी ते computer class च वेळापत्रक bag मधून बाहेर काढल . त्याचे हळूहळू बारीक बारीक तुकडे केले आणि कचऱ्याच्या डब्यात ते फेकून दिले .

अर्थातच एका रात्रीत परिस्थिती बदलली नाही . पण काही दिवसांनी मला माझ्या स्क्रिप्ट साठी finance मिळाला . मी माझ्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली . नंतर माझ्या कामाला काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार पण मिळाले . नंतर माझ्या बायको ने माझ्याशी बोलताना कबुली दिली ,' मला नेहमीच असा विश्वास होता कि तुझा जन्म हा चित्रपट बनवण्यासाठी च झाला आहे . संगणक क्षेत्रात आधीच खुप लोक काम करत आहेत आणि त्यांना तुझी गरज पण नव्हती ."

(http://whatshihsaid.com/2013/02/26/ang-lee-a-never-ending-dream/) मुळ लेख इथे आहे .

स्वप्नांना वयाची , लिंगाची , धर्माची बंधन कधीच नसतात . त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी कुठल्याही मुहूर्ताची गरज नसते . आंग लि ने २०१३ मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा Oscar पुरस्कार जिंकला . तुमच स्वप्न काय आहे ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>+९९

छान!