इच्छा आहे तिथे रस्ता आहे

Submitted by जयदीप. on 22 February, 2014 - 01:25

त्यांचे आपापले धोरण आहे
काच कुणी अन् कुणी दर्पण आहे

'घेण्या'वरती तसे असते सारे
स्वच्छंद कुणी, कुणा दडपण आहे

इच्छा आहे तिथे रस्ता आहे
इच्छा नाही तिथे कारण आहे

सगळ्यांशीच पटते आहे माझे
माझे माझ्यामधे का 'रण' आहे?

नाही आहे मला माझी चिंता
माझ्यावरती तुझी राखण आहे..

रोज बहरतो तुझा प्राजक्त अता
आठवणींचे जिथे अंगण आहे!

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इच्छा आहे तिथे रस्ता आहे
इच्छा नाही तिथे कारण आहे

बढिया.
एखादे सोपे वृत्त निवडल्यास बरे होईल.
प्रत्येक लगावली लय देते असे नाही.

"इच्छा आहे तिथे रस्ता आहे
इच्छा नाही तिथे कारण आहे" हा सर्वात विशेष वाटला. त्यातही "इच्छा नाही तिथे कारण आहे" हा मिसरा अधिक.

सर्वांचे आभार. इच्छा चा शेर पहिले सुचल्यामुळे त्याच लगावलीत गजल झाली..

प्रत्येक लगावली लय पकडत नाही +१

Happy