राजीव गांधींच्या मारेकर्‍यांना मोकळे का केले?

Submitted by चौकट राजा on 19 February, 2014 - 09:50

काल तामिळनाडूच्या मंत्रिमंडळाची तातडीची बैठक झाली व त्यात राजीव गांधींच्या सातही मारेकर्‍यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची बातमी आत्ताच वाचली आणि मनात काही प्रश्न उपस्थित झाले.

१. आपल्या देशाच्या पंतप्रधानाच्या मारेकर्‍यांना असे मोकळे सोडणे उचित वाटते का?
२. त्यातील ३ आरोपींच्या दयेच्या अर्जावर गेली ११ वर्षे केंद्राने काहीच निकाल दिला नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली. केंद्राने एवढा उशीर लावण्यामागे काय कारणे आहेत / असतील?
३. हाच न्याय तामिळनाडू सरकारने बाकी ४ जणांना का लागू केला नाही?
४. हे जयललीता सरकारने फक्त लोकानुययासाठी केले असे वाटते का? एवढे उथळ राजकारण असेल ह्यावर विश्वास बसत नाही.
५. पंतप्रधानाच्या मारेकर्‍यांना सोडून लोकांमधे (तामिळनाडूच्या व इतर देशाच्या) नक्कि काय संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे?

मला त्या भागातील राजकारणाची फारशी माहिती नाही. त्यामुळे ह्याबद्दल काही स्थानिक संदर्भ असतील तर जरूर सांगा.

टीप - मी काँग्रेसचा समर्थक नाही. पण राजीव गांधी दुसर्‍या कोणत्याही राजकिय पक्षाचे असते तरीही मी हाच प्रश्न उपस्थित केला असता. तेव्हा कृपया वर दिलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने चर्चा करा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुब्रमन्यम स्वामीची ची लुंगी भाजपा सांभाळत आहे

ज्याने वाजपेयींचे सरकार पाडलेले.. Biggrin

कुणाला सांगत आहेत ..

आणि द्रमुक वर आरोप होता जो नंतर चुकिचा निघालेला...

ज्या पक्षाच्या नेत्याची हत्या झाली, त्या पक्षालाच त्याच काहीही सोयर सुतक नाही,
तर आपण कशाला त्याच्यासाठी अश्रू ढळत बसायचं.>>>>>>>>

ईथे तो नेता कोणत्या पक्षाचा आहे हा प्रश्न येत नाही. तो माणूस देशाचा पन्तप्रधान होता.. आणि त्याला मारण्याची हिमन्त होउ शकते ही भयकर गोष्ट आहे आणि फक्त राजकीय फायद्यासाठी त्याच्या मारेकरर्याला सरकार मोकळ सोड्त असेल तर ते कणाहीन सरकार आहे आणि ही गोष्ट अत्यत घातक आहे आपल्या देशासाठी ,,,,,,,, उद्या हे स्वताच्या फायद्यासाठी देशाला विकतील.........

सोनिया गांधी, त्याचं मंत्री मंडळ आणि महाराष्ट्र कन्या(?) काय करत होत्या एव्हढी वर्ष.
का नाही अर्ज फेटाळला गेला.

सोनिया गांधी, त्याचं मंत्री मंडळ आणि महाराष्ट्र कन्या(?) काय करत होत्या एव्हढी वर्ष.
का नाही अर्ज फेटाळला गेला.>>>>>>>>>>>>>हेच तर राजकारण आहे ना मतान्च...... त्याना तामिळ मते हवी आहेत खुर्ची टिकवायला

माझा प्रश्न हा आहे की ज्या कोण त्या बाया असतील नाहीतर बुवा असतील तेथे, त्याना जन्मठेप कशाला दिली? फाशी का नाही? ह्यानी ( म्हणजे त्या अतीरेक्या बायका वगैरे) राजीव गान्धी आणी त्या बरोबरचे निरपराध लोक ( राजीव गान्धीनी श्रीलन्केत सेना पाठवली म्हणून त्याचा बदला घेतला, असे या तामिळ अतीरेक्यान्चे म्हणणे आहे. खरे खोटे तेच जाणो) मारलीच ना? मारताना विचार केला का? नाही ना? मग बात खतम. त्याना फाशीच योग्य होती, बास! विषय सम्पला. ( हायला आपला देश कधी सुधारणार काय माहीत?)

लक्ष्मी गोडबोले तुमच्या प्रश्नाला उत्तरः- असे म्हणतात की राजीव गान्धीना मारणारे हात तामिळ अतिरेक्याचे होते, पण मास्टर माईण्ड अमेरीका आहे.( असु पण शकते, त्याना स्वतच्या अध्यक्षाला, केनेडीना मारताना लाज वाटली नाही, तर इतर लोकाना मारताना कसली आलीय लाज?)

एक प्रश्न .....इन्दिरा गान्धीच्या हत्येमागे अमेरिकेचा हात (होता.) असू शकेल, कारण तिच्यात तेवढी capacity होती अमेरिकेला चिन्ता वाटेल इतकी........राजीव गान्धीनी कशाला अमेरिका मारेल?????

याचे उत्तर सखोल आहे. इन्दिरा गान्धीना मारण्याचे अमेरीकेला काहीच् कारण नव्हते. कारण इन्दिरा गान्धीन्मुळे अमेरीकेच्या आर्थिक सत्तेला हादरा बसला नव्हता.:स्मित:

बाकी प्रभाकरन वगैरे वरवरची मन्डळी होती.

जयललिता यांनी घेतलेला निर्णय अतिशय दुर्दैवी आहे यात शंकाच नाही.

गेल्या एका वर्षात केंद्राच्या आंतरराष्ट्रीय भूमिकेला (जी देशाच्या दृष्टीने बरोबर होती) राज्यांनी सरळसरळ विरोध करण्याचे प्रकार सतत घडत आहेत. जसे की, ममतादीदीने बांगला देशा बरोबर पाणी करारास केलेला विरोध, अफझल गुरू संदर्भात अब्दुल्ला यांनी केलेली विधाने आणि तामिळी राजकारणामुळे श्रीलंके बरोबर ताणलेले संबंध, इत्यादी.

जोपर्यंत कमजोर सरकार केंद्रात आहे तो पर्यंत राज्यांची मुजोरी वाढत रहाणार हे नक्की. ही परिस्थिती लवकर बदलेल अशी लक्षणे दिसत नाहीत. राज्यकर्त्यांम्धे शहाणपण येईल अशी आशा व्यक्त करण्याशिवाय आपण काय करणार. केजरीवाल हे उत्तर नाही.

केजरीवाल हे उत्तर नाही.>>>>>>>>+१....... गाढवापुढे वाचली गीता आधीचा गोन्धळ बरा होता अशी स्थिती आहे सध्या दिल्लीत

मायबोलिकरान्ना ते कसे माहित असेल?

आँ??!!! अहो असे कसे म्हणता? कम्मालच आहे तुमची. कालच आलात का मायबोलीवर?

"मायबोलीकर" ह एक जबरदस्त शब्द आहे. त्याला अनेक अर्थ आहेत.

वरील वाक्यातील "ते" म्हणजे काय वाट्टेल ते असले, जसे कायदा, न्याय, घटना, राजकारण, समाज सर्व धर्म, सर्व आजी व माजी व्यक्तीं.

दररोज सकाळ संध्याकाळ त्यांना सर्व अधिकृत माहिती पुरवल्या जाते. . त्यावर अत्यंत "विचारपूर्वक" (:खिकः) मते बनवून ते इथे लिहीतात. बरेचदा कुणा व्यक्तीचे मत काय आहे हे खुद्द त्या व्यक्तीला माहित नसते, पण यांना माहित असते, असे ते आपल्याला सांगतात!

तेंव्हा असे बालिश प्रश्न तुम्ही काय उपहासाने विचारता का?

मला वाटले फक्त मीच इथे सगळे उपहासात्मक लिहीतो!

वरील वाक्यातील "ते" म्हणजे जे आता केन्द्रात आहे ते सरकार........ तेवढे माहीत असावे आपणास ही माफक आशा

ते कळले. माझा मुद्दा की "ते" म्हणजे काहीहि असले तरी मायबोलीकरांना सगळेच नेहेमी माहित असतेच. मी सुद्धा आद्य मायबोलीकर आहे, तेंव्हा मला समजत नाही असे काहीच नाही.
Happy

राजीव गांधींच्या मारेकर्‍यांना मोकळे का केले? >>

अवघडले असतील

>>सोगां यांनी पती या भूमिकेतून माफ केले होते... जसे ओरिसातील ग्रॅहम स्टेनच्या प्रकरणात स्टेनच्या बायकोने दारा सिंग ह्या खुन्याला 'माफ'केले होते. त्याचा कोर्टाशी काही संबंध नाही. रागां नी जो इश्यू केला आहे तो राज्याच्या अधिकारांचा 'सिलेक्टिव्ह' वापर केला आहे त्याबद्दल.... <<

राज्याच्या अधिकारांचा "सिलेक्टिव" वापर हा मुद्दा रागांच्या प्रतिक्रियेनंतर आला आहे, असं मला वाटतं. रागांचा मुद्दा - "या देशात पंतप्रधानांना न्याय मिळत नाहि तर सामान्य माणसांची काय अवस्था असेल.."

राजीव गांधींच्या मारेकर्‍यांना फाशीचीच शिक्षा होणं जरुरीचं होतं आणि तेहि ताबडतोब; परंतु राजकिय इच्छाशक्ती नसल्याने हि सध्याची परिस्थिती उद्भवली आहे. आता या सगळ्या पाश्वभुमीची कल्पना असताना हि राहुल गांधींनी असं वक्तव्य करणं हे बुचकळ्यात टाकणारं आहे...

केंद्राने एवढा उशीर लावण्यामागे काय कारणे आहेत / असतील? <<<<<<
ती त्यान्नाच विचारायला हवित, नै का? मायबोलिकरान्ना ते कसे माहित असेल?

छे छे अस कस, सचिनजी पगारेंना माहिती असेलचच, काँग्रेसच्या बाबती त ते सर्वज्ञ आहेत

गाढवापुढे वाचली गीता आधीचा गोन्धळ बरा होता अशी स्थिती आहे सध्या दिल्लीत>> तुम्ही दिल्लीत राहता का? येथील सामान्य जनता खुष आहे केजरीवाल वर. जर फेर निवडणुक घेतली तर आपला आरामात बहुमत मिळेल.

दुर्दैवी निर्णय.

आजच्या टाईम्स ऑफ इंडीया मधे मारेकर्‍यांची मुलगी काय म्हणतेय ते वाचा
"I’m really sorry for Rahul Gandhi. But my parents have regretted enough, they deserve forgiveness. I can understand losing someone you love,” Harithra said in an interview to TOI.

She hopes once her parents are released, she will be able to obtain a visa to come to India and taken them home to the UK. Angry

>>>> She hopes once her parents are released, she will be able to obtain a visa to come to India and taken them home to the UK. राग <<<<<<
तुमचा राग ती मुलगी तिच्या पालकांकरता व्हीसाची अपेक्षा करते म्हणून आहे की "यूके" वर आहे की युकेला होम म्हणते म्हणून आहे? Wink नक्की काय कळले नाही बोवा.

छे छे अस कस, सचिनजी पगारेंना माहिती असेलचच, काँग्रेसच्या बाबती त ते सर्वज्ञ आहेत
>>>
यात यूपीए सरकरचेही काही वर्षांचे योगदान आहे.....

तुम्ही डो.मा. स्माईली टाकून प्रश्न विचारल्याने तुम्हाला त्याचे उत्तर नक्की कळले आहे ते समजतेय. त्यामुळे मी लिहायची गरजच नाही.

Pages