खेळ विचित्र नियतीचा

Submitted by मुग्धटली on 19 February, 2014 - 03:32

आपल आयुष्य कधी कधी आपल्याला अशा एका स्थानावर आणुन की खरच हसाव की रडाव हेच कळत नाही... आनंद मोठा मानावा की दु:ख? अगदी अशाच परिस्थितीत दोन दिवस गेले आहेत.

आमच्या जवळच्या कुटुंबात त्यांच्या मुलाच लग्न होत. लग्नाची तारीख १७ फेब्रुवारी. त्या परिवाराच्या विशेषतः त्या मुलाच्या आईच्या आनंदाला पारावार नव्हता.. घरची आर्थिक परीस्थिती बेताची असुनही अगदी ओळखीपाळखीच्यांना सुद्धा यथाशक्ती आहेर करुन तृप्त केल. अशातच त्या काकुंच्या आईला दवाखान्यात ठेवल्याच समजल. लग्नाच्या धावपळीत सोलापुरला जाउन आईला भेटुन आल्या. औषधोपचारांनी तब्येतीत सुधारणा झाल्यावर लग्नाआधीच्या घरगुती समारंभासाठी म्हणुन आईला घरी घेउन आल्या. खरतर काकुंची त्यांना पुण्याला आणण्याची तयारी नव्हतीच पण नातवाच कौतुक बघण्याची आजीची इच्छा मोडु नये म्हणुन त्यांना पुण्यात आणल.

इथे आल्यावर काही दिवस नीट जातायत न जातायत तोच लग्नाच्या आठवडाभर आधी त्यांना रुबी हॉल हॉस्पीटलमध्ये अ‍ॅडमीट करण्यात आल आणि तपासणी अंती ब्लॉकेजेस आढळले. काकुंची शारीरिक-मानसिक ओढाताण सुरु झाली. डॉक्टरांनी अँजिओग्राफीचा सल्ला दिला, भावांना सोलापुरमधुन बोलावुन घेउन अँजिओग्राफी केली. १३ तारखेला आजींना डिस्चार्ज मिळुन त्या सुखरुप घरी आल्या, परंतु डॉक्टरांनी त्यांना लग्नाला घेउन जाण्यास सक्त मनाई केली कारण लग्न हैद्राबादला होत. आजींची तशी खूप ईच्छा होती तिकडे येण्याची अगदी डॉक्टरांजवळ विनवण्या केल्या त्यांनी, पण तब्येत खूप नाजुक असल्याने त्यांना परवानगी मिळण अशक्य होत.

आजींजवळ त्यांच्या धाकट्या मुलीचा मुलगा आणि आजोबा थांबले. त्यांच्याच ओळखीतल्या एका कुटुंबात त्यांची सोय करुन शनिवारी वर्‍हाड लग्नाला निघाल. हसत-खेळत रवीवारी हैद्राबादला पोचलो, तिकडे पोचल्याक्षणी मुलीकडच्यांच अगत्यपूर्ण वातावरण लक्षात आल, तसच व्याही हौशी असल्याचही लक्षात आल. संध्याकाळी सिमांत पुजनाचा कार्यक्रम चालु असताना आजींना दवाखान्यात ठेवल्याची बातमी कानावर आली आणि काळजाचा ठोकाच चुकला. नवरा म्हणाला मला काहितरी वेगळीच शंका येत आहे. त्यांचा सर्वात लहान मुलगा व सून तातडीने पुण्याला निघाले. आम्ही सगळेच मनातील शंका खरी ठरु नये यासाठी प्रार्थना करत होतो, परंतु दैवाच्या मनात काहीतरी वेगळच होत. जेव्हा आजींना अ‍ॅडमीट केल्याच समजल खरतर तेव्हाच त्या हे जग सोडुन गेल्या होत्या. केवळ कार्यात अडथळा येउ नये म्हणुन तिकडे काही कळविण्यात आल नव्हत.

या सगळ्यात खरतर काकुंच जास्त वाईट वाटत. स्वभावाने खूप छान, सोशिक, सासरच्यांनी खूप त्रास दिलेला, नवर्‍याने आयुष्यभर पोटापाण्यासाठी काहीही केल नाही, मुल हाताशी आल्यावर योग्य वयात त्यांचे दोनाचे चार करुन द्यावे तर मोठ्या मुलाच लग्नच लवकर ठरत नव्हत, एक ना दोन अनंत अडचणी आणि आता सगळ सुरळीत होईल अस वाटल तर हे अस.. मुलाची सासुरवाडी खूप हौशी आहे.अगदी दृष्ट लागण्यासारख लग्न झाल... पण नव्या सुनेला ओवाळुन घेण्याच भाग्य पण त्या माउलीच्या नशिबात नव्हत...

आता ती माउली अत्यंत विचित्र पेचात अडकली आहे. नव्या सुनेच्या आगमनाचा आनंद मोठा की जन्मदात्या आईच्या मृत्युच दु:ख.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विषण्ण करणारी सत्यपरिस्थिती. कित्येकवेळा कल्पनेपेक्षाही सत्य दाहक असते असे आपण वाचतो. एका जेष्ठ स्त्रीचे आजारपणात वा अपघाताने वा आकस्मिक निधन झाले ही एरव्हीची नित्याची बाब मानली गेली असती. पण जेव्हा एका लग्न समारंभात सारे मग्न आहेत...आनंदी वातावरण आहे, हास्यकल्लोळ, चेष्टामस्करी चालू आहेत, मुहूर्ताची वाट पाहात आहेत सारी; त्याचवेळी दुसरीकडून वराच्या घरातून एक जेष्ठ व्यक्तीच्या निधनाची वार्ता येते त्यावेळी त्या ठिकाणी होणारी अवस्था किती बिकट होऊ शकते हे मुलाने तसेच त्याच्या कुटुंबियांनी प्रखरपणे जाणले असेल. मुग्धाच्या लिखाणातून ते प्रतीत झाले आहेच.

लेखाचा शेवट "...नव्या सुनेच्या आगमनाचा आनंद मोठा की जन्मदात्या आईच्या मृत्युच दु:ख...." अगदी हृदयस्पर्शी झाला आहे....अशी विचित्र स्थिती एकाचवेळी ज्या माऊलीच्या ललाटी आली आहे तिच्या सुखात वा दु:खात सामील होणे तिसर्‍याला शक्य नसते.

सुनेवर पण विचित्रच प्रसंग.>>> हो ना मामी..

काय वय त्या वारल्या त्यांचं?>>>> त्यांच वय बहुतेक ७०च्या पुढे असाव

मला त्याचीच भिती आहे दिव्यश्री, पण आजींच्या मृत्युचा तिच्याशी संबंध लावण खरच चुकीच आहे, कारण तसही आजींची प्रकृती नाजुकच होती... त्यात नातवाच्या लग्नाला जाता न आल्याच त्यांनी मनाला लावुन घेतल, या सगळ्यात त्या बिचारीचा काय दोष?

सत्तरच्या पुढे म्हणजे अगदी अकाली वगैरे नाही. धीराने घेउन शोकाचे दिवस संपले की नव्या जोडीला
नॉर्मल वागवता आले पाहिजे नाहीतर उगीच सुतकी कळा! काकुंना कुठे तरी दूर जाउन आराम करता येइल चारसहा दिवस. सारखे आजारी माणासाचे करूनही थकल्या असतील त्या.

दिव्यश्री...

"...आयुष्यभर तिला क्या गोष्टीचा त्रास होणार...."

~ हे आपल्या हाती असते.... नव्या नवरीला तर अशा परिस्थितीत फार जपावे लागते....तिला ही जाणीव देखील होऊ देवू नये की आजीच्या परलोकवासाचा आणि ह्या लग्नाचा अर्थाअर्थी काही संबंध आहे. सुदैवाने लग्न तर पार पडले अशा दु:खद स्थितीतही म्हणजे मुग्धाकडील मंडळी आधुनिक विचारसरणीची दिसतातच. ते सुनेला या संदर्भात काही त्रास देणार नाहीत याची खात्री वाटते.....किंबहुना तसा विचारही मनी आणू नये.

तसंच व्हाव मामाश्री ....त्या बिचारीचा खरच दोष नाही ...पण मी मला तिच्या जागी ठेऊन पाहिलं तर शहरालेच मी Sad आणि हे कधी न कधी तिला रागाच्या भारत याची जाणीव करून देतील अशी खूप भीती आहे Sad कारण चारचौघात कदाचित वेगळ आणि घरात वेगळं असं असत बरेच वेळा ...देव करो माझी भीती खोटी ठरो .

मला त्याचीच भिती आहे दिव्यश्री, पण आजींच्या मृत्युचा तिच्याशी संबंध लावण खरच चुकीच आहे, कारण तसही आजींची प्रकृती नाजुकच होती... त्यात नातवाच्या लग्नाला जाता न आल्याच त्यांनी मनाला लावुन घेतल, या सगळ्यात त्या बिचारीचा काय दोष? >> घटना खूपच दुर्दैवी आहे. काकूंचे खरोखर वाईट वाटले.

माझ्या साबांच्या बहिणीला कॅन्सर होता. ५८ वय. हॉस्पिटल मधे खूपच क्रिटिकल कंडीशन मधे होत्या. मुलाचे लग्न ठरलेले, साखरपुड्या पर्यंत तब्येत ठिक होती. केमोथेरपीत केस गेलेले, पण स्कार्फ बांधून साखरपुड्यात वावरल्या. खुश होत्या. त्यांना मुलाचे लग्न झालेले बघायचे होते. म्ह्णून त्या हॉस्पिट्ल मधे वेंटीलेटर वर असताना अक्षय त्रुतियेला लग्न लागले. लग्नात सगळे तणावाखालीच होतो. लग्न लागल्यावर मुलगा आणि सून हॉस्पिटल मधे त्यांना भेटायला गेले. सुनेकडे डोळे भरून पाहिले छानसे हसल्या, चेहेर्यावरून हात फिरवला, कुठून त्यांना एवढी शक्ती आली माहित नाही. सुनेचा ग्रुहप्रवेश झाला आणि पहाटे मावशी वारल्या. ही घटना कोल्हापूर मधे घडली दोन वर्षांपुर्वी. सुनेला धीर देण्याकरता आणि तिला सांभाळण्यासाठी माझे सासू सासरे तिथे एक महिना राहिले. पण कुणीच सुनेला काही बोलले नाही, महत्वाचे म्हणजे घरचेच तिला एवढे सांभाळत होते की इतर कुणाचा धीरच नाही झाला काही बोलायचा. अजुनही सगळे म्हणतात की मावशी जाता जाता पण घराची सोय लावूनच गेल्या.

--

Mama mazya gharchi mandali aadhunik aahet, pan kakunchya gharchyabaddal khatri nahi deta yet. Kaku changlya aahet tya nahit as a kahi vagnar. Me tar tharvlay udya vel padlich tar me saral tichya bajune bhanden

cell varun marthi nahi type karta yet pan agadich rahavat nahiy mhanun lihitey..
mazya lambachya kakanchya gharatahi asach prasang ghadala.. ani durdaivane lagn zalyachya ratri thanthanit asanare kaka achank jag sodun gele.. tya sunechi avashta tar vicharahi karvat nahiy ho.. sarsarun kata yeto angavar nusat aathaval tari Sad

त्या नववधूला व्यक्त होउद्या. अजून मंडळी दु:खात आहेत. कदाचित भांडायची वेळ नाही यायची.>>> अहो मामी उद्या म्हणजे अगदी शब्दशः नव्हे हो. पुढे मागे अशी वेळ आली तर अस म्हणाले मी...

नि:शब्द. वेरी टचिंग. यालाच म्हणतात नियती, आपण एक ठरवतो आणि नियतीच्या मनात काही वेगळेच असते.

ते सर्वजण ह्यातून लवकर बाहेर पडोत आणि त्यांच्या आयुष्यात ह्यापुढे फक्त सुख आणि आनंद येवो.

श्रीनिका .. बापरे! काय अवस्था झाली असेल तिची विचारही नाही करवत. माणुस आजारी असला आणि असे झाले तर आजारपण या कारणामुळे नववधुला कोणी काही बोलत नाही पण ठणठणीत असणारा माणुस गेला तर...
बिच्चारीला ऐकावे पण लागले असेल आणि जे बोलले नसतील त्यांच्या नजरेतुन जाणवले असेल. सरसकट सगळ्यांना दोष नाही देत मी पण जेव्हा नववधुला कोणी काही बोलले असेल तर बर्याच जणांच्या माना डोलल्या असतील. हो आणि यात बायकाच जास्त असतात हेच मोठे दुर्दैव Sad

अगं होतात या गोष्टी..... नियतीच्या मनात जे असेल तेच होते.
माझ्या दिराच्या लग्नात सिमांतपूजन चालू असताना आजेसासूबाईंना (वय ८५) हार्टअ‍ॅटॅक आला आणि दवाखान्यात नेता नेता गेल्या. दुसर्‍या दिवशी लग्न करायचं की नाही यावरून वादविवाद झाले. शेवटी सव्वा महिन्यानेच लग्न लावले. तसे जावेला कोणी बोलले नाही पण आयुष्याच्या ईतक्या महत्वाच्या प्रसंगी असे झाले याचे वाईट वाटत राहते.

मुग्धा , माझ्या भावाच्या मैत्रिणीच्या लग्नात सिमांतपूजन चालू असताना तिच्या सासर्यांना हार्टअ‍ॅटॅक आला आणी
ते गेले. पण तिच्या सासुबाईंनी तिला आणि इतरांना ही सांगितले की झाले यात तुझा काहीही दोष नाही.
हे सर्व कार्यालयात सगळ्यांसमोर सांगुन मगच त्या घरी गेल्या.पुढे मग ६ महीन्यांनी लग्न केले.
त्याही परिस्थितीत त्यांनी जे केलं ते खरच खुप कौतुकास्पद वाटलं

आजकाल बहुतेक लोक ८० - ८५ पर्यंत सहजपणे जगतात. पुर्वी नातवाचे / नातीचे लग्न पहाणे ही खूप अप्रूप वाटणारी गोष्ट होती. पण आजकाल बहुतेक लग्नात वर/ वधूचे १-२ आजी आजोबा दिसतात्च. अर्थात वय झाल्याने लग्नाच्या आसापास अशा अशूभ गोष्टी घडणे दु:खद असले तरी ते अगदीच अनपेक्षित नसते.

वरील बहुते उदा. वराच्या नातेवाईकांची आहेत. अर्थात वधूकडेही अशा घटना घडण्याची अनेक उदा. आहेत्च. पण वराला याबद्दल बोल लावण्याची आपली पद्धत नाही. त्यामुळे अशा घटनाकडे त्या दृष्टीने बघितले जात नाही.
माझे लग्न झाल्यावर ८ दिवसात आईची वयस्कर आजारी आत्या गेली. लग्नानंतर २ महिन्यात आईची आई गेली. नवर्‍याच्या मावस बहिणीचे लग्न झाल्यावर १५ दिवसात तिचे वडील अचानक हार्ट अ‍ॅटॅक ने वारले.
पण अशा सगळ्या प्रसंगात नवर्‍या मुलाला कोणीच काही बोल लावले नाही.

माझ्याही लग्नानंतर माझ आयुष्य बदलून गेल...आई वडील पाठोपाठच गेले.पण मी कोणा व्यक्तीला दोष दिला नाही , देणार नाही मात्र नशिबाला दोष देतेच मी माझ्या . Sad