निर्मोही

Submitted by अज्ञात on 17 February, 2014 - 08:41

अंशात तुझ्या वसलो मीही
वाहिले हवे ते निर्मोही
समिधा सुखदा अक्षत ग्वाही
आतंक मनी कुठला नाही

मन अबोलसे स्वर विकलांगी
प्रतिमा न कधीही एकांगी
ध्वनि छेडतसे सम प्रतिध्वनी
हृदयात वलय लय शतरंगी

लाटेस काठ हळवा म्हणुनी
खेळते किनाऱ्यावर पाणी
भरती ओहटते ओघळुनि
डोहात माणकांच्या खाणी

………अज्ञात

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ध्वनि छेडतसे सम प्रतिध्वनी
हृदयात वलय लय शतरंगी>>

छान.
कवितेची लय आवडली.
कविता पूर्णपणे उमगली असे म्हणणार नाही... पण भावली मात्र.

भारती << टायपो असावा ..भरती असे हवे आहे का
असो
लय खूप छान आहे आवडली आणि कविता पुन्हा एकदा मी मन लावून वाचली तर समजेल असे वाटते