बालि सहल - भाग ५ बालि नृत्य आणि शिल्पकला

Submitted by दिनेश. on 17 February, 2014 - 08:08

आता देशोदेशीच्या हॉटेलात ब्रेकफास्ट साधारण सारखाच असतो. त्यात ब्रेड, जॅम, सिरियल्स, फळांचे रस, चीज, बटाटे, फळे वगैरे असतातच. पण बालित त्यातही स्थानिक टच होताच.
जॅममधे पिस्ता कलरचा पानदान जॅम आणि श्रीकाया या फळाचा जॅम मला खास आवडला. ते श्रीकाया म्हणजे काय त्याचाही मी शोध घेतलाच. फळांच्या रसासोबत तिथे खास सुगंधित पाणी होते. त्यातही तांदूळ + वेलची, काकडी + हिरवे सफरचंद , गाजर + ओली हळद वगैरे प्रकार मला फार आवडले.

१) तर हा माझा ब्रेकफास्ट

२) केदारला नॉन व्हेजमधेही भरपूर चॉईस होता. आमचा नाश्ता एवढा पोटभरीचा व्हायचा कि दिवसाचे जेवण घ्यायची गरजच वाटत नसे. ( तशीच पद्धत आहे Happy )

३) ब्रेकफास्टच्या टेबलावरुनच समोरच्या झाडावरचे पक्षी न्याहाळता येत असत.

४) आणि त्या कोरल ट्रीची फुले देखील

५) बालितल्या समृद्ध जंगलाची हि देणगी.. अखंड लाकडातले हे टेबल.

६) उन्मळून पडलेल्या झाडांचे बुंधे देखील तिथे शोभिवंत वस्तू असतात.

७) माझी आवड म्हणून मला विजय एका नृत्य कार्यक्रमाला घेऊन गेला. निसर्गाचेच एक भाग झालेले हे स्टेज.
डाव्या बाजूला २५ कलाकारांचा ताफा वाद्यमेळ जमवून होता. मला ती सूरावट थेट आपल्या भूपाली रागाची
वाटली ( पंख होते तो उड आती रे.. लता.. सेहरा )

८) सुरवात झाली ती या क्यूट प्राण्यांच्या नर्तनाने

९) पहिल्या फोटोत जाणवतेय त्याप्रमाणे प्रकाशाची दिशा प्रेक्षकांकडे होती. त्यामूळे फोटो तेवढे क्लीयर नाहीत.
तरीपण या नर्तिकांचे लालित्य नक्कीच जाणवेल.

१०) त्यांच्या पायात घुंगरू नव्हते त्यामूळे तालाचे प्राबल्य नव्हते तर होता केवळ लयीचा अविष्कार

११) या नृत्यमुद्रेतले पुतळेही तिथे जागोजाग आहेत.

१२)

१३) महाभारतातील कुंती आणि सहदेव यांचे कथानक होते ( मला संदर्भ माहित नाही. ) तिथल्या सर्व मुलींना
या नृत्यप्रकाराची ओढ असते. तसे शिक्षणही त्यांना मिळते पण प्रत्यक्ष रंगमंचावर सादरीकरण करण्याएवढे कौशल्य फारच थोड्या मुलींकडे असते.

१४) आणि आता एका अनोख्या दुनियेत आपण जाणार आहोत. दगडातले नाही तर निदान लाकडातले तरी शिल्पकाम प्रत्यक्ष करताना बघायचेच अश्या माझ्या आग्रहावरुन मला विजय SARI REJEKI WOOD CARVER & ART GALLERY ADDRESS SUMAMPAN, KEMENUH GIANYAR इथे घेऊन गेला.

इथली खास बात म्हणजे लाकडाच्या आत जे वेगवेगळे रंग असतात त्यांचा चपखल वापर करून घडवलेली शिल्पं.
एक कलाकार अगदी तल्लीन होऊन काम करत होता.

१५) कुठल्या झाडांच्या खोडापासून अशी शिल्पे घडवतात, ती झाडेही तिथे होती. त्यापैकी एक क्रोकोडाईल बार्क ट्री. असे नाव आपल्याकडच्याही काही झाडांना दिलेले आहे पण हे झाड मला अनोळखी वाटले ( वरती पाने पण दिसताहेत. )

१६) आणि हे आपले पारस भेंडीचे झाड. त्याचाही उपयोग करतात.

१७ ) दरवाज्यावरचे देखणे शिल्प.

१८) आर्ट गॅलरी असली तरी तिथे एवढी शिल्पं होती कि प्रत्येकाची स्वतंत्र मांडणी आणि खास प्रकाशयोजना शक्यच नव्हती. ( त्यामूळे फोटोही तसे क्लीयर नाहीत. )

१९ ) तरीही प्रयत्न करतो. या शिल्पातली मेखला बघाच.

२०) हे दोन्ही रंग नैसर्गिकच

२१) सुंदर मुखवटा

२२) इतालियन पद्धतीचे मुखवटे

२३) रामजानकी

२४) अगदी आपल्या गौरीचे मुखवटे

२५) क्रोकोडाईल बार्कचा काही भाग तसाच ठेवून घडवलेले शिल्प.

२६)

२७) बुद्धीबळाचा पट

२८) फोटोत नीट दिसत नाही, पण त्या डालीच्या आतही कोंबडा आहे.

२९) टेबल

३०) परत रामजानकी

३१) आणखी एक सुंदर टेबल

३२) आपली गणेशमूर्ती, तिथे किंचीत उग्र रुपात असते.

३३)

३४) केवळ अलंकृत शैलीतलीच नव्हे तर नैसर्गिक शैलीतली शिल्पं होती.

३५)

३६) श्री गणेश

३७)

३८)

३९)

४०)

तूम्ही बालिला कधीही गेलात तर या गॅलरीला अवश्य भेट द्या. पैसे डॉलर्स मधेच द्यावे लागतात. व्हीसा कार्ड चालते. त्यातील श्रमांच्या मानाने किमती मला वाजवी वाटल्या. त्यातही बार्गेनींग करता येते. माझा कलाकृती विकत न घ्यायचा निश्यय इथेच ढेपाळला. मी एक सुंदर गणेशमूर्ती इथे घेतली. ( तिचा फोटो नाही इथे )

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोचे तिकिट काढले होते आणि आर्ट गॅलरीच्या मालकाची फोटोसाठी तोंडी परवानगी घेतली होती. फोटो काढायला बंदी आहे, असा कुठेही बोर्ड नव्हता तरीही !

रश्मी... खाण्याकडे वळूच परत !

वाह!!!!! इथलं इन्ट्रिकेट वर्क अक्षरशः वेड लावणारं आहे..

दिनेश खूप सुंदर ओळख करून देत आहेस बाली ची..

खूप महाग विकतात मात्र. खरे तर तिथे कुठेही जा आणि कुठुनही लाकडी वस्तू विकत घ्या छानच मिळतील. म्हणून, दुकानात न जाता रोडवर बसून विकणार्‍या लोकांकडून विकत घ्यायच्या.

अतिशय सुंदर. आपल्या बाप्पाचे उग्र रूप मात्र भावले नाही. आपल्याकडचे गोंडस रूप बघायची सवय झालीयना म्हणून असेल कदाचित. गौरीचे मुखवटे मात्र सुरेख, आखीव-रेखीव.

३०) परत रामजानकी >>>>> मिशीवाला राम पाहून मजा वाटली ..... Happy Wink

सर्वच लाकडी शिल्पे अतिशय आवडली .... काय कारागरी आहे !! वाह, उस्ताद.....

मस्त सफर चाललीये दिनेशदा .....

मस्त आहेत सगळे फोटो. ती सोलो नर्तिका पहिल्या फोटोतली तिने डोक्यावर घातलेला मुकुटही फुलांचाच आहे काय?? खुप सुंदर दिसतोय... लाकडी शिल्पे तर अप्रतिमच..

दिनेश, काय सुंदर कलाकृती आहेत!

लाकडाच्या खोडातल्या रंगाछटांचा आणि खोडात त्या किती खोलीवर आहेत याचा अंदाज घेऊन त्यांचा शिल्पात शिताफीने उपयोग करून घ्यायचा म्हणजे.... खरंच कौशल्याला दाद द्यावी तितकी थोडीच आहे!

तुफान!! कसल्या जबरदस्त कलाकृती आहेत! आणि किती बारीक कलाकुसर!
बालीकरांना सलाम! Happy

आभार दोस्तांनो.. तरी मी इथे मोजक्याच मोठ्या कलाकृतींचे फोटो टाकले आहेत. आकाराने लहान शिल्पातही अशीच कारागिरी होती.

झंपी, त्या नृत्याचे नाव ब्रोशर बघून लिहितो. बालिला जायला एप्रिल-मे चांगला. आम्ही गेलो तेव्हा उन्हाळा + पावसाळा होता.
साधना, तो मुकुट पांढर्‍या चाफ्याचा होता. फुलांचे त्यांना अतोनात वेड आहे. तो बसलेल्या म्हातार्‍याच्या पुतळ्याच्या कानावर पण फुल आहेच.

बाहेरून खोड बघून आत कसे रंग असतील याचा कसा अंदाज करतात कोण जाणे ? पण यातला कुठलाही रंग वरून लावलेला नाही. चंदनाच्या मूर्त्याही होत्या पण बालित चंदन होत नाही, हे त्या दुकानात मला आवर्जून सांगण्यात आले.

बी म्हणतोय ते खरे आहे. रस्त्यावर त्या स्वस्त मिळतीलही पण त्यासाठी आपल्याला पारखी नजर हवी. कमी प्रतीचे लाकूड वापरून किंवा ते रंगवूनही मूर्त्या केल्या जातात. तशीही मूर्ती आम्हाला दाखवली त्याने.

श्री गणेश हा तिथे बहुदा द्वारपाल म्हणून असतो. कदाचित ते कारण असावे अशा रुपाचे. घरी मात्र ते पितरांची ( पूर्वजांची ) पूजा करतात असे विजय म्हणाला. त्यांच्या पूजेतल्या आणखी एका सुंदर कलापूर्ण बाबीकडे आपण नंतर बघणारच आहोत.

झंपी,
त्या नृत्यप्रकाराला लेगाँग असे नाव आहे. केचक हेही तिथले लोकप्रिय नृत्य आहे. पण त्याची झलक मी नेटवर बघितली होती.

कसलं भारी आहे ते कोरीवकाम.
माझ्या इथल्या एका मैत्रिणीच्या घरात अशी राम-सीतेची पूर्णाकृती कोरीव मूर्ती आहे. तिनं बालीहूनच आणली आहे. नजर ठरत नाही त्यावर...!

Pages