सुपर-३० आनंद (Must read)

Submitted by मी मी on 16 February, 2014 - 11:31

तुम्ही कोणी सुपर-३० आनंद बद्दल ऐकलंय ??

नसेल तर हे वाचा नक्की ….

हल्लीच नागपूरच्या स्वयंसेवक संघाने स्वामी विवेकानंदांच्या जन्म शताब्दी वर्षाच्या निमित्त्याने भारतभर अनेक चांगले कार्यक्रम राबवले. या कार्यक्रमाची सांगता होती त्या दिवशी आनंद कुमार हे प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित होते. मी कार्यक्रम पहिला नाही पण नागपुरात एवढ्या कमी काळात यांची जी प्रचीती पसरली त्यावरून यांची माहिती शोधून काढली तसेच यांना भेटलेल्या अन ऐकलेल्या लोकांकडून ऐकले ते असे होते सारे ….

बिहार मधील आनंद कुमार या व्यक्तीने गेल्या १२ वर्षांपासून हे 'सुपर-३०' कोचिंग गरीब मुलांसाठी सुरु केले आहे. जे विद्यार्थी अतिशय हुशार आहेत परंतु आर्थिक अडचणींमुळे IIT च्या परीक्षा देऊ शकत नाहीत. आणि म्हणून हुशार असूनही कधीच परिस्थितीच्या पुढे जाऊ शकत नाही. अश्या विद्यार्थ्यांना दरवर्षी भारतभर फिरून त्यातले निवडक ३० विद्यार्थी निवडून हे आनंद कुमार पटण्याला त्यांच्या घरी आणतात त्यांचा राहण्या खाण्यापासून ते कोचिंग आणि नंतर प्रवेश परीक्षा असा सर्व खर्च आनंद स्वतः करतात. या कामात त्यांना त्यांची पत्नी भाऊ आणि आई मदत करतात. त्यांची पत्नी,भाऊ आणि आनंद स्वतः मुलांना कोचिंग देतात तर त्यांची आई मुलांच्या जेवणासाठी धडपडत असते. हि संस्था कुणाकडूनही देणगी किंवा दान स्वीकारत नाही तर, आनंद कुमार त्यासाठी विशेष ट्युशन क्लासेस घेतात आणि त्यातून येणारा पैसा या मुलांवर खर्च करतात.

आनंद कुमार यांच्या 'सुपर ३०' मध्ये शिकून परीक्षा देणाऱ्या ९०% विद्यार्थ्यांचा रिझल्ट पोझीटीव असतो एवढी मेहेनत आणि अभ्यास ते करवून घेतात. संपूर्ण परिवाराने या कामात आयुष्य समर्पित केले आहे. यांच्या या कामामुळे 'सुपर ३० आनंद' हे नाव विदेशात सुद्धा सन्मानाने घेतले जाते.यांच्या हाताखालून निघालेले अनेक गरीब घरचे मुलं आज देशात विदेशात मोठ मोठ्या पोस्ट वर कार्यरत आहेत. सुपर-३० आनंद बद्दल या मुलांच्या भावना काय असतील आपण कल्पनाही करू शकत नाही.

दरवर्षी फक्त ३० मुलांसाठी प्रत्यक्ष मदत करू शकत असल्याची खंत आनंद कुमार यांना वाटते आणि म्हणून इतर मुलांनाही ह्याचा लाभ घेता यावा यासाठी लवकरच online coaching सुरु करण्याचे प्रयत्न त्यांनी सुरु केले आहेत.

super-30-1.jpg

Super-30 Anand hats off to u __/\__

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"मस्ट रीड" ह्या फ्लॅगमुळे आवर्जून वाचला.....आणि आनंद कुमार किती महत्वाचे कार्य करतात हे तर जाणवतेच शिवाय त्यांचा सारा परिवार या कार्यात सामील आहे हे वाचून जास्तच आनंद झाला. खर्‍या अर्थाने हे देशकार्य मानावे लागेल.

प्रेरणादायक आहे हे सारे.

आपल्या ओळखीतही कोणी असे गर्जुवन्त असतील तर त्यांना हि माहिती द्यायला हरकत नाही याच उद्देशाने हा धागा शेअर केलाय

वाह... अतिशय चांगलं काम. ऑनलाईन असेल तर अधिकच चांगलं.
इथे माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.