स्टील फ्रेम

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

सिस्टीम बदलायची असेल तर सिटीम च्या आतमधे जावे च लागते. भारतातील राजकीय व्य्वस्थेत घुसणे सर्वसामान्यांच्या आवक्याबाहेर ची गोष्ट झाली आहे. पण प्रशासकीय व्यवस्थेमध्ये जाण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेच्या २००९ च्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. २८ केंद्रीय सेवांसाठी निवड करणारी ही परिक्षा पुढील वर्षी १७ मे ला होत आहे.

जे लोक या परिक्षेसाठी उत्सुक असतील वा तयारी करत असतील त्यांचे साठी एक पुस्तक सुचवावेसे वाटते. स्टील फ्रेम हे प्रशासकीय व्यवस्थेचे यथार्थ वर्णण करणारे नाव च श्री. फारुक नाईकवाडे यांनी या मराठी पुस्तकासाठी वापरले आहे. श्री. नाईकवाडे यांचे जे मित्र संघ लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत उत्तीर्ण झाले अन त्याहुन कठीण अश्या प्रत्यक्ष कामावरील लढाईत यश मिळवत आहेत त्यांचे अनुभव त्या पुस्तकात दिले आहेत (किंमतः रु. २५०/-). यशस्वी उमेदवारांच्या वैयक्तीक अनुभवासोबत च प्रत्येक सेवेचे वैशिष्ट्य उलगडुन सांगितले आहे. सिटीम बदलणे सोपे नसते पण ते तितके अवघड ही नसते हे उदाहरणांसह या पुस्तकात वाचायला मिळेल. विशेष म्हणजे यातील सर्व उमेदवार महाराष्ट्रातील तरुण आहेत.
(हे पुस्तक कॉम्पीटीशन सक्सेस नावाच्या मासिकासारखे उथळ पुस्तक नाही.)

मायबोलीवर असणारे बरेच तरुण संगणक अभियंते २४-२५ वर्ष वयाचे असतील. त्यांच्या साठी, काम करीत असतांना या परिक्षेची तयारी करुन भारतीय परराष्ट्र सेवे मध्ये निवड झालेले श्री. हितेश राजपाल (संगमनेर, जि.-अहमदनगर) हे योग्य रोल मॉडेल ठरु शकतील. पुण्यामध्ये एका बीपीओ मध्ये काम करुन ह्यांनी परिक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात ते सेवेत निवडले गेले. नोकरीकरुन या परिक्षेचा अभ्यास करणे अवघड जरी असले तरी, परिक्षेतील यशाची अनिश्चितता लक्षात घेता एक नोकरी हाताशी आहे हा मोठा आधार ठरतो. (अर्थात प्लान ए अन प्लान बी वर चर्चा करण्यात अर्थ नाही.)

पुण्यामध्ये सध्या बरेच मार्गदर्शन वर्ग सुरु झालेले आहेत. काही फक्त प्राथमिक माहीती साठी योग्य आहेत, काही खुप वेळ म्हंजे २-३ वर्षे वेळ असणार्या उमेदवारांसाठी योग्य आहेत तर काही अगदी फायनल टच साठी योग्य आहेत. ह्या सर्वांचा फायदा घेउन जर कुणी परिक्षेसाठी प्रयत्न करीत असेल तर हवी ती माहीती मी उपलब्ध करुन देइल.

विषय: 
प्रकार: 

चंपक,
i am interested... कुठून कशी सुरुवात करावी? मार्गदर्शन करशील का..?

योग, अरे ३० च्या वर 'ओपन' लोकांना परिक्षेस बसता येत नाही हा रुल आहे. ऑफकोर्स तू ३० च्या आत असशिल तर मग काही प्रॉब्लेम नाही.

अविनाश धर्माधिकार्‍यांची संस्था ह्या बाबतीत चांगले मार्गदर्शन करते.

>>तीस वर्शाच्या वर म्हणायचे आहे का तुला...?
छ्या मग पत्ता कट Sad अरे हे नेते तर ७५ वर्षाचे हातात काठी घेवून उभे राहतात मग आपल्याला का नाही...?

हो अविनाश धर्माधिकारी यांचे 'चाणाक्य' नावाचे वर्ग आहेत. खूप काही ऐकले आहे चाणक्य बद्दल. मी ऐम पी ऐस सी दिली होती आणि पास पण केली होती. आय. ऐ. ऐस. साठी पण मी तयारी करायला सुरवात केली होती. पण मग मला नोकरी करणे भाग पडले व मी सर्व काही मधेच सोडून दिले. माझी खूप जिद्द होती या सर्व परिक्षा एकदा तरी देऊन बघण्याची. आता भाच्यांना चाणाक्य मधेच नाव नोंदवायला सांगितले आहे.

<हो अविनाश धर्माधिकारी यांचे 'चाणाक्य' नावाचे वर्ग आहेत >

चाणक्य मंडल असं त्या संस्थेचं नाव आहे....

नाही चाणक्य मंडळ असं आहे.