************************************************************************
************************************************************************
फेसबुकवरची दगदग संपली
अन मग दोघं मनमुराद भेटली..
भेटत राहीली....
आज काय द्यावं दुसर्याला
म्हणुन बरच काय ते शोधत बसली..
मागच्या मैत्रीत हरवलेलं...
यांत नक्की सापडेल म्हणुन
एक्मेकांना बिलगुन बसली....
आशा-निराशेची वार्षिक लॉटरी वाटली...
...
....
प्रेम म्हणजे प्रेमच असतं..
पण...
वर्षांतनं एकदा तरी
पैसा म्हणजे प्रेम असतं... !
************
पेपर्-मासिकातल्या
चकाकत्या जाहीराती पहात
तिनं त्याच्याकडे पाहीलं...
बिचार्यानं चुपचाप
क्रेडीट कार्ड भिरकावलं...
"सोलीटेअर" पाहुन मग
ती मोकळं हसली...
विस वर्षांची कसरत जिंकली....
..
...
....
प्रेम म्हणजे प्रेमच असतं..
पण...
वर्षांतनं एकदा तरी
पैसा म्हणजे प्रेम असतं...!
*******
| ३ |
कालच्या फुल टाईट कारवाल्यानं
फेकलेल्या गुच्छ्यातले...
वीसेक गुलाब विकले गेले
बरेच वेडे फसले सालें
पोट आज फुल्ल भरणार..
तो मस्त हसला...
सिग्नलवरची वणवण जिंकली...
..
...
....
प्रेम म्हणजे प्रेम असतंच..
पण...
वर्षातनं एकदातरी
पैसा म्हणजेच प्रेम असतं...!!!!
..
...
....
| तुमचं-आमचं सेम असतं..???? |
************************************************************************
************************************************************************
मस्त!! खूप दिवसांनी..!
मस्त!!
खूप दिवसांनी..!
(No subject)
छान...
छान...
मस्त !!
मस्त !!
बहोत खुब... काफी दिनोके बाद
बहोत खुब...
काफी दिनोके बाद नजर आये जनाब !!
ही कशी काय मिसली होती?
ही कशी काय मिसली होती?