बंडू नि दिगू

Submitted by सचिन पगारे on 13 February, 2014 - 11:04

आपल्या वाढत्या वजनामुळे बंडू चिंतीत होता घरात बायकोसमोर तर ऑफिसात साहेबांसमोर वजन काही वाढत नव्हते पण शारीरिक वजन मात्र बंडूच्या कोणत्याही विरोधाला न जुमानता वाढतच होते. आता ह्या वजनाचे करायचे काय असा प्रश्न बंडूला पडला. काय करावे ह्या चिंतेत सदा बंडू राहू लागला. कुठल्यातरी वृत्तपत्रात बंडूने वाचले होते कि चिंता केल्याने वजन घटते. म्हणून बंडू हा सगळ्याच गोष्टीत चिंता करू लागला जपानमध्ये भूकंप झाला तर बंडू इथेच हादरु लागला. देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे झाले हे एकून तर तो वाटोळा चेहरा करून जो भेटेल त्याला गाठून हि राष्ट्रीय समस्या समजावून सांगू लागला अर्थात ती राष्ट्रीय आर्थिक समस्या असल्याने त्यालाही त्याच्यातले थोडेच कळत होते. परंतु ह्याचा हि काही उपयोग न होता त्या चिंताग्रस्त अवस्थेत काढलेल्या महिन्यातही बंडूचे वजन दोन किलोने वाढले. बंडू संतापाने वेडापिसा झाला इतक्या दुनिया भरच्या चिंता करूनही वजन कमी होत नाही म्हणजे काय.

बंडू हताश होवून कोचावर बसला इतक्यात त्याचा मित्र दिगू ह्याचे त्याच्या घरी आगमन झाले. दिगुचि उंची बरोबर पाच फुट नि वजन चाळीसच्या आसपास होते.दिगू नि बंडूची जोडी चाळीत लॉरेल नि हार्डी ह्या नावाने ओळखली जाई. 'काय रे काय झाले'? दिगूने बंडूला विचारले. बंडूने दिग्याला त्याची समस्या सांगितली.ह्यावर दिग्यने त्याला 'बस इतनीसी बात, हम है तो बंडू, क्या गम है!' बंडू तुला असले उपाय सांगतो कि माझ्याइतका बारीक होशील.' "नकोरे,दिग्या तुझ्या इतकही बारीक नको तुला आठवतेय मागे आपण गडावर पिकनिकला गेलो होतो नि जो सुसाट्याचा वारा सुटला की तू उडून गडाखाली जातोस कि काय अशी आम्हाला चिंता वाटू लागली. शेवट तो वारा जाई पर्यंत आम्हाला तुला पकडून ठेवावे लागले होते”.त्या कटू आठवणींनी दिग्याचा चेहरा आणखी बारीक झाला.तो म्हणाला, “ते जावू दे रे. सध्या प्रश्न तो नाही तू बारीक कसा होशील हा आहे. आणि आपण काय रोज गडावर जात नाही. माझ्या मते तर जाड असण्यापेक्षा बारीक असलेले चांगले, मग भले ते माझ्या इतके का असेना. तुला माहित आहे, मागे आपण माझ्या मावशीकडे नांदेडला गेलो होतो .तेव्हा त्यांच्या बाथरूमचा दरवाजा अरुंद असल्याने तुला तिरके होवून आत घुसावे लागत होते नि तिरके होवून बाहेर निघावे लागत होते एकदा तर तू अडकता अडकता वाचलास. तुला तर माहित आहे मी किती चाणाक्ष आहे .मला सगळे कळत होते पण तू आपल्या मस्तीतच होता. मावशीचे यजमान हे तू प्लास्टिकच्या खुर्चीवर बसू नये म्हणून आटोकाट प्रयत्न करत होते. तू बसू लागणार ह्याची चिन्न्ह दिसताच ते तुझ्यासाठी धावत जावून लाकडी खुर्ची घेवून यायचे. पण तू एकदा बसलाच त्या प्लास्टिकच्या खुर्चीवर नि खुर्ची मोडली . आमचे काका दुनियाचे चीगट, खुर्ची मोडल्याच्या दु:खात दिवसभर मोडक्या खुर्ची सारखा चेहरा करून बसले होते. तू पाहुणा तुला त्यांना काही म्हणतही येईना". 'अरेच्या असे होते का."बंडू दु:खाने म्हणाला.

"अरे, दिग्या तुला आठवतेय मी आजारी असताना आपण डॉक्टर कडे गेलो होतो. तर ते तुलाच पेशंट समजून तपासू लागले.तू बोलतोय तर तुला बोलूही देईना पार अडमिट व्हायची वेळ आली होती तुझ्यावर." नि बंडू खो खो हसू लागला दिग्याचा चेहरा गोरामोरा झाला. इतक्यात बंडूची बायको गीता चहा घेवून आली दिग्याने चहाचा कप तोंडाला लावला तितक्यात बंडूला एक कल्पना सुचली नि त्याने दिग्याच्या पाठीत थाप मारली दिग्या त्या थापेने सरळ सोफ्यावरून खाली आडवा झाला चहा घरभर पसरला. शेवटी गीता आली नि आवरा आवर केली. बंडू हा हसऱ्या चेहऱ्याने तर नुकताच पडला असल्याने दिग्या दुखऱ्या चेहऱ्याने गप्पा मारू लागले. शेवटी त्यांचे असे मत झाले कि बंडू हा अतिशय जाड आहे तर दिगू हा अतिशय बारीक.

बंडूने वृत्तपत्रात एक जाहिरात वाचली होती त्यात वजन कमी करण्याची नि वाढवून देण्याची हमी होती.

डॉक्टर कानकापे सर्व प्रकारच्या वजनाच्या समस्येबद्दल भेटा खात्रीने वजन वाढवणार नि कमी करणार.

शेवटी डॉक्टर कानकापे ह्यांना भेटायचे त्यांचे ठरले. पुढच्या सोमवारी बंडू नि दिगुचि जोडगळी डॉक्टरांच्या क्लिनिक मध्ये दाखल झाली डॉक्टरांनी महिन्यापूर्वीच क्लिनिक सुरु केले होते त्यांची रिसेपनिस्ट अतिशय देखणी होती तिला पाहून बंडू हा शक्य होते तितके आकुंचन पावून बसला तर दिगू शक्य होईल तितके प्रसारण पावून बसला.दोघांनीही तिला सांगून स्वतासाठी एकाच नंबर घेतला नि दोघेही नंबर आल्यावर डॉक्टरांकडे गेले. दोघांना एकसाथ पाहून डॉक्टर बोलले 'बोला काय होतंय'? पेशंट कोण आहे?. दोघेही एका सुरात बोलले "डॉक्टर, आम्ही वजनाशी संबंधित संबंधित समस्ये साठी आलेलो आहोत". 'ठीक आहे'. डॉक्टर दिगुला म्हणाले 'तुम्हाला वजन वाढवायचे आहे आणि ह्या महाशयांना कमी करायचेय, बरोबर. डॉक्टरांना हे कसे कळले ह्या बाबत दोघांच्या चेहऱ्यावर आश्चर्य दाटून आले. दोघांनीही एकमेकांकडे आश्चर्याने पाहिले.डॉक्टरांच्या हुशारी बद्दल त्यांची एकदम खात्री पटली.

डॉक्टर म्हणाले कि तुम्हाला प्रत्येकी दहा हजार रुपये खर्च येईल पण महिन्याभरात तुमच्या समस्या ह्या पूर्णपणे संपलेल्या असतील. दहा हजार रुपये आकडा एकूण बंडू समोर ठेवलेल्या ग्लासातले पाणी पिवू लागला तर दिगू क्लिनिकच्या छताकडे पाहू लागला. डॉक्टरांच्या लक्षात त्यांचा प्रोब्लेम आला. डॉक्टर म्हणाले, 'पहा, हि सुवर्णसंधी आहे तुमचे वजन हि कमी-जास्त होईल नि तुम्ही पैसेही कमवू शकाल'. ते कसे डॉक्टरांनी दोघांना आपली स्कीम समजावून सांगितली नि दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. डॉक्टरांचे बोलणे अतिशय मधाळ होते नि ते कोणत्याही शंकांचे फटकन उत्तर देत. डॉक्टरांची स्कीम थोडक्यात अशी होती दहा हजार भरून डॉक्टरांकडून महिन्याभराची औषधे घ्यायची नि नंतर शक्य होतील तितके पेशंट उपचाराला आणायचे. प्रत्येक पेशंट मागे बंडू नि दिगुला हजार रुपये कमिशन मिळणार नि त्या पेशंट लोकांनी आणलेल्या दर पेशंट मागे तिनशे रुपये कमिशन मिळणार. आपला वजनाचा प्रोब्लेम दूर होणार नि आपण बीझनेसमेनही होणार ह्या खुशीत दिगू नि बंडू आले.

डॉक्टरांनी त्यांना सांगितले, 'आता तुम्ही जावू शकता रिसेप्शन वर दहा हजार रुपये भरा नि पुढच्याच महिन्यात भेटीला या. जे पेशंट पाठवलं ते परस्पर पाठवा तुम्ही पाठवलेले पेशंट नि त्या पेशंटनि पाठवलेले पेशंट मिळून तुमचे कमिशन घ्यायला पुढच्याच महिन्यात या’. दिगू नि बंडू ख़ुशीखुशीत आपापल्या घरी गेले. आपापल्या ओळखीचे जाडे नि बारीक माणसे शोधून त्यांना डॉक्टरांकडे पाठवण्याचा ते प्रयत्न करू लागले दिगुच एक लठ्ठा मित्र तर सरळ त्याला म्हणाला 'त्या डॉक्टरच्या बोडक्यावर दहा हजार रुपये घालण्यापेक्षा लट्ठपण परवडला. काहीजण मात्र आपण आता बारीक होणार किंवा जाड होणार ह्या खुशीत डॉक्टरांकडे पळाले.

बंडूला जे औषध दिले होते ती कसली तरी पावडर होती ती गरम पाण्यात दोन चमचे टाकून बंडूला दिवसातून पाच वेळा घ्यायची होती ती पावडर कारल्या पासून बनवलेली असावी अशी बंडूला दाट शंका होती.

अखेर महिना संपला दोघेही मित्र डॉक्टरांकडे जायला तयार झाले प्रथम त्यांनी बंडूने एक नवा वजन काटा आणला होता त्यावर वजन पहायचे ठरवले . प्रथम बंडू काट्यावर उभा राहिला
बंडूला वजन तीन किलो वाढलेले आढळले बंडू हबकला अजून तीन वेळा त्याने वजन केले पण वजन वाढलेलेच. 'काय झाले?' दिग्याने विचारले.'अरे, माझे वजन वाढलेय तीन किलो.'
"अरे, काय बोलतोस काय तू औषधे वेळेवर घेतली नसणार. थांब आता मी माझे वजन बघतो मी औषधे अगदी वेळेवर घेतली. जेवण वेळेवर नाही झाले तरी पर्वा केली नाही औषधे मात्र वेळेवर घेतली."असे बोलून दिगू हा वजन काट्यावर उभा राहिला. बंडू उभा राहिल्यावर सरासरा पाळणारा काटा हा दिगू उभा राहताच कासवाच्या वेगाने चालू लागला व एका आकड्यावर जावून थांबला दिगुचे वजन दोन किलोने कमी झाले होते. औषधे चालू असल्याने आपले वजन वाढत आहे ह्या भ्रमात असलेला दिगू हा आता स्किनफिट टी-शर्ट घालत असे नि छाती काढून चालत असे. आपण चालताना लोक वळून वळून आपल्याकडे का बघायचे स्माईल का पास करायचे ह्याचा उलगडा आता दिगुला झाला होता. आपण रुबाबदार दिसतोय म्हणून लोक आपल्याकडे बघतायत असे तो समजत होता. पण आता काट्यावरचे वजन पाहून त्याचा तो भ्रम मिटला. दोघेही हैराण झाले .

तेव्हड्यात शेजारचे घारू अण्णा आले.घारू अण्णांना त्यांच्या चाळीत बीबीसी म्हणत. सर्वांच्या आधी बातम्या ह्या घारू अण्णांना मिळत.त्याही विस्तृत. घारूअण्णा बंडूला म्हणाले,"बंड्या बातमी कळली का? 'काहो काय झाले'? 'अरे आपल्या इथला नवा डॉक्टर कानकापे ह्याला अटक झाली. भोंदू डॉक्टर निघाला तो. लोकांना औषधाच्या नावाखाली सुकवलेल्या कारल्याची पावडर द्यायचा नि वर दहा हजार रुपयेही घ्यायचा. बऱ्याच जणांना फसवले त्याने" हि भयानक बातमी एकताच बंडूला अशक्तपणा जाणवू लागला तो मटकन कोचावर बसला नि दिगुला शरीरात एकप्रकारचा जडपणा वाटू लागला नि तो कोचावर बसलेला तो धाडकन उभा राहिला.
बंडूने चाचरत घारू अण्णांना विचारले, ‘अण्णा त्याने घेतलेल्या लोकांच्या पैशाचे काय’? ‘अरे, ते आता कसले मिळतायत. दारूचा नाद त्याला दारू जुगारात सारे पैसे उधळले नि आता काखा वर करतोय म्हणतोय सारा पैसा संपलाय जी सजा द्यायची ती द्या पण मी काही कोणाला पैसे परत देवू शकत नाही..अशी हादरवणारी बातमी सांगून घारूअण्णा निघून गेले बऱ्याच वेळ खोलीत निशब्द अस्वस्थता पसरली होती.

शेवटी दिगू म्हणाला पैश्यापरी पैसे गेले महिनाभर सुकलेल्या कारल्याची पावडर खावी लागली नि वजन हि जैसे थेच राहिले.जावू दे आता पैसे गेले ते गेले,ते काय परत मिळत नाही पण त्या पैशाच्या मोबदल्यात थोडीशी का असेना अक्कल मिळाली ते बरे झाले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉक्टरांनी महिन्यापूर्वीच क्लिनिक सुरु केले होते त्यांची रिसेपनिस्ट अतिशय देखणी होती तिला पाहून बंडू हा शक्य होते तितके आकुंचन पावून बसला तर दिगू शक्य होईल तितके प्रसारण पावून बसला.>>>>>>:हहगलो:

आवडली गोष्ट.:स्मित:

ही रुपककथा आहे का....
मी राजकारणातल्या काही व्यक्तींना लाऊन पाहीली...
जम्या नही...

मलाही आवडली.

सचिन पगारे साधे सोपे सरळ लिहितील असे वाटत नाही. त्यामुळे रुपककथा असण्याचा दाट संशय येतोय, पण रुपककथा असली तर मग मात्र मला काहीही कळले नाही. माबुदोस.

बंडू व दिगू हे देशातले लोक. कुणाला एक हवे तर दुसर्‍याला त्याच्या विरुद्ध.

डॉक्टर म्हणजे नेते.

दोघांनाही बनवतात. काही वर्षे निवडून येतात, पैसे खातात. पकडले नाही तर बरेच. पकडले तरी काही दिवसांनी पुनः निवडून येऊ शकतात.

हे फक्त भारतातच नव्हे तर जगात कुठेहि.

अभिनंदन, ज्यावर वाद होऊ शकत नाहीत असा लेख प्रथमच लिहिल्याबद्दल! >>>>>+१०१
बेफी, शालजोडीतला हाणला हो अगदी !!!!!! Rofl

साधना आणि आशुचँप,

भरताड बडबड करणारा दिगू कोण आहे ते सगळ्यांना माहितीये. तो जर जाड्या असेल तर बारीक कोणाला म्हणायचं ते लक्षात येईलंच!

डॉक्टरची स्वागतसुंदरी देखणी बेब आहे. देखणेपणा कुण्या बेबीचा सद्गुण आहे ते सांगायला नको. डॉक्टर भामटा असून त्याच्याकडून पैशाची वसुली शक्य नाही. एकदा का पैसा स्विस बँकेत गेला की कायमचा गेला! Sad

आ.न.,
-गा.पै