कॅलीफोर्निया प्रवासाबाबत माहीती हवी आहे..

Submitted by झी on 9 February, 2014 - 23:07

आम्ही मे महिन्याच्या शेवटी कॅलिफोर्नियाला फिरायला जाणार आहोत. San Francisco ते Los Angeles व्हाया Yosemite आणी Monterey Bay असा ८ ते १० दिवसांचा प्रवास करायचा विचार करत आहोत. त्याबाबत माहीती हवी आहे.
१) San Fransisco मधे जर फिरायचे असेल तर कुठे रहावे, Airport जवळ की आणखिन काही ठीकाणे आहेत का जसे की downtown मधे ? Airport जवळ राहायचे झाल्यास public transortation convenient व safe आहे का?
२) एक रात्र Monterey Bay मधे राहाचे आहे कुठे रहावे? प्रेक्षणीय स्थळे काय काय आहेत?
३) Yosemite त कुठे रहावे?
४) २ दिवस Los Angeles मधे राहाणार आहोत. कुठल्या ठिकाणी राहिल्यास सोयिस्कर राहील?
जाणकार मायबोलीकरांकडुन माहीती मिळाली तर खुप बरे होईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Monterey Bay >>> इथे माँटरे बे अ‍ॅक्वेरियम आहे. हे अ‍ॅक्वेरियम अगदी डाऊनटाऊन जवळ आहे. तिथेच जवळपास राहणे चांगले. अ‍ॅक्वेरियम पाहण्यासारखे आहे.
तिथून जवळच १७ माईल्स ड्राईव, कार्मेल हे देखील पाहता येईल. पॅसिफिक ओशन चे सीनीक बीचेस आहेत, निसर्गसौंदर्य आहे. गूगल करुन या ठिकाणांची फोटो/माहिती मिळवा, अंतर फार नाही माँटरे हून.

योसेमिटी - इथेच एक कॅलिफोर्निया पर्यटन नावाचा धागा आहे, तिथे ही माहिती लिहीलेली आहे. सॅन फ्रान्सिस्को ची पण माहिती तिथेच मिळेल.

सॅन फ्रा मध्ये मी एकदाच राहिलेय, बाकी वेळा जाऊन येऊन केलंय. जेव्हा राहिलेय तेव्हा युनियन स्केअरच्या हॉटेलचं डील मिळालं होतं. तिथे एकदम २७ व्या मजल्यावरुन सही नजारा दिसला होता सगळाच आजूबाजूचा. युनियन स्केअर पासून सगळ्या सिटी टूर च्या बसेस चा स्टॉप जवळ आहे. तिथून हॉप ऑन हॉप ऑफ बसने एका दिवसात बरेचसे पाहून होईल. मुख्यतः पीअर ३९, गोल्डन गेट ब्रीज / पार्क, आणि गूगल करुन ठरवा काय काय पहायचे ते. किती दिवस आहात सॅफ्रा ला ?

आम्ही एल ए ला गेलो होतो तेव्हा जरा लांब राहीलो होतो. पण गाडी नेल्याने तसा काहीच प्रश्न आला नाही. एल ए ला डीस्ने लँड वगैरे बघणार असाल तर तिथेच जवळ राहा. एले ला पण दिवसभराच्या सिटी टूर्स आहेत, त्या हॉलीवूड वगैरे सगळे दाखवून आणतात.

एल ए ला आम्ही दोन दिवस राहाणार आहोत.
एअरपोरर्ट जवळ राहीले तर सेफ आहे का ( LA & SF) दोन्ही.?
आम्हीही कार रेंट करुन फिरायचा विचार करत आहोत.

आम्हीही कार रेंट करुन फिरायचा विचार करत आहोत.>> जगात ह्या पूर्वी कुठे कुठे गाडी चालवायचा अनुभव आहे? (कुजकटपणा नाही अगदी खरच विचारतीये. अमेरिकेतील इतर शहरात गाडी चालवणे हा अनुभव अगदी तोकडा आहे. पुणे-मुंबई अशी कुठे कधी गाडी चालवली आहे का?)

Prefer "Extended stay" hotels in SF and in LA. If not this, then Holiday Inn r best. I have good experience of both in 2013.
If u have car, choose extended stay hotel which is less expensive, u can drive. ( Hotels nearby airport/downtown r more expensive )

for Yosemite stay- book at Yosemite lodge or Cedar lodge. Both r good hotels, I stayed at cedar few months back, found good.

17 miles drive and Pebble Beach r good places near monetary bay.
Don't miss universal studios and Disney land (california adventure theme park is also exciting) in Los Angeles.

अजून काही माहिती हवी असेल तर नक्की विचारा