Submitted by मेधावि on 6 February, 2014 - 22:15
माझ्या घरापासून माझे ऑ. पर्यंत रोजचा प्रवास ५५ कीमी आहे. कं. बस ने जाणे येणे फार कटकटीचे व वेळखाऊ आहे. त्यामुळे येण्याजाण्यासाठी स्वतंत्र कार घ्यावी असा विचार आहे. पण पेट्रोलच्या वाढलेल्या किमती पहाता गॅस किट वरची कार घ्यावी असे वाटते आहे. वॅगन आर हे ऑप्शन आहे ज्यात कं. फिटेड गॅस किट उपलब्ध आहे. मला फक्त ऑफिसला जाण्यायेण्याकरताच गाडी घ्यायची असल्यामुळे खरे तर जुनी कार पण चालणार आहे पण त्यात कं फिटेड गॅसवाल्या कार्स फारश्या उपलब्ध नसल्यामुळे नवी वॅगन आर घ्यावी असा विचार आहे. जाणकार काही प्रकाश टाकू शकतील का? (अधिक माहीती -ड्रायव्हींग हे माझे पॅशन नाही, लॉग ड्राईव्ह ही माझी हॉबी पण नाही.
त्यामुळे पुण्यातल्या पुण्यात घर ते ऑ. एवढाच गरजेपुरता प्रवास करण्यासाठीच गाडी घ्यायची आहे.)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुमेधा नानुला आहे का एल पी जी
सुमेधा नानुला आहे का एल पी जी सोय? असेल तर ऑफिस ते घर या करता नानु उत्तम आणी महागडी पण नाही. उजेड टाका कुणीतरी.
घर ते ऑफिस असाच प्रवास कटकट
घर ते ऑफिस असाच प्रवास कटकट कमी होण्यासाठी करायचा असेल तर कार पर्याय नाही. त्यापेक्षा टू व्हिलर घ्या. सोयीचे पडेल. ( ५५ किमी टू वे गृहित धरले आहे. नाहीतर कार हाच पर्याय)
वॅगन आर पर्याय चांगला आहे. तसेच नॅनो ही पण काही दिवसांपूर्वी झालेल्या स्मॉल कार क्रॅश टेस्ट्स मध्ये नॅनो, अल्टो, आय १०, फिगो, आणि पोलो ह्या नापास झाल्या.
ALL small cars sold in india
ALL small cars sold in india failed that test, I think. including big foreign companies.
सुमेधाजी कंपनी बस असेल आणि
सुमेधाजी कंपनी बस असेल आणि येउन जाउन ५५ किमी जरी होत असतील तर बस फॅसीलिटीच वापरा.
अतिप्रचन्ड ट्रॅफिक मधुन कार चालवणे हे स्ट्रेसफुल काम आहे.
शिवाय कारचा हप्ता, इन्धन आणि ठेवलात तर ड्रायव्हर असे खर्च वाढतील.
सीएनजी वाली कार परवडेल.
जुन्या कार ज्याला बाहेरुन सीएनजी बसवलेले आहेत त्याच्यावर भरोसा ठेवणे थोडसं कठीण काम वाटत मला. (माझ्यापुरत हे मत आहे.)
केदार, झकासला अनुमोदन.
केदार, झकासला अनुमोदन.
सॉरी! हा बीबीचा विषय नाही
सॉरी! हा बीबीचा विषय नाही तरिही तुम्ही एवढ्या लांब का राहता? One way or two way, either way? How can you manage your domestic responsibilities? time wise, energy wise? तुम्ही स्वतःला, कुटुंबियांना पुरेसा वेळ देऊ शकता का?
{माझ्यासाठी : वेळ हे संख्येचे / प्रमाणाचे ((?) Measurement of quantity) मोजमाप आहे दर्जाचे (quality) नाही.}
राजसी यांचा प्रश्न वाचून
राजसी यांचा प्रश्न वाचून भयंकर हसायला आलं.
असा प्रश्न स्वतःला विचारून मी स्वतःला, कुटुंबाला वेळ देण्यासाठी प्रवासाचा वेळ वाचवायचा म्हणून ऑफिसजवळ घर घ्यायचं ठरवलं तर माझ्या पुढच्या सात पिढ्या गृहकर्ज फेडत बसतील.
घराजवळ ऑफिस येणं काही शक्य नाही.
असो!
आपापल्या प्रायॉरिटीज् नुसार प्रत्येकाने निर्णय घ्यावा, नाही का राजसी?
त्या पुण्याच्या आहेत हे
त्या पुण्याच्या आहेत हे प्रोफाईलमध्ये बघूनच मी प्रश्न विचारला. मी सिरियस प्रश्ण विचारला होता.
मुंबईच्या संदर्भात घराजवळच ऑफिस बघणे, ऑफीसजवळ भाड्याने राहणे हे पर्याय असू शकतील. मी अंबरनाथहून भांडुपला आणि माझी बहिण ठाण्याहून मालाड्ला (लग्नापूर्वी) नोकरी करायचे तेव्हा माझ्या आई-वडिलांनी हे पर्याय सुचवले होते. पण लग्नापूर्वी - being operative word, मला काहिही जबाबदार्या नव्हत्या, आईने केलेला ऐता डबा उचलून ऑफिसला पळणे एवढेच काम असल्याने मी बाणेदारपणे इथूनच अप-डाऊन करायला माझी काहिही हरकत नाही असे उत्तर दिल्याचे आठवते.
पण, आपापल्या प्रायॉरिटीज् नुसार प्रत्येक निर्णय घेतोच हे ही बरोबर.
एल पी जी कार पेक्षा सी एन जी
एल पी जी कार पेक्षा सी एन जी कार घ्या . खुप फायदा होतो, ह॑ तस डिक्की मिळत नाही , पण फक्त ऑफिस पुरतिच वापरायची असेल तर अगदी उत्तम. बाहेर सहलीला जायचे असेल तरिही परवडत॑. स्वानुभवावरुन.
न॓नो मधे पन सी एन जी येत आहे क्॑पनी फिटेड.
एक्स्पोर्टक्वालिटीपीळ इथे पण
एक्स्पोर्टक्वालिटीपीळ इथे पण आले का?
सुमेधा इथे कोण ती गाडी घ्यावी हा एक बाफ आहे तिथे बघा. एक गाडी आटोमॅटिक गिअर शिफ्ट ची आली आहे कोणती ते माहीत नाही. पण ती चेक करा. एल पीजी पेक्षा डिझेल चांगले नॅनो आजिबात घेउ नका.
घर ते ऑ फिस रस्ता कसा आहे? चांगला असेल तर तुम्ही चालवा नाहीतर बस बरी.
माहीतीसाठी सगळ्यांचे
माहीतीसाठी सगळ्यांचे आभार.
राजसी, मी आधी घर घेतले होते. नोकरी बदलत बदलत लांब गेली. पण कं ची बस वापरत आहे बरेच दिवस त्यामुळे त्याची सवय आहे. पण पुण्यातल्या पुण्यात प्रवासाचा वेळ ४ तास जाणे न परवडणारे आहे. स्वतःची गाडी अश्यासाठी हवी आहे की ट्रॅफिकची वेळ सोडून कमी गर्दीच्या वेळेत प्रवास कमी वेळेत होईल. कारण बसची वेळ ठरलेली असते व ती नाही बदलता येत. त्यावेळी गर्दी असतेच. आणि मला सीएन्जीच म्हणायचे होते..चुकून एल्पीजी लिहीले.
गॅस किटवर चालणारी कोणतीही
गॅस किटवर चालणारी कोणतीही गाडी घेऊ नये कारण
१)गाडीतील गॅस किटमध्ये कार्बन जमा होतो तो कीट वेळो वेळी साफ करावा लागतो.
२) गाडीला starting trouble चा रोग लागतो.
३)गॅस किटवर चालणारी गाडी कोठे हि बंद पडू शकते.
४) पिकप मिळत नाही.
५) हिशोब केलात तर गॅस आणि पेट्रोल,डीजेल यात आपले फार काही पैसे वाचत नाही.
हे मी स्वानुभवाने लिहितो आहे
तुमच्या सोबत आणखी काही लोकं
तुमच्या सोबत आणखी काही लोकं रोज जाऊ शकतात का? त्यामुळे पेट्रोल शेअरींगही होईल. माझ्या मते पेट्रोल बेस्ट कारण मेंटेनन्स कमी राहील. माझी पसंती ऑल्टो (~२० किमी/लिटर).
गॅसकिटमध्ये पेट्रोलचा पर्यायच नसतो का? म्हणजे हायब्रीड. कधी गॅस संपला तर असो, म्हणुन
सुमेधाव्ही मी गेले ४ महिने
सुमेधाव्ही मी गेले ४ महिने CNG wagon R वापरत आहे . पुणे city मध्ये साधारण २५ km /kg average पडते . जर विथ AC चालविली तर २२ ते २३ km /kg average पडते . Highway वर मला without AC २९ km /kg average मिळाले आहे . शक्यतो company fitted असेल तर चांगले कारण engine हे specially designed असते आणि safe पण असते कारण sensors असतात जे leakage , heat आणि accident मध्ये gas cutoff करतात . पण CNG घेताना विचार कर कारण सध्या rate मध्ये खूप confusion आहे बहुतेक १ एप्रिल पासून rate १० ते ११ Rs per kg ने वाढणार आहेत . पेट्रोल च्या comparison मध्ये मला तरी CNG परवडतो . माझे रोजचे travelling ४० km आहे . साधारण महिना Rs. १२०० खर्च येतो . पूर्वी माझ्या बजाज avenger ला around Rs. २००० लागायचे
drawback फक्त इतकाच आहे कि CNG स्टेशन वर साधारण १ तास line मध्ये राहावे लागते . आणि कारची power जवळ जवळ १० bhp ने कमी होते . वर परत boot space compromise करावी लागते . बाकी मी तरी खुश आहे पैसे हि वाचतात आणि comfortable हि आहे .
Wagon R CNG ला ८ sensors आहेत
Wagon R CNG ला ८ sensors आहेत अस company सांगते
अजून काही माहिती हवी असल्यास संपर्क करा
आणि अजून एक Gas to Petrol
आणि अजून एक Gas to Petrol switch automatic होते पण बाहेरून kit fit केलेले असेल तर manual switch करावा लागतो आणि जर गाडी चालवताना gas संपला तर engine component damage होतात त्याचा खर्च प्रचंड आहे (आमच्या कंपनीत एकाला ह्यामुळे १५००० रुपये खर्च आला होता तेव्हा kit विक्रेत्याकडून confirm करून घ्या ) CNG घेणार असाल तर company fitted घ्या .
सिटीराईड करता सिएन्जी+पेट्रोल
सिटीराईड करता सिएन्जी+पेट्रोल (सिएन्जी कंपनी फिटेड) असेल तर फायदाच आहे. कारण पूर्ण ईंजीन त्या दोन्ही प्रकारच्या ईंधनाकरता ऑप्टिमाईज केलेलं असतं. त्यामुळे कसला धोका नाही! भर थंडीत स्टार्टिंग ट्रबल्स नाहीत, फ्युल्स ऑटोस्विच होतात.
>>>>> स्वतःची गाडी अश्यासाठी
>>>>> स्वतःची गाडी अश्यासाठी हवी आहे की ट्रॅफिकची वेळ सोडून कमी गर्दीच्या वेळेत प्रवास कमी वेळेत होईल. <<<<<<
एक काम करा आधी, एखादी टू व्हिलर घ्या अन चाराठ दिवस अशा वेळा पाळून जाउन येण्यात काही फरक पडतो का ते बघा. केवळ प्रवासासाठी ४ तासाचे गणीत खरोखरच तापदायक आहे.
(मी एल्पीजी (लाल ग्यास सिलिन्डर) ते एल्पीजी/सीएन्जी बाहेरुन बसवुन घेतलेले कीट/कम्पनी फिटेड कीट / डिझेल / पेट्रोल अशा सर्व स्वरुपाच्या गाड्या चालविल्या आहेत अन सर्व फायदेतोट्यासहित त्याचे गुणदोष अनुभवलेले आहेत. )
सीएन्जी घ्यायचि असल्यास व्यागन आर ला पर्याय दिसत नाही. मात्र शक्यतो फर्स्ट ह्यान्डच घ्यावी कारण तुम्हाला ऑफिसला वेळेत पोहोचणे त्यामुळेच शक्य होईल, सेकन्ड ह्यान्ड गाडीची खात्री देता येत नाही. माझ्यामते इन्धनाद्वारे पैसा वाचणे ह्या मुद्द्यापेक्षाही महत्व गाडिमुळे दिवसातला वेळ वाचेल यास दिले, तर सोईस्कर जे असेल, परवडणार असेल ते बिनधास्त करा.
). पण काय फरक पडतो? मी माझ्या जागी ते त्यान्च्या जागी, अन आमचा पान्ढराहत्ती सुमो आमच्या दारात ऐषोआरामात! कारण नेहेमी वापरायला परवडत नाही ( एक लिटर = १० किमी) म्हनून मी त्याला आन्जारुन गोन्जारुन ठेवत असतो, सणासुदीला काढतो फिरवायला!
) तेव्हा बघा बोवा.
कायेना, फार शन्काकुशन्का काढल्या ना, की जे वर्तमान जीवन आहे, ते देखिल सुखाने जगणे/अनुभवणे अशक्य होऊन बसते. अन जे हातापाशी आहे, ते सोडुन अजुन भलतेच चान्गले वाटू लागते. तेव्हा स्वतःच्या निर्णयशक्तिवर ठाम रहा. जे कराल ते आत्मविश्वासाने करा.
(म्हणजे काय? तर एक उदाहरण सान्गतो, २००९ मधे एक वेळ अशी होती की मी पेट्रोलला पैशे नाहीत म्हणून टूव्हिलर सोडून भर पावसात ऑफिसला चालत जाऊ लागलो होतो, अन त्याच वेळेस पोराला हे देखिल सान्गत होतो की ही वेळ फार काळ टीकणार नाही लौकरच आपण गाडी घेऊ. नन्तर दोन्/तिन महिन्यातच एक सन्धी समोर आली, अन सेकण्डह्यान्ड सुमो स्वःस्तात मिळू शकेल असे दिसले. तेव्हा पोरांपुढे प्रश्न मान्डला की एक मोटरसायकल (कर्जहप्ते फेड धरुन ७० हजार्पर्यन्त कॉस्ट) घ्यायची की तितक्याच किमतीत सेकण्डह्यान्ड फोरव्हिलर सुमो घ्यायची? सगळ्यान्चे मत सुमोच्या बाजुने पडले, त्यान्ची कारणे काहीही असोत. अन मग तो डिझेलवर चालणारा पान्ढरा हत्ती माझे दारामधे झुलू लागला. मी निर्णय घेतला तो बरोबर घेतला असे सान्गणारे भेटले तसेच लिम्ब्या मूर्ख आहे, व्यवहारात फसला असे म्हणणारेही आहेत (हे मला मूर्ख ठरविणारे गरजेच्या वेळेस मात्र याच सुमोचा वापरही बिनदिक्कत करतात हे विशेष
ग्यासकीटचे तोटे वर कुणीसे सान्गितलेच आहेत, पण कम्पनी फिटेड नविन गाडी असेल तर साफसफाईव्यतिरिक्त सुरवातीचे तिनेक वर्ष तरी प्रॉब्लेम येत नाही.
दुचाकी चा पर्याय कधीही परवडतो
दुचाकी चा पर्याय कधीही परवडतो पण तुमच running ४० km पेक्षा जास्त असेल तर थोड्याच दिवसात पाठीचे त्रास सुरु होतात (ह्याच कारणाने मी कार घेतली) वरून noise आणि sound pollution चा त्रास वेगळा . आणि safety च्या दृष्टीने कार कधीही चांगली खासकरून पावसात .
चेतन, बरोबर, पाठीचा त्रास अन
चेतन, बरोबर, पाठीचा त्रास अन सेफ्टी! यामुळे ठराविक काळ/वयानन्तर दूचाकि नकोच असे वाटते.
शिवाय अनुभव असा की दूचाकीवरुन गेल्यावर जितके फ्रेश असतो, त्यापेक्षा कितीतरी अधिक फ्रेश चारचाकी ने गेल्यावर असतो.
चेतन जी, "Gas to Petrol
चेतन जी,
"Gas to Petrol switch automatic होते ".
आमची ही सी एन जी वेगन आर आहे. पण गाडी चालवताना सी एन जी मधेच स्॑पला तर एक बटन दाबुन गाडी पेट्रोल वर करावी लागते. तुम्ही म्हणता तस ऑटोमाटिक स्विच कस॑ होत, का तशी सोय नविन गाड्या॑मधे केली आहे का? आमची गाडी १ वर्षा पुर्वि घेतली आहे.
CNG - Wagor R हा best option
CNG - Wagor R हा best option available aahe...मी २ वर्ष झाले गाडी घेउन... average & running काहि problem नाहि... गाडी सुरु केल्यानन्तर Petrol to CNG auto transfer hote ...pan running madhe CNG sampala tar matra switch dabun CNG to Petrol transfer karave lagate.. 22- 23 KM/Kg cha average milato .. ani Mumbai travel kele tar highway la 28 -30 average milate
सुमेधा, तुमचा वेळ जातोय हे
सुमेधा, तुमचा वेळ जातोय हे कळतंय पण स्वतः रोज इतकं अंतर कार चालवून ऑफिसला जाणं आणि कार चालवत परत येणं मला जरा त्रासाचं वाटतंय. बसने जाताना वेळ गेला तरी त्यामुळे तो प्रवास तुलनेने स्ट्रेसफ्री असेल असं मला वाटतंय. पुण्यातल्या पुण्यात फिरायला कार घ्यायची असेल तर घ्या, पण रोज अपडाऊन करणं मला जमलं नसतं असं वाटलं म्ह्णून लिहिलं. ( पोस्ट आवडलं नसल्यास सोडून द्या :), एव्हढ्या ट्रॅफिकमध्ये कार चालवायची सवय तुटलीये माझी
)
मी गेले पावणेदोन वर्षे सीएनजी
मी गेले पावणेदोन वर्षे सीएनजी वर कार चालवतोय. जून २०१२ पासून आतापर्यंत २८०००+ गाडी चालवली आहे. (डेली साधारण तुमच्याच एवढा प्रवास आहे). स्विफ्ट (ट्रू व्हॅल्युमधून) ला बाहेरून सीएनजी फिट करून घेतला. मलातरी अजून काहीही प्रॉब्लेम आला नाहीये. फक्त ज्याच्याकडे सर्व्सिंगकरून घेतो, त्याने एक गोष्ट सांगितली आहे, की 'जर ५०० किमी सीएनजी वर चालवलीस, तर कमी ५० किमी पेट्रोलवर चालव."
पण बाहेरून kit fit केलेले असेल तर manual switch करावा लागतो
>> माझ्या किट्मध्ये तर स्टार्ट केल्यावर आपोआप सीनजीवर कन्वर्ट होते आणि गॅस संपला की पेट्रोलवरही.
आणि जर गाडी चालवताना gas संपला तर engine component damage होतात त्याचा खर्च प्रचंड आहे
>> ही माहिती नवीन आहे!!
निर्झरा बहुतेक नवीन कार मध्ये
निर्झरा बहुतेक नवीन कार मध्ये हि सोय आहे कारण मला तरी CNG संपला तर बटन दाबून पेट्रोल वर switch करावी लागत नाही ते automatic होते . कळत पण नाही पेट्रोल वर कधी शिफ्ट झालो ते फक्त CNG warning light blink झाला कि समजायचे कि कार पेट्रोल वर आहे ते
आनंदयात्री मला पण engine
आनंदयात्री मला पण engine component damage होतो हे खोत वाटला पण कंपनीतला मुलगा असल्याने पटले . बहुतेक काहीतरी किडे केले असतील त्याने चालवताना
संपदा +१. मलाही रोज जाऊन येऊन
संपदा +१. मलाही रोज जाऊन येऊन ५५ किमी ड्रायव्हिंग फार स्ट्रेसफुल वाटतं आहे.
सुमेधा, वॅगन आर हा सध्याचा
सुमेधा,
वॅगन आर हा सध्याचा सीएनजी मधला बेस्ट पर्याय आहे..... जुनी कार घेऊन किट लावलात तरी हरकत नाही... पण पुण्यात सीएनजी पंप्स किती आहेत ते घरापासून कितपत लांब किंवा येण्याजाण्याच्या वाटेवर आहेत का हेही पहा.... कारण बर्याचदा रांगच असते त्यात वेळ जातो..... (मुंबईत तरी).
आणि वर बर्याच जणांनी म्हटलेय तसं जर ड्रायव्हिंग ही तुमची फारशी आवड नसेल तर ट्रॅफिकमध्ये नक्की कंटाळा येइल.....
सुमेधा.. मारुतीची नवी
सुमेधा..
मारुतीची नवी "ऑटोमॅटीक" गीअर ची कार येत आहे.. त्याचे माइलेजही चांगले असणार आहे..(२५ किमी) असे म्हणत आहेत. ती चांगली पडेल. तरीही रोज ५५ किमी म्हणजे खुप वाटत आहे.
तुम्ही एखादा रिक्षावाला महिना भराच्या बोलीने ठरवु शकता का? माझी पत्नी जिथे काम करते त्यापासुन घराचे अंतर (जाउन येउन) साधारण ४५ किमी आहे. आम्ही एक रिक्षावाला ठरवला आहे. तो रोज घर ते ऑफीस आणि परत अशी सर्विस देत आहे. दिवसाचे ४०० रुपये होतात..महिन्याचे साधारण ९००० रुपये होतात.
तुम्ही गाडी घेतलीत तर महिन्याचे साधारण १२०० किमी ड्रायव्हिंग होइल. अगदी २५ किमी मायलेज मिळाले तरी इंधनावर किमान ३००० ते ४००० खर्च येइल. वर ड्रायव्हिंगची स्ट्रेस, मेंटेनन्स इ. आलेच.
गाडी घेतली तर चांगलेच आहे पण हा दुसरा ऑप्शनही पडताळुन पहा. खर्च थोडा जास्त येइल पण मग कन्विनियन्सही आहे. (समजा गाडीचे पैसे फिक्स्ड मधे ठेवलेत तर त्याचे व्याज या प्रवास खर्चाचा बोजा कमी करु शकेल).
http://www.cardekho.com/new-c
http://www.cardekho.com/new-cng+cars
हे एक सापडलं. बर्याच गाड्यांत सिएन्जी आहे. ऑल्टो गाडी कशी वाटते? कोणाचा ऑल्टोचा अनुभव आहे का?
Pages