गोठलेलं तळं (बर्क लेक, फेअरफॅक्स काउंटी )

Submitted by मानुषी on 6 February, 2014 - 15:35

दोन तीन दिवस चालू असलेला हिमवर्षाव थांबला. आणि चक्क ऊन पडलं. मग आधी सहज चक्कर मारायला म्हणून बाहेर पडलो. तर हवा खूप छान होती म्हणून बर्क लेकला जायचं ठरवलं.
तिथे पोचल्यावर लक्षात आलं की आज हवा थोडी बरी असली तरी तळं अजूनही गोठ्लेलंच!

त्या गोठलेल्या काचेसारख्या गुळ्गुळीत पृष्ठभागावर उतरून बघावं का असा अगदी मोह होत होता......
या गोठलेल्या तळ्यावर बरेचसे सी गल्स बागड्त होते.
काही जण तळ्याच्या काठावरून हातातले खाद्यपदार्थ या सी गल्सच्या दिशेने भिरकावत होते.
तेव्हा हे पक्षी आपल्या पायांवर शरिराचा तोल सावरत चक्क आइस स्केटिंग करत होते. ते ़ खूपच मजेशीर दिसत होतं.


काही पक्षीप्रेमींचा एक ग्रुप आपापली आयुधं सरसावून आपलं काम करत होता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.....बागराज्यात पण गोठलेले तलाव आहेत... त्यावरुन चालत जावसं वाटतं पण हिंम्मत होत नाही Sad

मस्त फोटो.... आवडले.

खरं तर खूपच जेनेरिक फोटो आहेत. मुक्तपीठीय फोटोग्राफी अशी नवी कॅटेगरी चालू करायला हवी.

Happy नयी है वो...... Happy

सुरवात अशीच होते.. जिप्सीही एका दिवसात जिप्सी झाला नाही...

सर्वांना धन्यवाद!
साधना ......हौसलाअफजाईके लिये स्पेशल धन्यवाद! आणि मला "नयी" म्हट्ल्याने अगदी :इश्श्यः
अमा >>>>>खरं तर खूपच जेनेरिक फोटो आहेत. मुक्तपीठीय फोटोग्राफी अशी नवी कॅटेगरी चालू करायला हवी.>>>>>
अमामी.....टेक इट ईझी.......
१) मला याची पूर्ण कल्पना आहे की हे फोटो मी कोणत्याही फोटोग्राफीच्या स्पर्धेसाठी पाठवलेले नाहीत.
जस्ट एक अनुभव इथे शेअर करायचा होता.
२)आजुबाजूला चांगलं ऊन, डोक्यावर निरभ्र आकाश आणि अचानक समोर गोठलेलं तळं दिसणे हा अनुभव मला तरी खूप ़़कॉमन नाही. किंवा रोजच येणारा, रूटीनमधला नाही. म्हणूनही इथे शेअर करावासा वाट्ला.
३) फोटोंसाठी मुक्त विद्यापिठीय नवी कॅटॅगरी म्हण़जे काय?
४) Beauty lies in the eyes of the beholder!

मस्त फोटो!! खरंच गं असा अनुभव म्हणजे पर्वणीच आहे! सीगल्स पण अगदी एन्जॉय करताहेत! आणि दिनेशदा म्हणतात त्याप्रमाणे बर्फाखालीपण सुंदर आणि वेगळाच नजारा असेल. Happy

ं धन्यवाद शांकली.
हो ...म्हणूनच अगदी बर्फावर उतरून चालण्याचा मोह होत होता...पण आवरला.