इस्मत चुगताइंचे पुस्तक - 'रजई'....एक वेगळाच वाचनानुभव

Submitted by यक्ष on 5 February, 2014 - 06:49

अत्ताच इस्मत चुगताई ह्यांचं मराठीत अनुवादित 'रजई' पुस्तक वाचून संपवलं.त्यांचं मी हे वाचलेलं पहिलंच पुस्तक!

'इस्मत चुगताई' ...एक अप्रतिम वाचनानुभव!

नव्वाबी / लखनवी 'तोर्‍याचा थोडाफार अंदाज असल्याने गोष्टी वाचतांन्ना एक वेगळीच अनुभुती!

शब्द थेट....मार्मिक....चपखल...खपल्या उखडवून जखमा वाहती करणारे पण संयमी!धीट..अवखळ....स्तंभित करणारे....तर काही ठिकाणी अगदी निरागस...!!

शब्दांच्या गुंतितून विचारांची गुंतगुंत केव्हा सुरु होते ते कळतच नाही.

धन्यवाद अनुवादिकेला ते योग्य शब्दांत समर्थपणे पेलल्याबद्दल !!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता महाजन यांनी अनुवाद केलेल रजई वेगळ्याच प्रकारचा अनुभव देत
मुस्लिम पार्श्वभूमीवरच्या कथा अनोखा अनुभव देतात.
सो कॉल्ड " अश्लील " लिहिल्याबद्दलचा इस्मत यांचा अनुभव सुद्धा मजेशीर आहे

मी वाचलय इस्मत चुगताईंचं 'रजई'.
आताशा आपल्याला जरा कल्पना आलीय या गोष्टींची पण त्यांनी लिहीलं त्या काळात या विषयावर लिहीणं आणि ते ही इतक्या परीणामकारक, ग्रेट!
त्यातल्या इतर कथाही वाचाव्याच अशा आहेत पण वास्तव कधीकधी अति डिप्रेसींग होतं.
ती कोंबडीच्या पिलाची गोष्ट ज्याप्रकारे लिहीलीय ते सहीच!