जॉनी जॉनी एस पापा

Submitted by sanjay_35928 on 5 February, 2014 - 06:09

२६ जानेवारी आज सोसायटीमध्ये पूजा होती. संद्याकाळी लहान मुलासाठी काही कार्यक्रम होते. सौची तयारी व्हायची वाट बघत आम्ही बापलेक तयार होऊन हॉलमध्ये बसलो अखेर सिरस्त्याप्रमाणे वेळ आमचा कमी होत होता आणि तिचा वाढत होता. रंग रंगोठीचा कार्यक्रम लवकर संपण्यातला नव्हता. जर आम्ही अजून वाट बघत बसलो असतो तर खालती कदाचित कार्यक्रम संपला असता. मुलगा सारखा माझ्या मागे लागला होता पपा चला लवकर खाली जाऊया. लिफ्ट यायची वाट न पाहता आणि होणाऱ्या परिणामांची तमा न बाळगता मी आणि माझा लेक सरळ दादर उतरून खालती सोसायटीच्या आवारात आलो तोपर्यंत कार्यक्रम चालू झाला होता. एक एक करून लहान मुले आपापली कला सदर करत होती. कोणी गाणे म्हणत होते तर कोणी स्टोरी सांगत होते. आपापल्यापरीने मुल किल्ला लडवत होती. कोणी विसरत होते, कोणी अर्धवट गाणे म्हणत होते. मुलांच्या आईवडिलांच्या डोळ्यात कौतुक दिसत होते. आतापर्यंत तरी मी ते सर्व कान देऊन ऐकत होतो बघत होतो. पटकन माझ्या मनात आले कि आपण पण मुलाला स्टेजवरती पाठवलं तर. थोडा शाशंक होतो. यापूर्वी तो अश्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला नव्हता. पाठवू कि नको ह्याचा विचार करत होतो कारण एक दिवस अगोदर सोसायटीतल्या सर्वांनी आपापल्या मुलांची नावे दिली होती. आणि मी ते विसरलो होतो. मुलांची लिस्ट संपत आली होती. वेळ फार कमी होता माझ्याजवळ. तो पर्यंत सौ चे आगमन झाले. दुरूनच मी तिला बघितले. ती मला सोधत होती. पटकन मी स्टेजकडे मान वळवली. तरी पण लवकरच तिने मला शोधून काढले. जवळ आल्याची चाहूल लागली तसा चेहऱ्याकडे न बघता पटकन मी म्हाणालो “काय मस्त गाणे म्हणतोय ना तो?”. उतराची वाट न बघता पुन्हा दुसरा गुगली टाकला. “आपण पण आदुला पाठवूया का?. उत्तर आले हो. पण स्टेजजवळ मुलाला घेऊन जाणार कोण? ह्या प्रश्नामुळे दोघांचा पण आ वासला. आणि प्रथमच मी तिच्याकडे बघितले आणि हसलो. ती पण हसली आणि मी निर्धास्त झालो. कदाचित तिला मला विचारायचे होते असणार. अहो मी कशी दिसते?. जास्त काही बोलण्यात अर्थ नव्हता कारण त्यावेळी तिचे कौतुक करण्याची वेळ न्हवती.
मला माझा लहानपणीचा ग्याद्रिंगचा दिवस आठवला. आता त्याला जवळ जवळ विसेक वर्षे होतील. त्यावेळी मी सहावील किंवा सातवीला असेन. मला अजूनसुद्धा ते जसेच्या तसे आठवते. माझी नाटकामध्ये पोलिसाची भूमिका होती आणि मला व माझ्या बरोबरच्या सहकारी पात्राला एक गाणे होते. आयुष्यात पहिल्यांदाच स्टेजवरती जाण्याची वेळ होती. स्टेजवर एन्ट्री मारली आणि समोर लक्ष गेले. समोर बसलेली गावातली प्रेक्षक मंडळी सर्वच परिचयाचे. त्यावेळी माझी काय अवस्था झाली होती ते अचूक शब्दात सांगणे माझ्यासाठी अवघड आहे. पण एवढे मात्र नक्की कि मी पूर्णपणे सफाठ झालो होतो. मागून prompting चालू होते पण कानामध्ये घुसतच नव्हते. समोरच पेटी वाजवणारा बसला होता. तो माझ्याकडे डोळे वटारून बघत होता. त्याचाकडे बघितल्यानंतर तर अजूनच माझी हालत खराब झाली. कारण त्यानेच आमचे नाटक बसवले होते. गेले दोन महिने त्याने आमच्यावरती मेहनत घेतली होती. माझे अवसान संपले होते. एक दोन संवाद बोलून लगेच आम्हा दोघांना गाण्याची सुरवात करायची होती. त्यामुळे तो पेटीला सूर लावण्याच्या तयारीत होता. पण माझा सूर आणि मूड केंव्हाच आकाशाला भिडून परत जमनीवर यायच्या तयारीत असताना सहकारी पात्राने गाण्याला सुरवात केली. मला धड दोन शब्द पण बोलता येत नव्हते तिथे सुरात गाणे म्हणजे अशक्य कोटीतली गोष्ट. मला वाटत होते आता मात्र माझ्यामुळे नाटकाची वाट लागणार. पेटीवाला अजूनही माझी पाठ सोडत नव्हता. गाण्याच्या ओळी आठवत नव्हत्या. तबलेवाला माझ्या सहकारी पत्राच्या गळ्यातील आवाज आणि पेटीचा सूर ह्यांच्या ताळमेळ बघून भांबावलेल्या अवस्थेत तबल्यावर थापा मारत होता. कारण त्याला माझ्या तोंडामधून शब्द येतील कि नाही त्याची शाश्वती न्हवती. पेटीवाला त्या गाण्यातल्या ओळी एका हाताने पेटी वाजवत दुसऱ्या हाताने इशारे करून मला आठवून द्यायचा प्रयत्न करीत होता. तरी नशीब त्या गाण्यामध्ये असे कहि शब्द होते ते त्याच्या इशाऱ्यावरून पटकन मला आठवत गेले आणि एकदासे गाणे संपले. स्टेजच्या पाटीमागे मी किती वेळात परत आलो ते माझे मला माहित. हे सर्व सांगयाचे तात्पर्य एवढेच कि मी माझ्या मुलावर विस्वास ठेवत न्हवतो. पुन्हा भानावर आलो तेंव्हा मुलगा स्टेजवर होता. माझी नजर फक्त आणि फक्त त्याच्यावर खिळून होती. माईक हातात आल्यावर सुरवात झाली नावान. न थांबता एक न्हवे दोन पोएम म्हट्ल्यावरच पट्ट्याने माईक ममीच्या हातात दिला. बस्स नकळत माझे दोन हात मोठ्याने टाळ्या वाजवू लागले. आजूबाजूचे माझ्याकडे बघत होते. माझे त्यांच्याकडे अजिबात लक्ष न्हवते. पळतच तो माझ्याकडे आला आणि बिलगला. पटकन उचलून पापा घेतला. त्याला विचारला बाळा घाबरलास का? तर म्हणे नाही पप्पा. खरोखरच तो क्षण माझ्यासाठी खूप काही शिकवून गेला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बॉस... अस्लं डेरींग तर आपण ही केलं आहे शाळेत तेव्हा पार भम्बेरी उडाली होती.. ती आठ्वली.
त्या नंतर २२ वर्षां नंतर (फिरंगी) क्लायंट समोरच प्रेझेंटेशन दिलं. ते मात्र मस्त्त झालं आणी प्रोजेक्ट ही मिळालं.