पंचतारांकित अध्यात्म

Submitted by सचिन पगारे on 4 February, 2014 - 11:02

भारतात संत गाडगेमहाराज, तुकडोजी महाराज ह्या सारखे महान संत होवून गेले. जनसेवा हीच ईश्वरसेवा असे मानणारे हे महान संत होते.संत गाडगे महाराजांनी आपल्या प्रवचनातून जन जागृती केली. परंतु आता काळानुसार संतांचे प्रकार बदलले आहेत आताचे तथाकथित संत हे पंचतारांकित झाले आहेत.

मोठमोठ्या शामियान्यात त्यांचा सत्संग चालतो. सध्याच्या काळात बुवा बनणे हा किफायतशीर व्यवसाय झाला आहे. मोठमोठ्या सेलिब्रिटी ह्या बाबांचे भक्त असतात. बाबांच्या सेवेला सेवकांचा ताफा, प्रवासासाठी आलिशान गाड्यांचा ताफा,कोट्यावधींचे आश्रम असे बाबांचे स्वरूप असते.सेलिब्रिटी लोकांचा समाजावर प्रभाव असतो त्यांचे अनुकरण म्हणूनही बरेच जण अशा बाबांची भक्ती करतात. बाबांच्या चमत्काराच्या सुरस कहाण्या एकूण आपण २१ व्या शतकात राहतोय कि १० व्या शतकात असा प्रश्न पडतो.

विज्ञान, शास्त्र जसजशी प्रगती करत आहे तस तसे अंधश्रद्धेचे स्वरूपही बदलत चालले आहे. अंधश्रद्धाही आता अत्याधुनिक बनत चालल्या आहेत.देशातील भोळ्या भाबडी जनता सोडाच समाजात उच्च पदावर असणारे व्यक्ती ज्यांच्याकडून समाजाला एका आदर्शाची गरज असते तेही अशा बाबा बुवांच्या कच्छपी लागलेले बघून त्यांची कीव येवू लागते.

'झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये' .हे वाक्य सत्यात उतरवणारे सध्याच्या काळात जण कोणी असेल तर हे सध्याचे पंचतारांकित साधू नि संत ह्यात शंकाच नाही. पूर्वीचे भावपूर्ण अध्यात्म हे लयास जावून हे नवेच पंचतारांकित अध्यात्म उदयास आले आहे आणि त्यालाही भरपूर मागणी आहे . एखादा शिकलेला असेल तर आपण त्याला सुशिक्षित म्हणून ओळखतो. पण पुस्तकी ज्ञान असले तरी ती व्यक्ती सुशिक्षित असेलच असे नाही हे ह्या बाबांच्या भक्तांकडे पाहून पटते.

ह्या भोवतालच्या अंधश्रद्धा पाहून पद्मश्री नरेंद्र दाभोलकर सर ह्यांच्या कार्याची किती आवशक्यता आहे ह्याची जाणीव होते.पुरोगामी महाराष्ट्रातून अंधश्रद्धेचा कलंक पुसून टाकण्यासाठी चालविलेली दाभोळ्करांची चळवळ प्रतिगाम्यांच्या उरात धडकी भरवून गेली..

आजच्या काळात जर समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी खरोखरच एखाद्या गुरूची आवशक्यता असेल तर तो गुरु गाडगे महाराजांसारखा असावा..

आसाराम १० हजार कोटींचे धनी

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/asaram-bapu/articleshow/29...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पगारे,
ह्या पंचतारांकित अध्यात्माबद्दल तुम्हाला काय म्हणायचे आहे?

Vatican under global scrutiny after UN sex abuse report

VATICAN CITY: The UN's damning report on the Vatican's handling of child sex abuse cases has turned up the pressure on the Church to convince a sceptical international community it has adopted a zero-tolerance approach.

"The Vatican has taken some steps forward, but they have been largely symbolic: energetic words rather than actions. The UN is right to have spoken out so strongly," Vatican commentator Paolo Flores D'Arcais told AFP.

मी मराठीत कविता वाचन करतो आहे आणि ओबामा टिव्हीवर बघतो आहे असाही फोटो बनवला होता ब्वॉ Proud

रच्याकने,
पगारे, अहो वरच्या ह्या प्रश्नाचे उत्तर नसेलच तुमय्चाकडे Wink

>>>> रच्याकने,
पगारे, अहो वरच्या ह्या प्रश्नाचे उत्तर नसेलच तुमय्चाकडे <<<<<

चायवाला, माझ्या मते, सचिनजी पगारेजी कोणत्याही एका पक्षाचे/संस्थेचे वगैरे "प्रवक्ते" नसून बहुधा पत्रकार वा पत्रकारासमान असावेत व निरनिराळ्या जिव्हाळ्याच्या विषयावर लोकांमधे "जागृती" निर्माण होण्याकरता तसेच लोकांच्या विचारांना विशिष्ट एकान्गी दिशा मिळण्याकरता ते मोजक्या शब्दांमधे बरेच काही प्रश्न/उत्तरे पेरू पहातात.

दुर्दैवाने महाराष्ट्रातील जमिन ही भुशभुशीत कमी अन खडकाळ जास्त अशी असल्याने (संदर्भ दख्खनचे पठार, भुगोल इयत्ता ४थी) ते पेरत असलेले विषय इथे जरी पोस्टस्ची शम्भरी गाठत असले तरी प्रत्यक्षात फारसे रुजू शकत नाहीत, कॉन्ग्रेसगवता इतकी भरभराट होत नाही, तसेच असा गेल्या शतकभराचादेखिल इतिहास आहे.

तरीही त्यान्ची त्यान्चे विषयाप्रतीची निष्ठा वादातीत आहे. व आपल्या इथे असे विचारवंत त्यान्चा मोलाचा वेळ दवडून उपलब्ध होताहेत याबद्दल आपण त्यान्चे आभारच मानले पाहिजेत. Happy

Proud

मी टास्कर नावाचे एक वीर पंडीतही इथे असेच पेरणी करत फिरत होते... पण या टास्कराना इथे भाकर मिळाली नाही. आठवते का लिंबुभाऊ?

>>>>> आठवते का लिंबुभाऊ? <<<< नाही आठवत काहीच.
मला फक्त माझा शत्रुपक्ष चान्गल्याप्रकारे आठवतो अन विषकन्या ही आयडी. अन तो शत्रुपक्ष अजुनही आहे त्याच आयड्यांनी (विषकन्या आयडी सोडून) वावरतो. Happy
बाकि कोणतीही आयडी माझ्या लक्षात रहात नाही. Happy (अपवाद निवडक आयडी)

अहो जोशी साहेब,

व्हॅटिकन किंवा मक्केला कुणी पकडून धुतले, अथवा मुसलमान्/ख्रिश्चनांतल्या धर्म-पुरस्कृत भ्रष्टाचाराला/विकृतीला बडवले, तर त्यामुळे आपल्या हिंदू धर्मातील काळेबेरे, पांढरे कसे काय होते?

त्यात दातखिळीचा काय संबंध?

व्हॅटिकन / चर्च इ. मधील पेडोफिलियाच्या चर्चा मेडियामधे फार पूर्वीपासून आहेत. त्याचा तुमच्यामाझ्याशी काय संबंध? चर्चमधे तुम्ही जात नाहीत अन मी देखिल. तुम्ही दिलेली बातमी नीट वाचा. चर्चमधे जाणार्‍या ख्रिश्चन लोकांनीच त्यांच्या धर्मात चाललेली घाण साफ करणे चालवले आहे, असा त्या बातमीचा अर्थ आहे.

त्यांनी त्यांचे घर साफ करणे आरंभले आहे, साहेब! हे आपण सर्वांनीच समजून घेतले तर बरे होईल. Happy

इथे, आपल्या घरातली घाण साफ करूया असे कुणी म्हटले, की सातासमुद्रापलिकडल्या धर्मातल्या चोरांचे घर किती वास मारते, हा घ्या पुरावा! असे म्हणून आपली घाण जपून ठेवणे, असा प्रयत्न तुम्ही दातखीळ वगैरे द्वारे करीत आहात.

हे सगळे हास्यास्पद आहे, असे वाटत नाही का तुम्हाला? की केवळ भगवे ते उत्तम इतकेच दिसते तुम्हाला?

तरीही त्यान्ची त्यान्चे विषयाप्रतीची निष्ठा वादातीत आहे. व आपल्या इथे असे विचारवंत त्यान्चा मोलाचा वेळ दवडून उपलब्ध होताहेत याबद्दल आपण त्यान्चे आभारच मानले पाहिजेत. स्मित

अनुमोदन. लगे रहो पगारेजी!

हे सगळे हास्यास्पद आहे, असे वाटत नाही का तुम्हाला? की केवळ भगवे ते उत्तम इतकेच दिसते तुम्हाला?

बाहेरची उदाहरणे देण्याबाबतीत कदाचित त्यांचे म्हणणे असे असेल की अहो हे जगात सगळीकडेच चालते. जग असेच असते.
असे म्हणून आपलेच समाधान करून घ्यायचे, कुणी सुधारा म्हंटले की पोटात गोळा उठतो. अरे देवा, म्हणजे आम्हाला आता काम करावे लागणार!!!

त्यापेक्षा ठेविले अनंते तैसेचि रहावे, सारे काही देवाच्या हाती, असले म्हणत काही न करता मस्त बसून आराम करायचा!!! उद्योग चिकार आहेत हो. क्रिकेट, बॉलिवूड, दारू पिणे नि मायबोलीवर लिहिणे (त्याच क्रमाने!)!

सारे जण झक्कीचे भक्त - ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या म्हणत काही न करता स्वस्थ बसून आराम करायचा!

आता कुणि मला काही दक्षिणा देत नाहीत किंवा मी पंचतारांकित नाही, पण कुणाला मला हजार कोटी रुपये द्यायचे असतील तर घेईन मी!!

चायवाला धर्माच्या नावाखाली लोकांची लुबाडणूक करणारा शोषण करणारा मग तो कुठल्याही धर्माचा असो धर्माची प्रतिमा मलीनच करत असतो. ज्यांना समाजात संत म्हणून पूजले जाते ते लोक जर लैंगिक शोषण ह्यासारख्या घृणास्पद आरोपात सामील असतील तर ती धर्माची विटंबनाच होय.अशा लोकांना आपल्या धर्माचा म्हणून पाठीशी घालणे म्हणजे त्यांच्या विकृतीला पाठबळच देण्यासारखे असते .

बाहेरची उदाहरणे देण्याबाबतीत कदाचित त्यांचे म्हणणे असे असेल की अहो हे जगात सगळीकडेच चालते. जग असेच असते.
असे म्हणून आपलेच समाधान करून घ्यायचे, कुणी सुधारा म्हंटले की पोटात गोळा उठतो. अरे देवा, म्हणजे आम्हाला आता काम करावे लागणार!!!
<<
काका,
बरोबर आहे, पण तुमचा प्रतिसाद फारच मेलो (mellow) आहे. कदाचित तुमच्या अ‍ॅडव्हान्स्ड माबो एक्स्पिरियन्सचा परिणाम असावा.
इथं, ह्यांचे दातखीळ प्रकर्ण केवळ पगारेंना गप करणे इतपतच सीमीत आहे असे समजण्यास हरकत नसावी.

अवांतरः
हजार कोट रुपये?
इस उमर मे का करोगे इन रुपयोंका? स्वर्गके अन्दर म्हाल खरीदने का हय का?
मेरे कू साडेतीन हात बी जमीन नै लगती बावा!

हजार कोट रुपये?
आजकाल भारतात सर्वांच्या कडे किमान एक हजार कोटी रुपये असतातच असे ऐकले. म्हणजे डॉलर किती होतील माहित नाही. पण बरेचसे होत असतीलच. इस उमरमे मरण्याची भीति नाही, पण शरीराला त्रास नको वाटतो. त्यासाठी डॉक्टरच्या बोडक्यावर पैसे घालून काही उपयोग झाला तर बरे.

आणि मी माझे शरीर जाळू नका नि पुरू नका, मेडिकल कॉलेजला द्या असे म्हंटले आहे मृत्युपत्रात. दारूचे, सिगारेटचे शरीरावर कसे दुष्परिणाम होतात हे तरी लोकांना कळेल. बाकी वापरण्यासारखे काही उरले नसणार.

धर्माच्या नावाखाली लोकांची लुबाडणूक करणारा शोषण करणारा मग तो कुठल्याही धर्माचा असो धर्माची प्रतिमा मलीनच करत असतो. ज्यांना समाजात संत म्हणून पूजले जाते ते लोक जर लैंगिक शोषण ह्यासारख्या घृणास्पद आरोपात सामील असतील तर ती धर्माची विटंबनाच होय.अशा लोकांना आपल्या धर्माचा म्हणून पाठीशी घालणे म्हणजे त्यांच्या विकृतीला पाठबळच देण्यासारखे असते .<<< अनुमोदन

राधे मा नावाचे पंचतारांकित अध्यात्म सध्या मिडियात चर्चिले जात आहे.

का लोक अशा गोष्टिंत गुरफटले जात असावेत.ज्या भुमिवर तुकाराम,चोखामेळा ,गोरा कुम्भार, सावता माळी ह्या सारखे संत. फुले,आंबेडकर, गाडगेमहाराज यांसारखे सुधारक ह्या भुमित जन्मुनही कुणाच्या प्रयत्नाने ही भूमी पंचतारांकित अध्यात्मासाठी सुपिक झाली आहे?

राधे मा नाही तर तिचे महामुर्ख भक्त तिला देवी बनवु पहात आहेत. उद्या ही पाचकळ बाई बिकीनीवर पण नाचेल. कसली मा नी कसल काय?

Pages