मराठी भाषेच्या सवई मुळे इंग्रजी मध्ये झालेल्या गमती जमती साठी हा बाफ उघडत आहे. जर असा पुर्वी पासुन असेल तर कृपया कळवावे.
__________________________________________________________________
आमच्या ईंजिनिअरींग कॉलेज मधल्या प्राध्यापकांचे इंग्रजी म्हणजे नक्कीच एक संशोधनाचा विषय. खाली दिलेली जी उदाहरणे आहेत ती मी नविमुंबई मधल्या एका डिप्लोमा कॉलेज ला होतो तेव्हाची....
१) आमच्या वेळी डिप्लोमा्ला वार्षिक अभ्यासक्रम होता, माझे पहिलेच वर्ष... फिजीक्स (भौतीकशास्त्र) ह्या विषयाला आम्हाला पहिले सहा महिने कोणी शिक्षकच नव्हते. नंतर जे आले ते एकदम सहा फूट १०० किलो चे आजोबा. त्यांनी येताच आमचे प्रॅक्टिकल्स चालू केली.... आम्ही सगळे लॅब च्या बाहेर, रांगेत उभे होतो आणि सरोबा समोर टेबल वर बसलेले होते... ते तिथुनच ओरडले "रोल नंबर वन टू फ़िफटी हॅव एन्ट्री आदर हॅव डिसेंट्री" .... मी रणदिवे रोल नंबर ९० म्हणजे मला "डिसेंट्री".....
२) गणिताचा तास म्हाणजे हक्काचा मस्ती करायचा तास, त्या वेळी आमचे पुजारी सर फक्त फळ्या कडे बघून शिकवायचे, मागे वळून सुध्दा बघायचे नाहीत... पण त्या ऐतिहासीक दिवशी मी मस्तीत जाम सुटलो होतो आणि आमच्या सरांचा सुध्दा तोल सुटला, ते जोरात माझ्या वर ओरडले " रणदिवे स्टॅंडप" , मी चुपचाप स्टॅंडलो, व पुढिल आदेशाची वाट पहात होतो... पाच मिनीटे गेली सर माझ्या तोंडाकडेच बघत उभे, काही बोलेनाच.. अजुन पाच मिनीटांनी ते मला म्हणाले " फॉलो मी" ... मी चुपचाप त्यांना फॉलो करत दरवाजाच्या बाहेर गेलो व ते मला म्हणाले " नाऊ डोंट फॉलो मी".................
३) आमचे वैद्य सर म्हणजे त्यांच्या विषयातले गाढे-पंडीत, पण इंग्रजी हा त्यांचा नक्कीच विषय नव्हता... मला एकदा मेकॅनिक्स च्या प्रॅक्टिकल ला जायला उशीर झाला, वैद्यसर माझ्यावर भडकले व त्यांनी मला खडसावून विचारले
सर : " व्हाय लेट??"
मी : " ???????"
सर : " आय एम आस्किंग यू , व्हाय लेट??"
मी : " सर माय सायकल गॉट पंक्ट्चर, सो...."
सर ( समोर च्या मैदाना कडे बोट दाखवत): " नाउ रोटेट द ग्राउंड फ़ोर टाईम्स..."
मी आपला ग्राऊंड चार वेळा रोटेट करून परत सरां-समोर उभा राहीलो, सरांना कदाचीत माझी दया आली असावी ते मला म्हणाले " नाउ गो ऍंड अन्डरस्टॅंड द ट्री!!"
भारीये!
भारीये!:फिदी:
विनोद म्हणुन छान आहे पण हे अस
विनोद म्हणुन छान आहे पण हे अस खरच घडलयं का??
हो अदिती !!! असे बरेच किस्से
हो अदिती !!! असे बरेच किस्से आहेत.
मी मेकॅनिकलचा पण आमच्या
मी मेकॅनिकलचा पण आमच्या कॉलेजच्या सिविल डिपार्टमेंटमध्ये घडलेली गोष्ट.
लेक्चर संपल होत आणि थोड इकडच तिकडच बोलण चालू होत. ते सर स्वत:ची, घराबद्द्ल सांगत होत. संवाद इंग्लिशमधुनच चालू होता. त्यावेळी ते म्हणालेले,
"आय हॅव टू डॉटर्स, बोथ आर गर्ल्स "
हा हा हा .... प्रचंड आहे हे
हा हा हा .... प्रचंड आहे हे आबासाहेब
एक धागा होता
एक धागा होता असाच.
http://www.maayboli.com/node/44150
रोटेट द ग्राउंड ....तुम्ही
रोटेट द ग्राउंड
....तुम्ही सरांना म्हणायला हवे होते .सर, यु हॅव लॉट ऑफ ग्राउंड टु कव्हर
आबासाहेब, तुम्ही लोणीत
आबासाहेब, तुम्ही लोणीत इंजिनियरिंग केलंत का?
आमचे सिव्हिलचे सर प्रत्येक बॅचला 'आय हॅव टू डॉटर्स, बोथ आर गर्ल्स' सांगायचे. त्यांना खूप अभिमान होता दोन मुलीच असल्याचा.
बाकी किस्से धमाल आहेत.