काळा घोडा २०१४

Submitted by इंद्रधनुष्य on 3 February, 2014 - 06:10

मंडळी... काळा घोडा फेस्ट सुरु झाला आहे. पहिल्या दिवशी तुफान गर्दी होती. बर्‍याच जुन्या कलाकृतींना नविन साज चढवून मांडण्यात आल्या होत्या. तर काही कलाकृती मधे नाविन्य होते. अश्या वैशिष्ट्यपुर्ण कलाकृतींची ही एक झलक.

प्रचि १

प्रचि २ प्लॅस्टीकच्या बाटल्यां पासुन बनवलेल झुंबर.

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओ हो मस्तच...व्वा क्या बात है........ माझी मुलगीपण हेच पहाण्यासाठी मुंबईला गेली आहे.
ती व तिच्या मैत्रीणी हे काळा घोडा २०१४ फेस्टीवल पहाण्यासाठी गेल्या आहेत.
माझी मुलगी कमर्शियल आर्ट करते आहे त्यामुळे हे फेस्टीवल पहाणे त्यांचेसाठी आवश्यक आहे ना.खूप काही शिकायला मिळेल.

दिनेश +१. मस्त कल्पना आहे. असं इथे कोरियात आणि परदेशात बर्‍याच ठिकाणी (फोटोत) बघितलय. भारतात टिकेल की नाही, इतकीच भिती आहे. Happy

मस्त आलेत फोटो. हे पहिल्याच दिवशी काढलेले :

गर्दी होतीही आणि नव्हतीही. म्हणजे गर्दी होती पण अपेक्षेपेक्षा कमीच होती.

विविध इन्स्टलेशन्स :

काही स्टॉल्स आणि त्यातील वस्तू :

>>>> http://www.maayboli.com/node/47523#new <<<< येथिल श्री आगाऊ या आयडीच्या लेखात दर्शविल्या प्रमाणे, मी मुम्बैला जरी जाऊ शकलो नसलो, तरी इथे मायबोलीवर "काला घोडा" ला हजेरी नोन्दवित आहे, याची कृपया नोन्द घेणे ही नम्र विनन्ती! Proud
[ हल्ली एखादी सुन्दर गोष्ट/फोटो ला कॉमेन्ट टाकणेही अवघड होत चाल्लय, लोक लगेच बघतात, की बघा हा माणुस नुस्ती सोशल हजेरी लावायला तर नै ना आला, मग भले त्याला त्या सुन्दरतेमधिल काहीही कळत नसो.... आता एखादी गोष्ट सुन्दर आहे असे म्हणले, तर मला ती तशी सुन्दर का वाटली हे देखिल उलगडून सान्गत बसावे लागेल, सिद्ध करावे लागेल, नशिब अजुन अन्निसवाल्यान्च्या आग्रहाप्रमाणे प्रयोगशाळेत सिद्ध करुन मागत नाहीयेत ]

(तेथिलच माझी ही पोस्ट http://www.maayboli.com/node/47523#comment-3021957 महत्वाची आहे बर्का )

मस्त आलेत फोटोज ,इंद्रधनुष्य!!!

मामी ची अ‍ॅडिशन पण आवडली..