नजरेचा पेला भरून

Submitted by मयुरेश साने on 29 January, 2014 - 12:48

मी तुला पाहतो दुरून
नजरेचा पेला भरून

एक तुझा चेहरा दिसतो
स्वप्नांच्या गच्ची वरून

तू माझी अन् मी तुझा
हे कधीच गेले ठरून

बघ अजुन एकटी झालीस
तू मला एकटे करून

फक्त एकदा बघशील
स्वप्नांना अपुले करुन

मयुरेश साने

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Interesting लगावली आहे. पण बऱ्याच ठिकाणी लय हलते आहे.

बघ अजुन एकटी झालीस
तू मला एकटे करून
=> आशय आवडला.

शुभेच्छा.

फटक साहेब ह्या रचनेला निश्चित अशी लगावली मला तरी जाणवत नाही आहे इथे मात्रावृत्त पाळण्याचा प्रयत्न असावा पण तरीही समीरजी म्हणत आहेत तसे लयही पाहावी असेच मीही म्हणत आहे
असो
काही खयाल चांगले आहेत मला आवडले सर्वात आवडला तो मला एकटे करून वाला शेर
असो

शुभेच्छा मयुरेश