पुण्यातले (बाणेर, बालेवाडी, औंध, किंवा पुणे शहर) डेंटिस्ट्स सुचवाल का?

Submitted by mansmi18 on 29 January, 2014 - 02:58

नमस्कार,

पुण्यातले (बाणेर, बालेवाडी, औंध, किंवा पुणे शहरही चालेल.) तुम्हाला चांगला अनुभव असलेले डेंटिस्ट्स सुचवाल का?

मी सर्च केले त्यात
डॉ. विजय कारंडे, डॉ. भुमी पटेल (दोन्ही बालेवाडी)
डॉ. पंडित डेंटल केअर (बाणेर रोड)
हे मिळाले. कोणाला अनुभव असल्यास कृपया लिहावे.

धन्यवाद.
(बरेच दिवस टाळाटाळ करत होतो पण "वेल" यांचा बाफ वाचुन जरा धैर्य आले Happy )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉ. निलेश बुलबुले : ०९८५०२०८५५६
बाणेर रोडला फाट्याच्या जवळच प्रिमरोज मॉल आहे ( जोशी फूड्सचे दुकान माहीत असेल तर त्याच्या शेजारी ) त्यात आहे क्लिनिक. एमडीएस आहेत. आम्ही घेतलीय त्यांची ट्रिटमेंट. कॅप बसवणे, मुलाचा दुधाचा दात काढून घेणे इत्यादी. माझ्या पेडी मैत्रिणीच्या रेकमेंडेशनने तिथे गेलो.
चांगले आहेत डॉक्टर.

बाणेर रोडवर आणि बालेवाडीत इतकी डेंटल क्लिनिक्स दिसतात की गोंधळून जायला होते Happy

थँक्स अगो. माझ्या घराजवळच ३ क्लिनिक्स आहेत. गोंधळ तर होतोच आहे Happy
तुम्ही सजेस्ट केलेले पीडीअ‍ॅट्रीक डेंटीस्ट आहेत का मोठे पण जाउ शकतात? मला स्वतःसाठी पाहिजे आहे.

ते मोठ्यांसाठीचेच डेंटिस्ट आहेत. फॅमिली डेंटिस्ट म्हणून मुलालाही त्यांच्याकडेच नेले. कॅपची ट्रिटमेंट माझ्या नवर्‍याने करुन घेतली होती.

मोठ्याम्चे डेंटिस्ट लहान मुलांची डेंटल ट्रीटमेण्ट करू शकतात except जन्मतःच फाटलेल्या ओठाची / टाळूची ट्रीटमेण्ट.

लहान मुलांची नॉर्मल डेंटल ट्रीटमेण्ट करायला रेग्युलर डेंटिस्टकडे एकच खासियत लागते आणि ती म्हणजे प्रचंड पेशन्स. मुलांच्या कलाने घेणं मूल कंटाळलं की आपणहून समजून जाणं त्यांच्या मनातली भीती काढणं.

मी स्वतः अत्यंत प्रेमळ डेंटिस्ट पाहिले आहेत जे मुलांचे मूड त्यांचे प्रश्न त्यांचे टँट्रम्स खूप छान हाताळतात आणि त्याउलट अत्यंत उर्मट आणि रफ बोलणारी पीडो डेन्टीस्ट सुद्धा पाहिली आहे.

अवांतर असले तरी असेच थोडे माहितीसाठी.