तोंडी परीक्षा

Submitted by सौरभ.. on 29 January, 2014 - 00:00

मम्मा - चला..उठा...सकाळ झाली...
बेटा - फक्त पाचच मिनिट झोपु दे ना आई..please...
मम्मा - अरे उशीर झालाय...आज तोंडी परिक्षा आहे ना एकाची ?
बेटा - ह्म्म...झोपु दे ना...काल जागलोय... खुप तयारी करत...
मम्मा - अरे वा ! शहाणं माझं बाळ ते...किती मेहेनत करतयं...सगळी तयारी झाली ना नीट ? मी सांगितलेले पाच मुद्दे नीट पाठ केलेस ना ?
बेटा - हो मम्मा..नीट पाठ केलेत...पण मला भीती वाटतेय..
मम्मा - कसली भिती वाटतेय माझ्या राजाला ?
बेटा - तोंडी परिक्षेची..पहिलीच आहे ना...
मम्मा - घाबरायच काय त्यात...नीट पाठांतर झालं आसेल की झालं
बेटा - पण मी काहीच अभ्यास केला नाहीये...इकडे तिकडे उंडारण्यातच सगळा वेळ गेला...
फक्त काल तु दिलेल पाठ केलयं..
मम्मा - हो ना ? मग झालं तरं...गुणी बाळ माझं..अरे आपल्याकडले प्रश्न खुप सोपे असतात...प्रश्न कोणताही येऊ दे..आपण आपल्याला माहित असलेल उत्तर ठोकुन द्यायच...
बेटा - पण अवघड प्रश्न आले तर..मला माहित नसलेले ?
मम्मा - सोप्प आहे..तरीसुध्दा आपण पाठ केलेलच उत्तर द्यायचं..पाठांतर केलय कशासाठी मग ? मी काल म्हणुन घेतल ना तुझ्याकडुन ? काही घाबरायच नाही...
बेटा - (आनंदित होऊन...हो मम्मा...I am so proud of you..)
मम्मा - चला..आवरा लवकर...मी breakfast ला पास्ता केलाय chicken घालुन..आवडतो ना माझ्या राजाला ?..नीट आवर..नीट भांग पाड...नविन कपडे काढुन ठेवलेत ते घाल..अजिबात घाबरुन जायच नाही...फारच अवघड प्रश्न आले तर बाबांच, आजीच स्मरण करायच..चला आवरा पटापटा..

तोंडी परीक्षा सुरु होते..

Arnab - Mr. Gandhi , My first question to you is...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सौरभ.....................फारच थोडक्यात घेतलेस रे.......... अजुन मस्त वाढले असते.........

सौरभ..:)....माझी आई कॉलेजमध्ये प्राध्यापिका होती. विद्यापीठात पेपर तपासतानाचा हा नेहमीचा अनुभव आहे असं ती म्हणाली. प्रश्न कुठलाही असो, आपल्याला जे चांगलं येतंय तेच परत परत उत्तराची लांबी वाढविण्यासाठी प्रत्येक उत्तराच्या शेवटच्या पॅरॅग्राफ मधे लिहून ठेवलेलं असे. पण त्यामुळे सर्व प्राध्यापकांची या अतिशय कंटाळवाण्या शिक्षेसारख्या कामात मस्त करमणूक होत असे. अशा एखाददुसर्या नव्हे, तर १५-२०% उत्तरपत्रिका असत, असंही म्हणाली.

Happy मस्त...

>>फारच अवघड प्रश्न आले तर बाबांच, आजीच स्मरण करायच.
एव्हढच नाहीतर बाबांच, आजीच नाव पुढे करून त्यामागे लपायचं.. Wink

प्रश्न कुठलाही असो, आपल्याला जे चांगलं येतंय तेच परत परत उत्तराची लांबी वाढविण्यासाठी प्रत्येक उत्तराच्या शेवटच्या पॅरॅग्राफ मधे लिहून ठेवलेलं असे. पण त्यामुळे सर्व प्राध्यापकांची या अतिशय कंटाळवाण्या शिक्षेसारख्या कामात मस्त करमणूक होत असे. अशा एखाददुसर्या नव्हे, तर १५-२०% उत्तरपत्रिका असत, असंही म्हणाली.>>>>

माझी एक मैत्रीण सांगत होती कि ती अकरावीला असताना तिच्या एका मैत्रिणीने एक हिंदी गाणे उत्तरात लिहिले कारण उत्तराची लांबी वाढावी...उदा. aaja nachale nachale mere yaar tu nachale zanakzanak zankar .... I was Shocked , Maitrin Rocked .... Uhoh Rofl

आमच्याकडे एका प्रीलिममधे मी डीडीलजे आनी गुण्डाचे डायलॉग लिहिले होते. वर्गात सरांनी असा काही थयाथया नाच केला होता, तो पेपर पाहून. (पेपर बीजगणिताचा!!!)

आमच्याकडे एका प्रीलिममधे मी डीडीलजे आनी गुण्डाचे डायलॉग लिहिले होते. वर्गात सरांनी असा काही थयाथया नाच केला होता, तो पेपर पाहून. (पेपर बीजगणिताचा!!!)>>> Lol

मी पण केला असता. मी २००७ मध्ये एका English मिडीयम शाळेत शिकवत होते.ई.दुसरीच्या मुलाने कशी कॉपी केली असेल माहिती का Science च्या बुक मध्ये History चे चिटस आणले होते. मला खूपच आश्चर्य वाटले कि एवढासा मुलगा ईतकी अक्कल कुठून आली असेल ?

.