पनिनी मेकर/ग्रिल

Submitted by ज्ञाती on 28 January, 2014 - 19:35

पनिनी मेकर या उपकरणाविषयी व त्यात करता येण्याजोग्या पाककृती शेअर करण्यासाठी हा धागा. स्वागत!!

पानिनी मेकर वापरून करायच्या २०० पाककृती http://paninihappy.com/panini-101/ या ब्लॉगवर आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वत्सला , पानिनी मेकर मधे सॅन्डविच दोन्ही बाजूंनी ग्रील होते. सॅन्डविच मेकर मधे ब्रेड ग्रील होत नाही . गरम होतो आणि सिल होतो. त्यामुळे ब्रेडचे पॉकेट तयार होते.

मी ह्या वरच्या लिंक मध्ये १२ नं फोटो त दाखवल्या प्र माणे भाज्या ग्रिल करून मग त्या भाज्या + चिज + पॅस्टो + सनड्राइड टोमॅटो असे पानिनी सँडविच करते.

fajita वर सार क्रिम , guacamole, सालसा, चिज आणि ह्या ग्रिल केलेल्या भाज्या असा रोल करून तो fajita रोल पनिनी मेकर मध्ये ठेवायचा मस्त क्रिस्पी होतो

लुज पडलेला / थंड झालेला पिझ्झा पण बरेचदा क्रिस्पी होण्या साठी ह्या मध्ये ठेवतो..

बाकी त्या वरच्या लिंक वरून पण आता बर्‍याच आयडीया मिळाल्या आहेत.. थॅक्स राजसी Happy

माझ्या कडे ऑलमोस्ट असा आहे- http://www.coopelectricalshop.co.uk/Gino-D-Acampo-EK1209-2-Slice-Grill-i...

मस्त धागा ज्ञाती
छान आहे हे पानिनी मेकर...वॅफल ,ग्रील, ऑमलेट, केक, ब्रॉऊनी असे बरेच काही करता येते ह्यावर. ऑल इन वन वाटतेय ..राजसी धन्यवाद.
सँडविच मेकरमध्ये थोडे मोठे सँडविच बनवले तर बंद होत नाही.... पानिनी मध्ये मोठे पण बनवता येतेय. Happy

अंजू, कसल जबरी दिसतय सँडविच. मस्तच एकदम. Happy
वरच्या लिंक मधले पनिनी मेकर मधले पदार्थ मला झेपले नाहीत. केक वगैरे? एग्ज नीट शीजली गेली नाहीत तर?

मी इथे कसलंच मैलीक काँट्रिब्युशन देऊ शकत नाही .. माझ्याकडे सँडविच मेकरही नाही नी पानिनी मेकरही .. (खूप चांगला (म्हणजे भरपूर तेलकट असलेला ;)) फोकाच्या किंवा दुसरा कुठलाही ब्रेड वापरला नसेल तर) पानिनी खाऊन माझं तोंड आतून सोलतं .. :| म्हणून मी त्या वाटेला जात नाही ..

अरे वा अंजली ..

दोन टर्की आणि एक व्हेजी सँडविच आहे का? व्हेजी मध्ये ते स्ट्रिंगी आहे ते चीज आहे की कसले नूडल्स् ?

ह्या पानिन्या माझ्याकडून. शिळ्या आहेत पण गोड मानून घ्या.
Panini.jpg

फिलिंगला मल्टीकलर्ड बेल पेपर्स, कॉर्न आणी वाफवलेली ब्रॉकोली आणि थोडी गार्लिक पावडर व श्रेडेड चीज.

योग्य लोकांनी चिप्समात्र अगदी परफेक्ट वापरले आहेत. सावर्क्रीम्वाले किंवा हॅलापिन्योवाले कसले भन्नाट लागतात.

शूम्पे, तुझ्या पनिन्यांचा हा फोटो आवडतो. ताटली ओळखीची वाटते. Proud

शुम्पे, मस्तच फोटो. त्या प्लेटा माझ्याकडे पण आहेत. Proud
मी टाकते नंतर माझ्याकडचे फोटो/रेसीपीज.

सायो, अनुश्री पनिनी मेकर आणि कॉस्टको मधले काही स्टेप्ल्स वापरून (बेझिल पेस्तो,हमस, सोर डो ब्रेड इत्यादी) लंच एकदम क्वीक होते. घेवून टाका.

माझ्याकडे आहे हा पनिनी प्रेस. ग्रील्ड सँडविचेस तर मस्त होतातच पण यामध्ये २ पोळ्या + चीज + भाज्या + बीन्स + हवे ते सॉस घालून केसिडिया पण मस्त होतं. पिटा ब्रेड वापरून मेडिट्रेनियन स्टाईलची सँड्विचेस पण मस्त.
भरपूर चीज घालून ग्रील्ड चीज सँडविच माझं आवडतं. पण हे प्रकार घरीच ताजे ताजे मस्त लागतात. ऑफिसला आणले की कधी कधी चिवट होते.

माझ्या कडे कुझिन आर्टचा आहे. त्याच्या ग्रील एक बाजू रेघा असलेली ( वर फोटोत आहे तशी) आणि दुसरी बाजू सपाट आहे. या प्लेट काढून डिशवॉशरला लावता येतात.

अरे वा!!मला पण उपयोग होईल ह्या धाग्याचा..थँक्सगिविंगला मीपण एक पानिनी मेकर घेतला आहे.
अंजली आणि शूम्पी फोटो एकदम तोंपासू आहेत.

मस्त फोटो आहेत. शूम्पी बेल पेपर्स कच्च्याच आहेत की परतून घेतल्यात ? घरात सगळं आहे. त्यामुळे संध्याकाळी सूप आणी पनिनीज करण्यात येतील.

सायो आणि शूम्पी (होऊ दे खर्च डायलॉग) +१..

मला आता आधीच असलेल्या अनंत साधनांमध्ये आणखी एक अजिबात अ‍ॅडवायचं नै....स्पिकिंग ऑफ दॅट घरातला वरिजिनल ब्लेंडर आणि चटणीसाठी आणलेला कॉफी ग्राइंडर (जो अलमोस्ट कधीच वापरला नाही) दोघं कुठच्या कोपच्यात आहेत. वॉफल मेकर आणि सँडविच मेकर आहेत पैकी वॉफल मेकर मिळालाय त्यामुळे जौदे...आपल्या कधीतरी कॅफेमधल्या इकतच्या पनिनी खायच्या आणि इकडच्य लोकांचे फोटोज पाहायचे....:)

मस्त फोटो... मजबुर केलंत विकत घेण्यासाठी.
बरं, एक सांगा कोणीही... भाज्या ग्रिल करता तर त्यांना पाणी सुटते का? त्याचे काय होते, ते कुठे गळते?

नाही गळत पाणी. काही लिक्वीड ऊझ आऊट होणार असेल पदार्थांमधून तर खालच्या ग्रिल प्लेट वरून गळून ते बाहेर पडतं आणी मग ते कलेक्ट करायला खाली एक प्लास्टिक ट्रे ठेवता येतो. हा ट्रे पनिनी मेकर बरोबरच येतो.

वेका, आमच्याकडे देखील नवीन खरेदी करताना ती वस्तू ठेवायची कुठे हा कळीचा मुद्दा असतो. Happy हे अगदी एखादा नवा साबण असू दे किंवा मोठं फर्निचर. नवर्‍याला वाटतं की मी होर्डिंग करते आणि मला वाटतं की याला कस्ली म्हणून हौस नाही. Happy
हा पनिनी मेकर घरी येताना जुना सँडविच मेकर जो त्रिकोणी कापल्यासारखे सँडविच करतो तो गुडविलला देण्याचे प्रॉमिस करावे लागले. मगच हा घरी आला. Happy

ओके हे बघून माझ्या घरी जे प्रकरण आहे त्याचे नाव सँडविच मेकर नसून पनिनी मेकर आहे हे समजले. साइज लहान आहे मात्र. व पनिनी मेकर आहे, पनिनी ग्रिल नाही.

Pages