अंडा पराठा

Submitted by शलाका पाटील on 28 January, 2014 - 05:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

२ वाट्या कणिक
४ टेबलस्पून मोहनासाठी पातळ डालडा
मीठ

आतील सारण :
३-४ अंडी
१ कांदा
४-५ हिरव्या मिरच्या
थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
१/२ चमचा गरम मसाला
मीठ

क्रमवार पाककृती: 

१.अंडी फोडुन घ्यावीत.
२.थोड्या तुपावर कांदा परतून घ्यावा, नंतर त्यावर फोडलेली अंडी, मीठ, मिरच्यांचे तुकडे, मसाला घालून हलवावे.
३.अंड्याचे मिश्रण शिजल्यासारखे वाटले की उतरवावे. कोथिंबीर घालावी व थंड होऊ द्यावे.
४.कणकेत मीठ व डालड्याचे मोहन घालून घट्ट भिजवावी. १/२ तास पीठ झाकून ठेवावे.
५.नंतर त्याच्या दोन पुर्‍या लाटून घ्याव्यात.एकावर वरील अंडयाचे मिश्रण थोडे पसरुन त्यावर दुसरी पुरी ठेवावी.कडा जुळवून घ्याव्यात व जरा लाटावे.
६.नंतर तव्यावर दोन्हीकडून शेकून घ्यावी व बाजूने तूप सोडावे.
सॉस बरोबर किंवा ओल्या नारळाच्या चटणी सोबत गरमागरम serve करावा

egg_paratha_131_0.jpg

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान पाकृ अन फोटो...
सेम हीच वाचलेली आठवतेय अन्नपूर्णा पुस्तकात... >>>>>>>> मला माझ्या एका मैत्रिणीने सांगितली पहिल्या वेळेला बेत फसला पण दुसर्यांदा केले तेव्हा जमले

topasu