केशरी पांगारा....

Submitted by पुरंदरे शशांक on 26 January, 2014 - 22:48

केशरी पांगारा....

(Erythrina variegata का Erythrina stricta हे जाणकारांनी कृपया सांगावे )

कालच्याच "सकाळ" ला श्री इंगळहलीकरांनी बातमी दिली होती - पुण्यात एन. आय. बी. एम. रोडला एक दुर्मिळ केशरी पांगारा फुललाय - मी आणि शांकली शोधत शोधत गेलो तेव्हा कळले की क्लाऊड नाईन या सोसायटीत तो आहे - तिथे सिक्युरिटीला समजावून सांगता सांगता आमच्या नाकी नऊ आले - त्यांना काही कळेचना की कुठले एखादे फुल आणि ते पहायला / फोटो काढायला काय ही असली मंडळी येताहेत ....

पण अखेर त्याने कोपर्‍यावर जाऊन यायची परवानगी दिली कशीबशी आणि जरा शोधाशोध केल्यावर दिसला हा एकदाचा ......

१]
IMG_5050.JPG

२]
IMG_5048.JPG

३] वैशिष्ट्यपूर्ण खोड

IMG_5045.JPG

४]
IMG_5041_0.JPG

५] पाने -
IMG_5047.JPG

६]
IMG_5030.JPG

एखाद्या झाडाचे, वेलीचे, रोपाचे जर सगळे भाग (पाने, फुल्रे, फळे, खोड, वगैरे) नीट दाखवणारे फोटो टाकले तर नवीन पहाणार्‍याला दुसर्‍या ठिकाणीही ते झाड, रोप, वेल लगेच ओळखता येईल....... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे, नेहमीच्या आणि या पांगा-यातला रंगाचा फरक स्पष्ट दिसतोय. बरीच धडपड केलेली दिसतेय तुम्ही दोघांनी! धन्यवाद आम्हालाही दर्शनाचा लभ दिल्याबद्दल Happy

अशी अकाली फुलणारी फुल किंवा अकाली देशांतर करुन भारतात येणारे पक्षी हवामानाच्या बदलाचे संकेत तर देत नाहीत ना ?

अरे वा तुमची जोडी म्हणजे एक छान निसर्ग प्रेमी जोडी आहे. Happy

पहिलांदाच पाहीली केशरी पांगार्‍याची फुले. आमच्याइथे लाल भडक असतात.

paangiraa barobar kee paangaaraa? mee paangiraa asech waachale ahe.

मस्तच..

केशरी आणि पांगारा म्हटल्यावर जरा चक्रावलेच होते. आधीच पांगारा आणि पळस यात माझा गोंधळ होतो. मोठ्या कष्टाने लाल पांगारा आणि केशरी पळस अशी मनाशीच फोड करुन ठेवली होती. आता त्यात पांगा-यानेही केशरी रंग ढापायचे म्हटले तर आमच्यासारखे अज्ञ लोक कुठे जातील????? Happy

वा शशांकजी, तुम्हाला आणि शांकली दोघांना धन्यवाद. केशरी पांगारा असतो हे मला माहितीच नव्हते.

बाकी Saee म्हणाली ते करेक्ट आहे, ती नेहेमीच सुंदर शब्दात आपले म्हणणे मांडते.

मस्त!
कालच लेकाने पुण्याच्या घरासमोरील पांगार्‍याची आठ्वण काढली होती. पिचकारी सारखे पाणी उडवायला मुलांना मज्जा येते Happy

मस्त वेगळाच रंग आहे.
मी पांढरा पांगारा बघितला आहे, पण हा नाही.
सोलापूर रोडवर ( म्हणे ) कोरल ट्री आहेत. बघितलीत का ? बालिचे फोटो ओघात येतीलच Happy

डॅफो, तू म्हणतेस तो स्पॅथोडिया. :स्मित:, मराठीत पिचकारीच म्हणतात त्याला. रंग सेम आहे पण झाड पूर्ण वेगळं आहे.

वॉव शशांक, किती वेगळ्याच रंगाचा आहे पांगारा.. आणी तुम्हा दोघांनी किती धडपड केली निग प्रेमींकरता.. थांकु..

साधना.+१ Happy