Submitted by मी मुक्ता.. on 25 January, 2014 - 03:09
कसं सहज जमतं तुला?
नेटक्या विणलेल्या वस्त्रासारख्या
तुझ्या आयुष्याकडे बघतेय मी,
हजारदा उसवूनही पुन्हा गुंतलेल्या अस्तित्वाला सावरत..
अट्टहासाने मी काढलेल्या शब्दांच्या रांगोळ्या,
विश्लेषणांची चित्रं..
फिकीच पडतात तुझ्या स्मितहास्यासमोर..
तर्कांचं जाळं पसरुन बसते मी,
तुला नेमकेपणे पकडण्यासाठी..
पण मुठीतून निसटावा सुगंध तसा,
दरवळत राहतोस तू, जाळ्यात बिलकुल न अडकता..
झाडाचं पानही गळताना पाहून
तुटत जातं माझ्यातलं सगळं..
आणि नातं पेलून नेतोस त्याच स्थितप्रज्ञतेनं,
सोसतोस तू सगळी वादळं..
मला जितकं सहज मरताही येत नाही,
तितकं सोपं, सरळ तुला जगता येतं..
इतकं सोपं, सरळ तुला कसं जगता येतं?
--------------------------------------------------------------------------------
http://merakuchhsaman.blogspot.in/
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कारण व्यर्थ प्रश्नांनी
कारण व्यर्थ प्रश्नांनी बहुमुल्य वेळ वाया घालवायचा मुर्ख छंद नाही मला.
व्वा ! सोप्या शब्दांत दोन
व्वा ! सोप्या शब्दांत दोन स्वभावातला फरक चांगला मांडलाय.
Fakir, Despite of your
Fakir,
Despite of your sadistic tone. whatever you have said is in a way correct..
UlhasBhide,
प्रतिसादाबद्दल खूप आभारी आहे..