Submitted by मउ on 23 January, 2014 - 10:59
तसे ट्रिपला बहुतेकजण जातात; पण काही जणांच्या ट्रिपमध्ये लक्षात राहाण्यासारखी गोष्ट घडते. ' त्या वेळी आठवतं ना...' असं म्हणत नंतरच्या बर्याच ट्रिपमध्ये त्या आठवणी जागवल्या जातात. इतरांना त्या आठवणीचा दाखलाही दिला जातो.
अशीच एखाद्या तुमच्या ट्रिपची गोष्ट असेल तर इथे तुमचेही अनुभव लिहा 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी ट्रीप ला गेलोच नाही
मी ट्रीप ला गेलोच नाही
मला वाटत कोणीच गेल नाहीये
मला वाटत कोणीच गेल नाहीये
मी गेलेलो ट्रीपला. एकदा नाहे
मी गेलेलो ट्रीपला. एकदा नाहे अगदी अनेकवेळा. शाळेत असतांना, पुढे कॉलेजात गेल्यावर अणि नंतरही मित्रांबरोबर खूप धमाल केली.
पाचगणीला गेलो होतो त्यावेळी
पाचगणीला गेलो होतो त्यावेळी मुलगी तीन वर्षाँची होती .एका साध्याशा हॉटेलच्या रिसेप्शन काउंटरला रुमची चौकशी करत होतो .इतक्यात एक आमच्या मुलीच्याच वयाची छोटी मुलगी मागून आली आणि "लेटस प्ले" म्हणत तिला खेळायला घेऊनही गेली .मैनेजरने सांगितले हिचे वडील इकडच्या एका शाळेत शिकवतात .त्यांनी एक खोली कायमची घेतली आहे .बघा मुलं किती लवकर मिसळतात .सिसॉ खेळायचा आनंद तिला मिळाला .टेबललैंड वगैरे पाहून आल्यावर संध्याकाळी पुन्हा खेळ .फोटो पाहून त्या ट्रीपची आठवण ताजी होते .
हज्जार वेळा होते असे! काय काय
हज्जार वेळा होते असे!
काय काय प्रसंग सांगू!
ट्रेकिंगचे अनुभव टाकले तर एक धागा पुरणार नाही अशी अवस्था आहे.
एक गंमतीशीर प्रसंग लिहितो.
एक शंकर नावाचा मित्र होता. आम्ही सात आठ जण राजमाचीला खंडूजी उमर्यांच्या घरी राहिलेलो होतो. त्या शंकर्याला नेमका ताप आला आणि आम्हाला सगळ्यांना बाहेर झोपवण्यात आले जेथून बांधलेले गायी, बैल आणि मोकळ्या सोडलेल्या कोंबड्या वीतभर अंतरावर होत्या. त्यातील एक 'राखी सावंत' टाईप कोंबडी शंकर्याच्या छातीवर उभी राहिली. तो आडवा पडलेला आणि ती त्याच्या छातीवर नाचतीय. तो शंकर्या किंचाळत होता 'अरे कोंबडी, कोंबडी, ही कोंबडी उचला' असे म्हणत आणि आम्ही सगळेजण ते दृष्य पाहून खिदळत बसलेलो होतो.
आजही मला त्या शंकर्याची ती अगतिक अॅक्शन आठवते.
(कोंबडीच्यामते त्या शंकर्याची छाती हा बागडण्यासाठी मिळालेला एक नवीन भूप्रदेश असावा)
धागाकर्ते स्वत:च्या दोन एक
धागाकर्ते स्वत:च्या दोन एक गोष्टींनी सुरुवात करतील तर बरे होईल .
अरे... धागा सुरु ही झाला
अरे... धागा सुरु ही झाला ....
मला वाटल कोणाचच लक्ष नाहीये
धागाकर्ते स्वत:च्या दोन एक गोष्टींनी सुरुवात करतील तर बरे होईल
>>>>>>>.
हो.. हो... नक्कीच टाकेन.. सध्या वेळ नाहीये...
राखी सावंत' टाईप कोंबडी >>
राखी सावंत' टाईप कोंबडी >>
असा एखादा धागा आधीच
असा एखादा धागा आधीच अस्तित्वात असावा असे वाटत आहे, नक्की नाही.
बेफ़िकीर टाका कि किस्से
बेफ़िकीर टाका कि किस्से