मैत्री

Submitted by rasika_mahabal on 22 January, 2014 - 18:12

जी लोक तुम्हाला सर्वात जास्त सलोख्याची वाटतात, ज्यांच्यासोबत तुम्हाला भावनिक गुंतवणूक आहे, ज्यांची गरज भासल्यास अगदी मध्यरात्रीही त्यांना संपर्क करण्यास तुम्हाला प्रशस्त वाटेल अश्या व्यक्तिंची यादी एका पेपरवर लिहा. ह्या एक्सरसाइझ करता सध्या कुटुंबातिल लोकांची नावे व्यर्ज करुयात. लिहिलित? किती नावे झालित? माझ्या यादीत 10 हुन कमी नाव आहेत.

मधे 'पॉवर ऑफ हेबिट' नावाच्या पुस्तकात वाचण्यात आल की आपल्या मेंदुस एका वेळेस 12 अगदी घनिष्ठ नाती सांभाळता येतात.

आपला ताणतणाव व धकाधकीच आयुष्य लक्षात घेता किती लोकांना तुम्हाला चांगल्या प्रतिचा वेळ देता येतो? तुम्ही तुमचा वेळ व शक्ति यादीमधील लोकांवर खर्च करावी का विविधतेने आयुष्यात जास्त रंग भरतो?

एका घनिष्ठ मैत्रीमधे तुम्ही काय बघता? ज्या व्यक्तीला तुम्ही घनिष्ठ समजता ती तुम्हाला गावातील नुसता एक मित्र म्हणून बघते की त्यांनाही तुम्ही जवळचे वाटता ?

एका घनिष्ठ मैत्रीकरता कशाकशाची गरज असते?

दुसऱ्या व्यक्तिच्या आयुष्यात अगदी मनापासून रस वाटणे - त्यांच्यासोबत सगळ्या गोष्टी अगदी मनमोकळेपणाने व्यक्त करण्याची गरज भासते.

दुसऱ्याच्या निर्णयांना स्विकारणे.

तुलना - मला तुझ्यापेक्षा जास्त चांगल किंवा वाईट आयुष्य, कुटूंब अथवा घर आहे. मैत्रिला तुलना कमजोर बनवते.

आदर - 'मी कष्ट करुन आज इथे पोचलो आहे, तू फक्त नशीबवान होतास' - जसा आयुष्यातील कुठल्याही नात्यात आदर महत्वाचा असतो तसाच मैत्रिमधे पण असतो. खाजगीत किंवा लोकांसमोर मित्राचा अपमान करणे मैत्रिस घातक आहे.

एक व्यक्ति म्हणून वाढ होणे - कुठलही नात तेव्हाच सफल होत जेव्हा त्यातील दोन्ही व्यक्तिंची निरनिराळ्या पातळ्यांवर वाढ होते जस की शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक, बौद्धिक, भावनिक… आधार न देता तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला सतत कुबडी बनवलत तर मैत्री टिकावू रहात नाही.

परतफेड - वरील सगळ्या गोस्टी जुळल्या असतील तर 'परतफेड' होते. म्हणजे एकच व्यक्ती जर संपर्क ठेवण्यास प्रयत्नशील असेल, त्यांच्या आयुष्यातील घटनांमधे, उत्सवांमधे तुम्हाला सहभागी करायला बघत असेल आणि तुमच्याकडून त्याचा प्रतिसाद व परतफेड नसेल तर मैत्री टिकणे अवघड ठरते, दोन्ही बाजूंनी तेवढाच उत्साह असणे गरजेचे आहे.

आणि मुख्यत्वे दोघांकरता मैत्रीचा हां अनुभव सुखद असणे गरजेचे असते.

आपण बनवलेल्या यादीकडे परत येऊया. ही यादी कायम असते की काळ व वेळेनुसार बदलत राहते? आणि बदलते तर ते प्रेम, आदर, स्वारस्य व तुमच्या त्या व्यक्तीसोबतचया भावनिक बांधिलाकिचे काय होते?

बरयाच गोष्टी मैत्रीला बदलतांना मी बघितल्या - छंद, सवयी, खाण्यापिण्याच्या आवडी, स्टेटस बदल - लग्नाळू/ लग्न झालेले/ मूल बाळ असलेले, नोकरी करणारे न नोकरी करणारे, भौगोलिक अंतर ह्या त्यापैकी काही आहेत. बरयाच वेळा वरील मुद्द्यांना जास्त चांगल्या प्रकारे match होणारे नविन मित्रमंडळी भेटल्यास तुम्ही आपसूकच त्यांच्या वर्तुळातून बाहेर पडता. अजून एक म्हणजे वयासोबत चर्चेचे विषय पण बदलतात, रात्री जास्त झालेल्या दारुपेक्षा आयुष्यावर बोलू काही चर्चासत्र बरे वाटते.

तुमचे तुमच्या लिस्ट मधील लोकांच्यामधे दुरावे आल्यास दुःख एखाद्या प्रेमभंगाएवढ असू शकत. तुम्ही ते कस हाताळता? काहीच घडल नाही अस? का काही महीने लागतात संबंध विसरायला?

संबंध बिघडलेत तर त्या व्यक्तिवरच प्रेम कुठे जात? मला वाटत तुमच्या मनातल्या एका कोपरयात ते जसच्या तस राहत आणि लोक पुढे जातात.

हां पोस्ट त्या लोकांना अर्पित जे माझ्या लिस्ट वर आहेत व होते. तुम्ही किंवा मी जाणूनबुजून अथवा अजाणता दुरावा केला असेल, माझी खजिली व्यक्त करते, पण तुम्हा सगळ्यांना एवढच सांगायच होत की माझ्या आठवणींना आज तुम्ही सुंदर बनवता. तुमच्या मैत्रीची मी आभारी आहे!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनातल्या मनात यादी बनवून पाहिली Happy बरेच लोकं आठवले अर्थात काही प्रेफरन्सेस केले जातील प्रत्यक्ष यादी बनवताना पण नातेवाईक सोडून असे १०-१२ लोकं एका फटक्यात आठवले आणि माझी खात्री आहे की ह्या यादीत भर घालता येईल! गंमत म्हणजे यादीतल्या काही मैत्रिणींशी महिनोन्महिने बोलणं होत नाही पण आता मैत्री अशा लेव्हलला आहे की त्याने काही फरक पडत नाही! जेव्हा भेटतो तेव्हा शेवटची भेट कालच झाली होती असं वाटतं Happy
मैत्री होण्यासाठी काहीतरी क्लिक व्हावं लागतं आणि ती टिकून राहण्यासाठी पारदर्शकता लागते!
मैत्री तुटण्याचा अनुभव देखील गाठीशी आहे Sad काय झाले होते ते अजून कळलेलेच नाही कारण सगळे समज-गैरसमज तसेच आहेत. माझी काही चूक नव्हती ह्या भ्रमात आहे मी.
Friendship is one the most beautiful non-blood relation you can have on the earth!

सुंदर लेख रसिका. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मैत्रीची व्याख्या आणी depth सुद्धा बदलत जाते.. तरीही काही गोष्टी विश्वास , पारदर्शकता ह्या कायम असतात...