माझं फेसबूक पेज...

Submitted by हर्षल_चव्हाण on 22 January, 2014 - 12:41

मी मरेन तेव्हा, माझं फेसबूक पेज मला डिअ‍ॅक्टीवेटेड हवं...

सहज कधी आठवण येते त्या मित्रांची जे आता या जगात नाहीत,
पण तरीही त्यांना फ्रेंडलिस्टमधून उडवता येत नाही,
"मला विसरलास यार तू" म्हणून, जणू रागे भरतील, असतील तिथे...
त्यांच्या पेजवर स्पष्टपणे दिसते त्यांच्या असण्या-नसण्यातली रेषा,
त्यांची शेवटची पोस्ट आणि त्यावरती जगाने घातलेला RIP :'( च्या पोस्टचा रतीब...
ते गेल्यानंतरही, केवळ फेसबूक सांगतं या दिवशी ते जन्मले होते,
म्हणून हॅपी बर्थडे विशेस...
आणि क्षणभर वाटतं, काय खरं समजावं?
या शुभेच्छा की तो मित्र गेल्याचं दु:ख?
कालांतराने ते ही आठवणीतून निघून गेलेलं...
त्याला स्वतःला कधी तरी येऊन ते पेज पाहता येईल का?
आणि एखाद्या तरी पोस्टला उत्तर देता येईल का?

जगतांना; प्रत्येक गोष्ट जगाला सांगण्यासाठी असलेल्या फेसबूकच्या भिंतीवर,
मेल्यानंतर, एकदाच... फक्त एकदाच, येऊन सारं साफ करून,
कुणाला तरी सांगायचे राहिलेले दोन प्रेमाचे शब्द लिहून जाता येणार असेल तर...

पण तसं होणार नाही म्हणून,
मी मरेन तेव्हा, माझं फेसबूक पेज मला डिअ‍ॅक्टीवेटेड हवं...

- हर्षल (२२/०१/२०१४ - रा. ११.००)
ब्लॉग

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतीशय सुंदर. खुप आवडली.

माझा एक खुप जवळचा मित्र या जगात नाही. पण त्याचे फेसबुक प्रोफाईल अजुन तसेच आहे.
त्यामुळे पहिल्या परिच्छेदाशी खुप रीलेट करू शकले.
अगदी याच भावना येतात मनात त्याचं पेज पाहतांना..
त्याच्या वाढदिवसाचं नोटिफिकेशन फेसबुककडुन येतं तेव्हाही अगदी असंच वाटतं.

पण तसं होणार नाही म्हणून,
मी मरेन तेव्हा, माझं फेसबूक पेज मला डिअ‍ॅक्टीवेटेड हवं...

>> खुप हळवं केलंत.

ह्या सार्‍या भावना शब्दबद्ध केल्याबद्दल आभार !!!

अगदी याच भावना येतात मनात त्याचं पेज पाहतांना..... >>+१११११११
खरचं हळवं केलत... खुप छान भावना मांडल्या आहेत

खुप छान भावना मांडल्या आहेत. +१

माझ्या गेलेल्या मित्रांच्या वाढदिवसांची फेबुवरची रिमाइन्डर्स पाहिली की मनात जी काही उलघाल होते... अगदी रिलेट करू शकले.

बेस्टच
माझ्याही मनात गेले काही दिवस हाच प्रश्न होता की खरंच अश्या प्रोफाईल्सचं काय होत असेल ...माणूस गेल्यावर त्या कश्या जगत असतील म्हणून !

खुप हळवं केलंत.<<+ १०००

बेफीजींचा एक शेर आठवला

मला पश्चात माझ्या ह्यातले काही नको आहे
'निघावे नाव थोडेसे'.....'गळावी आसवे खारी'

धन्यवाद