एल आय सी च्या नविन विमा ......

Submitted by ओशो on 21 January, 2014 - 11:15

नमस्कार,
एल आय सी च्या नविन विमा योजना ,
1. new endowement
2. New Endowement single premium.
3.New Bima Bachat.
4.New Jeevan Anand
या विषय अधिक माहिती साठी संपर्क करा

(मि एल आय सी विमा सल्लागार आहे.)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओशो, मला तुमची मदत हवी आहे.

मी जीवन सरल योजने मध्ये ५ वर्ष गुंतवणूक केली आहे आणि आत्ता काही कारणाने मला ते योजना surrender करायची आहे. माझ्या माहिती प्रमाणे ५ वर्ष नंतर जर पैसे काढले तर पहिल्या हफ्त्याचे पैसे वजा झाले नाही पाहिजे पण माझा सल्लागार सांगत आहे कि कधी पण पैसे काढले तर पहिल्या हफ्त्याचे पैसे वजा होणार.

नक्की पद्धत काय आहे ??

नमस्कार ,
प्रथम तुम्हाला मि सागु इच्छीतो कि तुम्ही ही policy आताच surrender करु नका,
कारण LIC ची कोणतीही policy अवधी अगोदर surrender केली तर नुकसान होनारच .....तरी माझ्या मते तुम्ही ही पॉलिसी चालु ठेवावी असे मला वाटते......तुम्हाला अधिक महिती हवी असेल तर मला तुमचा policy no द्या मग मि तुम्हाला detail देऊ शकतो .

आपला

ओशो

ओशो, एलायसीच्या पॉलिसीची सरेंडर वॅल्यू कुठे कळते ? पॉलिसी काढून ८ वर्षे झाली असतील तर किती नुकसान होते ?

http://www.licindia.in/ इथे जाऊन स्वतःसाठी युजर आयडी बनवा. पॉलिसी रजिस्टर करा. तिथे पॉलिसीची सरेंडर व्हॅल्यु मिळेल.

पॉलिसी कोणती आहे ह्याअर नुकसान अवलंबून आहे.

फक्त टर्म प्लान असेल तर इतके वर्ष तुम्हाला त्या पॉलिसीने कव्हर दिले आहे. तिचा उपयोग only in case of your own death तुमच्या वारसांना मिळणार. तर मग तिथे तुम्ही इतर कंपन्यांची पॉलिसीची तुलना करू शकता जसे. एच डी एफ सी / रिलायन्स - टर्म प्लान एलआयसीच्या तुलनेत खूप स्वस्त आहेत.

तुमची पॉलिसी मनी बॅक असेल किंवा एंडोमेण्त पॉलिसी असेल तर - पॉलिसी चालू ठेवल्यास किती जातील पॉलिसीच्या शेवटी किती मिळतील. सरेंडर केल्यास आत्ता हातात किती येतील. तेच पैसे एस आय पी त गुंतवले टॅक्स सेव्हिंग मध्ये आणि जो प्रिमियम भरत होतात त्याचे दोन भाग करून सेम सम अ‍ॅश्युअर्डचा मिनिमम प्रीमियमचा टर्म प्लान घेऊन उरलेल्या प्रिमियम तुम्ही एसाअयपीत गुंतवला तर काय बेनिफिट मिळतील हे कागदावर कॅल्क्युलेट करा.

तुम्ही तुअम्ची रिसिट आणि आयडेंटिटि कार्ड घेऊ न तुमच्या एलआयसी ब्रांचला गेलात आणि चौकशी केलीत तर तुम्हाला सरेंडर व्हॅल्यु कळते. बरेचदा स्वतःचा एलआयसी एजण्ट ही माहिती व्यवस्थित देत नाही हा माझा अनुभव.

नमस्कार
प्राजक्ता_शिरीन ,

तुम्हाला एक सल्ला दयावासा वाट्तोय कि क्रुपा करुण आपण आपली एवढी जुनी पॉलीसी बद करु नका,
कारण ही तसेच आहे ...... एलायसीच्या पॉलिसी maturity होईल तेव्हा तुम्हला छान returns मिळतील .तुम्हाला हवे असेल तर तुम्ही http://www.licindia.in/ या site वर जाउन एलायसी जो बोनस every year declare करते तो पहा.......आणी तुमची पॉलिसी रजिस्टर करा.म्हणजे तुम्हाला तुम्च्या user id वरुन तुम्हाला तुमच्या पॉलीसीची सध्याची स्थीती काय आहे ते स्वता जानुण घेता येईल ........आणी तुम्हाला private insurance co आणी LIC यामध्ये compaire करायचे असेल तर IRDA every year insurence co चे profit & loss , ईर्‍डा च्या site वर declare करते मग तुम्हाला समजेल की LIC ची पॉलीसी लोक का घेतात ......तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करावी वाटते कि अपाण अपली एवढी जुनी पॉलीसी बद करु नये .......आणी तुम्हाला काही मदत हवी असेल तर मला contact करु शकता.

आपला

ओशो

बरेचदा स्वतःचा एलआयसी एजण्ट ही माहिती व्यवस्थित देत नाही हा माझा अनुभव.
>>>

वेल +१०००

हो. एजंटांचा कमिशनवर डोळा असल्याने ज्यात कमिशन जास्त ती पोलिसी गळ्यात बांधली जाते. ज्या पोलिसीत विमा कंपनीचा लाभ जास्त (आणि गिर्‍हाइकाचा लाभ कमी) तिच्यावरच कमिशन जास्त असल्याने विमा कंपनीला जास्तीत जास्त लाभ देणार्‍या पॉलिसीच विकल्या जातात.

तेचं होतं आहे, ज्या एजंटकडून पॉलिसी घेतली आहे तो माहीती देत नाहीये आणि आमच्या एका ओळखीच्याने खात्रीपूर्वक सांगितलं आहे की जी / ज्या पॉलिसी चालू आहेत त्यांचा तसा उपयोग नाही, साईटवर रजिस्टर करून बघते आज. धन्यवाद सगळ्यांना Happy

<<एजंटांचा कमिशनवर डोळा असल्याने ज्यात कमिशन जास्त ती पोलिसी गळ्यात बांधली जाते. ज्या पोलिसीत विमा कंपनीचा लाभ जास्त (आणि गिर्‍हाइकाचा लाभ कमी) तिच्यावरच कमिशन जास्त असल्याने विमा कंपनीला जास्तीत जास्त लाभ देणार्‍या पॉलिसीच विकल्या जातात.>>
सध्या तरी अनेक जण असच करतात.

समोरच्याची खरी गरज काय त्याला काय परवडणार आहे पॉलिसी कोनाची काधली जात आहे त्या व्याक्तीच्या जाण्याने काय तोटा होणार आहे (टँजिबल तोटा) ह्याचा अभ्यास केल्या शिवाय केवळ एकाच कंपनीच्या पॉलिसी विकणे अयोग्य आहे. असे मला वाटते. एका वेळी एकापेक्षा जास्त कंपनीचा एजण्ट होता येत नाही का? पूर्वी शक्य नव्हते पण आता काही नियम बदलले नाहीत का?

ह्या सगळ्यात गरीब लोकांचा तोटा जास्त होतो. माझ्या अगदी जवळच्या पाहाण्यात एक उदाहरण आहे. नोकरी नसलेल्या किंवा घराला आर्थिक दॄष्ट्या सपोर्ट करत नसलेल्या व्यक्तीचा मृत्यु विमा का काढायचा? त्याऐवजी तेच पैसे दर महिन्याला फिक्स्डला ठेवून, एनएससी काढून किंवा आता तर इएलएसएस सारखे खूप चांगले ऑप्शन्स असताना त्या गरीब माणसाला घराला आर्थिक दॄष्ट्या सपोर्ट करत नसलेल्या व्यक्तीचा मृत्यु विमा काढायला लावायचा? नशीब सरकारने एण्डॉमेण्ट प्लान बंद केलेत. पण मनी बॅकचे सुद्धा तसेच. मनी बॅक मध्ये आर्थिक रिटर्न्स थोडेसेच का आहेत?

पूर्वी जेव्हा एवढे ऑप्शन्स नव्हते तेव्हा सेविंग साठी किम्वा कोणत्या खास कारणासाठी एल आयसीच्या पॉलिसीज ने लोकांना चांगला हात दिला. पण आज इतरही चांगले ऑप्शन्स असताना केवळ आपली एजन्सी टिकून राहावी (ज्यांचे ह्या एजन्सी वर घर चालते अशांबद्दलही मी बोलत नहईये) म्हणून लोकांना मिसगाईड करणारे लोक अजूनही खूप आहेत.

पहीले तुम्हा सर्वाना मला सागावे वाटते.....की IRDA च्या guide line ने LIC च नव्हे तर सर्व insurance कंपनीना त्यानचे सर्व जुने प्लन बंद करावयास सांगितले आहेत .....आणी आता येथुण पुढे जे प्लन येतील त्या सर्व LIC plan with service tax असनार आहेत यापुर्वीLIC plan वर LIC service tax घेत नव्हती पण आता LIC सर्व योजनान वर service tax घेणार आहे......पहील्या वर्षासाठी ३.०९ रहील व त्यानंतर १.३ अशी काही तरी राहील.........LIC ने आता पर्यत ६ नविण प्लन आणले आहेत त्यामध्ये ३ एण्डॉमेण्ट प्लन(नवीन जीवन आनंद्,नवीन एण्डॉमेण्ट,आणी सिगल प्रीमियम एण्डॉमेण्ट) ......२. मनी बॅक प्लन आले आहेत.

तुम्हाला एक सागावे वाटते कि LIC चे प्लन खरच चागले आहेत तुम्हाला मिसगाईड केले ही असेल पण असे काही असेल सुधा .....पण trusted brand आहे ...जर तुमच्या प्लन बद्ल काही माहीती हवी असेल तर तुम्ही मला फोन करु शकता .....कीवा मैल करु शकता .....तुमचा प्लन कोनता आहे हे मला समजल्या शिवाय मि तुमची मद्त करु शकत नाही .....कारण त्याशीवाय तुम्हाला खरच मिसगाईड केले कि नाही हे समजणार नाही...so pls.

टेबल ०७५, टर्म २० २०, प्रिमियम २७४४ हाफ इयरली, सम अ‍ॅ. ८५०००
रीटर्न्स - पाच वर्षाला २०%, १० - २०%, १५ - २०%, सर्व्हायवल अ‍ॅट २० - ४०% आणि बोनस. बोनस किती असेल.
अ‍ॅश्युअर्ड व्यक्तीचा जन्म १९८८. पूर्ण वेळ गृहिणी. age of admission 24

***************
व्यक्तीचा जन्म - १९७९, age of admission 33.
टेबल - १७९, plan & accumulation period, premium paying term 20, premium 2549 half yearly, sum assu. 100000

*************
व्यक्तीचा जन्म - १९57, age of admission 55. (here the agent has made mistake of age & birth year. the birth year is 1967).
table & term - 165 -15. maturity amount -35000, in case of death 100000, premium half yearly 2376,

१.मला पॉलीसी नं द्या त्याशिवाय मि काही सागु शकत नाही... तेव्हा प्लीज पॉलीसी द्या

२.जर वय चुकुन कमी जास्त झाले असेल तर त्यमधे आपल्याला correction करता येते

तुम्ही मला पॉलीसी नं द्या मि तुम्हला detail mail karto (179 -bima gold...165-jeevan saral)
agent नी तुम्हला चुकिच्या पॉलीसी दील्या हे मला मान्य आहे......कि या पॉलीसीना return`s कमी आहेत.......मला पॉलीसी नं द्या म्ह्नजे मी तुमची आणखी मदत करु शकेन .

१.मला पॉलीसी नं द्या त्याशिवाय मि काही सागु शकत नाही... तेव्हा प्लीज पॉलीसी द्या

२.जर वय चुकुन कमी जास्त झाले असेल तर त्यमधे आपल्याला correction करता येते

तुम्ही मला पॉलीसी नं द्या मि तुम्हला detail mail karto (179 -bima gold...165-jeevan saral)
agent नी तुम्हला चुकिच्या पॉलीसी दील्या हे मला मान्य आहे......कि या पॉलीसीना return`s कमी आहेत.......मला पॉलीसी नं द्या म्ह्नजे मी तुमची आणखी मदत करु शकेन .

मला policy close करायची होती त्यांच्यासाठी काय Procedure aahe.
मला किती amt मिळू शकते ते सांगाल का प्लीज

विमा म्हणजे काय रे भाऊ?

हप्ता घेताना कंपनी म्हणते : हम साथ साथ है ...

क्लेम देताना कंपनी म्हणते : हम आपके है कौन?

सगळ्या पॉलिसी बंद करा आणि पोस्टात पैसे ठेवा.

जानवि ,
आपण आपला पॉलीसी नं द्या त्याशीवाय मि आपणास कीती पैसे मिळतील हे सागु शकनार नाही.....
आणि क्रुपा करुन आवश्यकता नसेल तर पॉलीसी बंद करु नका ,
एल आय सी जो रिटर्न देते तो तुम्हाला पोस्ट नाहि देत ........आणि जर असे असते तर एल आय सी ला आपली सर्व ऑफीसेस बंद करावी लागली आसती.......एल आय सी सर्व insurance company मधे सर्वात जास्त क्लेम देते.......आणि तुम्हाला हे सर्व पहायचे असेल तर IRDA च्या साईट वर जाऊन तुम्हि पाहु शकता......
पॉलीसी मुद्ती अगोदर बंद केली तर नक्कीच तोटा हा होनारच, कारण ही अगदी तसेच आहे तुम्हि कोणत्याहि कंपनीबरोबर contract केले आणि ते मधेच बंद केले तर तोटा होतो ना? मग तसेच पॉलीसी मधेच बंद केली तर तोटा हा होणारच.
तेव्हा पॉलीसी premium पुर्न मुद्त होईपर्यन्त भरा .......LIC तुम्हाला चांगले return`s देईल....अधिक महिती साठी www.licofindia.com वर लॉग करा आणि LIC जो बोनस दरवषी देते ते चेक करा.

ओशो
हा प्लान कसा आहे मला सागाल का प्लीज.

Lic Policy : Monthly Plans
For New Policy Call 9833756024 - Thane

Monthly Plan Pay 2000/- P.M. for 30 yrs get Insurance of 7.5 lacs, Maturity 27 lacs or Pension 2.25 lacs pa for whole life with Risk Cover 27 lacs whole life, Calculated on Age 25

जानवि: तुम्हाला नक्की काय अपेक्षित आहे तुमच्या प्लान मधुन?

इथले उदाहरण व विश्लेषण उपयोगी पडेल.

इथे policy check कशी करायची ती माहिति मिळेल.

IRDA is a regulatory organization for insurance industry, it will provide information about laws and insurance companies but does not provide policy specific details.

कृपा करून आपला एलायसी पॉलिसी नंबर कोणाही अनोळखी व्यक्तीला देऊ नका. त्या पॉलिसीनंबरवरून पॉलिसीधारक, त्याचा राहण्याचा पत्ता इत्यादी माहिती काढून गैरव्यवहाराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे खात्रीशीर व्यक्तीखेरीज कोणाहीजवळ पॉलिसी नंबर देऊ नका.

ओशो, ह्या स्वरुपाचा धागा काढण्यासंबंधी तुम्ही मायबोली अ‍ॅडमिनची परवानगी घेतली आहे का?

<<कृपा करून आपला एलायसी पॉलिसी नंबर कोणाही अनोळखी व्यक्तीला देऊ नका. >> + १००

ह्याचकरता मी पॉलिसी नंबर दिला नाही. टेबल नंबर वरून कोणत्या पद्धतीची पॉलिसी आहे शोधता येते. पॉलिसीच्या नावावरून त्याचे बेनिफिटस कसे आहेत ते सांगता येते.

जानवि: >>> "मला अजुन एक policy kadhayachi आहे...LIC चा कुथला प्लान चांगला आहे." <<< तुमची गरज काय आहे ते आधी ठरवा. प्ल्यान कुठला चांगला आहे ही पुढची पायरी आहे.

१. Policy काढण्याचा हेतु?
२. नक्की काय साध्य करायचे आहे?
३. Insurance आणि Investment mix करु नयेत

शक्यतो life term policy is the best and the cheapest option.

Amulya Jeevan II & Anmol Jeevan II
मला जर 5 lac policy करायचि असेल तर ह्या term plan मध्ये काय benefit aahe.

जानवि: जर फक्त ५ लाखाची policy काढायची असेल तर "अन्मोल जिवन" च घ्यावी लागेल... बाकी माहिति तुम्हाला वर दिलेल्या link वर सापडेल. अर्थात एखाद्या जाणकारा कडुन किंवा agent कडुन जास्त माहिति काढावी.

एल आय सी चा टर्म इंशुरन्स प्लॅन इतर कोणत्याही कंपनीपेक्षा खुपच महाग आहे.
अगदी आय सी आय सी आय प्रुडेन्शियल पेक्षाही जी चार्जेसच्या बाबतीत सर्वात महाग म्हणून गणली जाते.

तसेच पेन्शन स्कीम्स तर हातात धरण्याच्याही लायकीच्या नाहीत. जेमतेम ६% रीटन्स त्या देतात. त्यापेक्षा पोष्टातील ८% खात्रीचे रीटर्न्स नक्कीच चान्गले.

ज्यांना म्युच्युअल फंड किन्वा इक्विटीच्या वाटेला जायचे नाही त्यांनी त्यांच्या पश्चात रोजचा अन्नधान्य, शिक्षण, घरभाडे, इत्यादी प्राथमिक गरजा भागवन्यासाठीचा खर्चच विचारात घेऊन पुढील ५ ते १० वर्षान्चा विचार करुन रिस्क कव्हर ठरवावे. उगाच एजण्टच्या नादी लागुन १० गुणिले तुमचे वर्षाचे उत्पन्न असे अतिरेकी कव्हर घेऊ नये. शिवाय तुमच्याकडे अगोदरच असलेली सुरक्षित बचत त्यातून वजा करुन जी रक्कम येईल त्याचाच फक्त टर्म प्लॅन घ्यावा. लक्षात घ्या की टर्म प्लॅन हा सर्वात स्वस्त असतो कारण त्यात कोणताही परतावा नसतो. जोपर्यन्त तुम्ही त्याचा हप्ता भरत आहात तोपर्यन्तच तुम्हाला हे विम्याचे कवच लाभेल. कुठल्याही परिस्थितीत हा प्रिमीयम भरायचे टाळू नये.

टर्म प्लॅन आणि तुम्हाला साजेल अशी योग्य गुन्तवणूक हे कुठल्याही इन्शुरन्स कम्पनीच्या कुठल्याही स्कीमपेक्षा कमीत कमी २५% फायदेशीर असते कारण त्यात कोणतेही कमिशन, चर्जेस, नफा, वगैरे कापले जात नाही.

कोणताही एजण्ट तुम्हाला हा पर्याय सुचवणार नाही कारण टर्म प्लॅन चा हप्ता खुपच कमी असतो आणि कमिशन तर त्याहुनही तुटपुन्जे.

तसेच एल आय सी ची पोलिसी बन्द करण्याचा निर्णय, पोलिसीचे उरलेले हप्ते आणि मिळणारे फायदे हे विचारात घेऊन करा. जर १० पेक्षा जास्त हप्ते बाकी असतील तर बहुतेक वेळा पोलिसी बन्द करणे श्रेयस्कर ठरते हे अनेक उदाहरणातून दाखवता येते. लोकसत्तामधे ह्याबद्दलचा एक लेख गेल्या आठवड्यात आला होता. त्यात असे उदाहरण दिलेले आहे.

टर्म प्लॅन आणि तुम्हाला साजेल अशी योग्य गुन्तवणूक हे कुठल्याही इन्शुरन्स कम्पनीच्या कुठल्याही स्कीमपेक्षा कमीत कमी २५% फायदेशीर असते कारण त्यात कोणतेही कमिशन, चर्जेस, नफा, वगैरे कापले जात नाही.

अगदी सहमत

Pages