पापलेट फ्राय

Submitted by शलाका पाटील on 21 January, 2014 - 03:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

चार मध्यम आकाराचे पापलेट ( आपण मोठे हि घेवू शकता ), घरचा लाल मसाला ( तिखट ) २ चमचे, १ छोटा चमचा हळद, चवीनुसार मीठ, २ चमचे लिंबाचा रस( जर लिंबाचा रस नसेल तर आपण कोकमचा रस घेतला तरी चालेल) , एक छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, दोन हिरव्या मिरच्या ( जास्त तिखट हवे असल्यास आपण अंदाजे २-३ जास्त घेऊ शकता ), एक मध्यम आकाराचे आल्याचा छोटा तुकडा, ५ लसुन पाकळ्या, ३-४ पुदिनाची पाने, ३ मोठे चमचे तेल.

क्रमवार पाककृती: 

प्रथम पापलेट पाण्यानी स्वच्छ धुवून घ्यावी. नंतर पापलेटच्या पोटातील नकोसा भाग कडून त्याला दोन्ही बाजूला छोट्या चिरा पाडाव्यात. पापलेटला लिंबाचा रस, हळद आणि मीठ सर्वत्र लावून १ तास मुरत ठेवावी ( मुरत ठेवल्यास पापलेट खाताना चव अधिक चांगली येते ). कोथिंबिर, आले , लसुन, पुदिना आणि मिरची याची पेस्ट बनवावी. पापलेटला मुरून साधारण एक तास झाल्यावर त्यावर तिखट आणि बनवलेली पेस्ट सर्वत्र चोळावी. आता तव्यावर तेल गरम करून त्यात एक एक करून पापलेट तळण्यास सोडवा. पापलेट दोन्ही बाजूने छान असा सोनेरी रंगाचा तळून झाल्यावर केळीच्या पानावर अथवा डीश मध्ये काढून घ्यावा. तयार झालेल्या पापलेट वर कोथिम्बिर आणि पुदिना टाकून सजवावं . झणझणीत आगरी कोळी पद्धतीचे पापलेट फ्राय तयार आहे.

download.jpg

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही....

शलाका डिश मस्तच दिसतेय. शॅलो की डिप फ्राय?

बाकी माझी उडी सुरमई च्या वर गेलेली नाही. पण हा खाऊन पहायला हरकत नाही. Happy

शलाका डिश मस्तच दिसतेय. शॅलो की डिप फ्राय? >>>>>>>> शॅलो फ्राय

बाकी माझी उडी सुरमई च्या वर गेलेली नाही. पण हा खाऊन पहायला हरकत नाही.>>>>>> बाकी कोणत्याही मच्छी पेक्षा पापलेट पचायला चांगला नक्की करून बघ

आज मंगळवार आहे..........किमान उद्या तरी टाकायचीस >>>>>>>>>>>>> अरे इतक्या दिवसांचा उपवास सहन नाही झाला म्हणून आज टाकलाय म्हणजे किमान उद्या तरी करता येईल ना Lol