जादूटोणा

Submitted by रेव्यु on 20 January, 2014 - 10:46

जादूटोणा हा व्यवसाय आपल्या भारतात चांगलाच फोफावला आहे. जनतेला ह्या अदभूत विद्येमुळे आपल्या आयुष्यात काय काय घटना होत आहेत ह्याची खडान्खडा माहिती होते. काही अप्रिय घटना घडणार असेल तर ग्रहांची शांती करता येते. आपली आपल्या समाजाची भविष्यकाळातील स्तिथी जनतेला या विद्येमुळे कळते. झालेले आजार, असणारी नोकरी ह्या वरील उपय करता येतात. त्यामुळे मनुष्याचे जीवन सुखी बनवण्यात हे शास्त्र अग्रेसर आहे.

सध्या २०१४ ला निवडणुकांची रणधुमाळी चालू होईल.जादूटोणा करून हवा तो निकाल लाववता येईल. असे हे अद्वितीय शास्त्र आहे.

हा व्यवसाय आता मोठ्या उद्योग धंद्याचे स्वरूप धारण करत असताना सरकारने जर ह्या व्यवसायाला शॉप अॅक्ट, इन्कमट्याक्स, प्रोफेशन टॅक्स व सर्विस टॅक्स लावला तर सरकारच्या मह्सुलातही भर पडून देशाचे कल्याण होईल विकास साधता येईल.

पुन्हा एकदा ह्या मानवजातीचे भले करणाऱ्या शास्त्राला दंडवत!

Happy Happy Happy
बोलविता धनी !!!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users