Submitted by रसप on 16 January, 2014 - 23:04
काही परकी
काही माझी
आयुष्याच्या
लेखामधली
विरामचिन्हे..
जिथे न सुचले
शब्द समर्पक
अथवा होते
रुतले, फसले
जिथे मनाचे
विचारचक्रच
तिथे मांडली
होती काही
आयुष्याच्या
लेखामधली
विरामचिन्हे
अवखळ, अल्लड
हळवी, कातर
उदासीन वा
अनवट, अवघड
फक्त निरर्थक
असती काही
आयुष्याच्या
लेखामधली
विरामचिन्हे
विरामचिन्हे
वगळुन बघता
आयुष्याला
व्यापुन उरते
अर्थहीनता
आणि व्यर्थता
तेव्हा मग मी
पुन्हा एकदा
पेरत बसतो
मीच जी कधी
अभावितपणे
वेचली जरा
आणि लपवली
होती काही
आयुष्याच्या
लेखामधली
विरामचिन्हे..
....रसप....
१६ जानेवारी २०१४
http://www.ranjeetparadkar.com/2014/01/blog-post.html
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह वाह....रणजितजी तुमच्या या
वाह वाह....रणजितजी तुमच्या या शैलीचा मी विशेष चाहता आहे....खुप आवडली मला...
आवडली कविता, छान आहे.
आवडली कविता, छान आहे.
विरामचिन्हे या प्रतीकाचा
विरामचिन्हे या प्रतीकाचा समर्पक वापर .... छान.