मराठी कॅलिग्राफी टी-शर्ट्स

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

आजपासून अत्रे सभागृह, पुणे येथे मराठी कॅलिग्राफी केलेल्या टी-शर्टचे प्रदर्शन आणि विक्री सुरु होत आहे.

हे टी-शर्ट सिल्व्हर लाईन ही कंपनी वितरीत करणार आहे.. ह्या टी-शर्टवरची सगळी चित्रे प्रसिद्ध चित्रकार अच्युत पालव ह्यांनी काढलेली आहेत.

आज संध्याकाळी ५ वाजता डी.एस.कुलकर्णी ह्यांच्या हस्ते ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे... सर्वांनी अवश्य उपस्थित रहावे..

http://epaper.loksatta.com/c/2225526

( इथे उपलब्ध असणारे टी-शर्ट आमच्या ऑफिस(प्राईम इंटरप्राईजेस) मध्ये छापलेले आहेत..)

विषय: 
प्रकार: 

विजय सध्या तरी नाही.. पण ही आयडिया दिल्याबद्दल धन्यवाद.. त्यादृष्टीने काही करता येईल का ते नक्कीच बघतो.

प्लिज, मायबोली खरेदी मध्ये किंवा इतरप्रकारे ऑनलाइन खरेदी संदर्भात प्रयत्न करा. सकाळच्या लिंकमधले तर सगळेच टीशर्ट आवडलेत.

शिवमुद्रा असलेला टी-शर्ट घेण्यासाठी मागच्या भारतवारीत जाम शोधा-शोध केली. सिल्वरलाईन कडे मिळतात अशी बातमी मिळाली.. कुठूनतरी त्यांच्या नारायण पेठेतल्या दुकानाचा पत्ता मिळाला. तिकडे गेल्यावर समजलं की दुकान सातारारोड वर हलवलं आहे.. Sad
पण सुदैवाने लगेचच अ‍ॅग्रिकल्चर कॉलेजच्या ग्राउंडवर पुणे एक्स्पो मधे त्यांचा स्टॉल लागला होता. त्वरीत खरेदी केले....
मस्त असतात त्यांचे टी-शर्टस... प्रदर्शन नक्कीच मिस करेन Sad

धन्यवाद हिम्सकूल ,
नक्की यायचा प्रयत्न करू .
अत्रे सभाग्रुहाचा पूर्ण पत्ता लिहिशील का ?

अत्रे सभागृह, बाजीराव रोड, अभिनव कला महाविद्यालय चौक, बाजीराव रोड टिळक रोड जिथे क्रॉस होतात तो चौक..

धन्यवाद हिम्सकूल,

आत्ताच जाऊन आलो . छान आहेत टी शर्टस . विशेषतः "इवलेसे रोप" , "शाळेभोवती" "
आम्हाला श्री आणि मुळा़क्षरांचा फार आवडला , फिटींग पण परफेक्ट .
लहान मुलांचेही शर्ट्स छान आहेत अन किमतीही अगदी रिझनेबल ठेवल्या आहेत .
"आमचा कुत्रा सोडून " टाईप इरसाल नमुने मात्र आणखी थोडे असायला हवे होते अस वाटल.

केदार जाधव धन्यवाद... इरसाल नमुने हवे असतील तर तुम्ही वाक्य सुचवल्यास त्याचे पण टीशर्टस छापणार आहेत.. तुम्हाला एक फॉर्म मिळाला असेलच.. तो भरुन दिलात का?

होय, मी आले जाऊन. २-३ घेतले. मस्त आहेत.

"आमचा कुत्रा सोडून " टाईप इरसाल नमुने मात्र आणखी थोडे असायला हवे होते अस वाटल.>>>>+१

हिम्या,
मी दहा टीशर्ट घेतले. छपाई उत्तम. पण डिझाईनमध्ये अजून वैविध्य हवं होतं. 'भारतीय'च्या टीशर्टांमध्ये तसं वैविध्य होतं. शिवाय या टीशर्टांचा गळा फार लहान आहे. टीशर्ट घातला की फास बसतो.