अंथरूण ओले करणे (बेड वेटींग)

Submitted by साक्षी on 14 January, 2014 - 07:12

माझा लेक आता ६ वर्षाचा झाला. अजुन त्याला झोपेत शू होते. डॉ. म्हणतात काळजीचे काही नाही. काही मुलांना उशिरापर्यंत शू होते. पण तरी कुणाला काही घरगुती उपाय माहित आहेत का?

रात्री उठवून नेण्याचा उपाय आम्ही करत होतो. पण २ वा. उठवायचे ठरवले की त्याला १ वा. शू व्ह्यायची. १ वाजता ठरवले की १२ वाजताच शू व्हायची. शेवटी आता मला जाग आली की मी घेउन जाते. कधी कधी आधीच होते. कधी कधी पूर्ण रात्र होत नाही. पण हे पूर्ण थांबत नाही.

~साक्षी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साक्षी त्याला झोपण्याच्या वेळे पाणी, दूध वगैरे देऊ नकोस. मनात काही भीती वगैरे आहे का? या वयात ते सामान्य असतेच. अगदीच तहान लागली की पाणी जरुर दे, पण सवय लावु नकोस. जेवण लवकर हवेच. झोपायच्या आधी एकदा नेऊन आणलेस तर फरक पडेल बघ.

मुल झोपायच्या आगोदर तर न्यावेच पन आपन झोपयच्या आगोदर देखिल एकदा घेउन जावे...
नाहि तरी आता थन्दी चे दिवस आहेत जास्त लक्श द्यावे लागते.

धन्यवाद रश्मी!
झोपण्याच्या आधी तर जाउन येतोच! (हे वर लिहायचे राहिले.)
जेवण साधारण ८:३० ते ९:०० च्या दरम्यानं होते. सगळे एकत्र १०:३० ते १०:४५ पर्यंत झोपायला जातो.

~साक्षी

साक्षी .. दिवसा भरपुर पाणि देत जा त्याला. आणि दिवसभरातुन सुद्धा दर २-३ तासने त्याला शू करायला नेत जा. त्याला जायचे नसेल तरि. संध्याकाळि जेवणात तळलेले देवु नकोस म्हणजे रात्रि झोपाय्च्या वेळि जास्त तहान नाहि लागत त्याना. आणि झोपायच्या आधि एकदा ने. जास्त काहि त्याला रागवु नको त्याला.जर शु केलिच तर अ‍ॅक्सिडेंट झाला म्हणुन समजावुन सांग. असे सगळ्यांचे होते म्हणुन समजव.

काही काळजी करू नका. काही मुलं उशिरा पर्यंत अंथरूण ओलं करतात. माझा मुलगा आता ८ वर्षांचा होईल. दोन महिन्या पासून त्याने अंथरुणात अजिबात शु केलेली नाहीये. माझी मुलगी देखील ६.५ वर्षांची होई पर्यंत अंथरुणात शु करायची.
अर्थात जोपर्यंत मुलं थांबत नाही तोपर्यंत त्रास सहन करत राहावा लागणार.

माझ्या मुलाचा हाच problem होता, मलाही काळजी असायची. doctor च्या सान्गण्यानुसार रात्री वेळीअवेळी २ -३ ला गजर लाऊन शू ल नेत से ते मी बन्द केले, कारण body clock तसेच सेट होते जे योग्य नाही. रात्री पाणी\ ताक\दुध\ दुधाचे पदार्थ\ आम्बट द्रव - citrusy juice पोटात गेल्यास प्रमाण वाढते. पण तो साधारण साडेसहाचा झाल्यावर अचानक एका आठवडयात हा प्रकार बन्द झाला. आता रात्री तो झोपण्याच्या just आधी त्याला शू ला नेते. आणि आता रात्री काहीही खाल्ले प्यायले तरी bed wet करत नाही. यावरून आजूबाजूचे लोक \ तथाकथित मैत्रिणी आपल्याला complex देऊ शकतात, माझ्या बाबतीत असे घडत होते, मी लक्ष दिले नाही आणि काळजी करणे बन्द केले. आता सर्व ठीक आहे. doctor च्या म्हणण्यानुसार ७ ७.५ पर्यन्त जरी बन्द झाले, तरी normal आहे. मुलीन्चे थोडे लवकर सेट होते.

साधारण साडेसहाचा झाल्यावर अचानक एका आठवडयात हा प्रकार बन्द झाला >>> लहान मुलांच्या काही सवयी/इश्यु अशा अचानक स्विच ऑफ केल्यासारख्या एखाद्या दिवशी/आठवड्यात बंद होतात. त्या सोडवण्यासाठी केलेला खटाटोप आठवून हसायला येतं नंतर Happy आम्ही बाळाला अ‍ॅसिड रिफ्लक्स आहे, त्याला हार्ट बर्न्स व्हायला नको, ओकायला नको म्हणून यंव झोपव त्यंव कर असं बरंच काही ट्राय केलं. फारसा उपयोग झालेला दिसला नाही. सहा आठवड्याचा असताना तो एक दिवस मस्त हसत उठला आणि त्या सकाळपासून अ‍ॅसिड रिफ्लक्स, त्या आधीची रडारडी सगळं एकदम गायब.

त्याच्यासमोर घरात भांडणे होतात का?
आई-बाबाची, वा इतर मोठ्यांची, वादावादी, मतभेद, घरात मुलांसमोर झालेत तर असा प्रॉब्लेम येऊ शकतो..

माझा मोठा मुलगा आता ९ वर्षाचा होईल. तो अजुनही अंथरुण ओल करतो. आम्ही सगळे उपाय केले पण काही फरक पडत नाही. डॉक्टर म्हणाले की आपोआप बंद होईल. रात्री त्याला शू साठी उठवतो तेव्हा तो फारच झोपेत असतो. फार वाईट वाटत. लहान मुलगा ४ वर्षाचा असतानाच रात्रीची शू बंद झाली. त्यालाही आता कळायला लागलय की दादा शू करतो. माझ अस निरिक्षण आहे की मोठा भित्रा आहे स्वभावाने आणि लहान नाही घाबरत. आम्ही आयुर्वेदीक आणि थोडफार होमिओपथिक उपचार केले पण तेवढ्यापुरता फरक पडतो आणि परत सुरु होत. घरात अतिशय आनंदी वातावरण आहे. भांडणं वगैरे नसतात त्यामुळे त्याला तस काही टेंशन नाही. सगळ्यांनी सांगितल्यानुसार वाट बघत आहोत कि आपोआप बंद होईल. पण तरीही कुणाला काही माहीत असल्यास नक्की सांगा.

मी यातून गेलेली आहे. होमिओपथीची औषधं + मुलांशी चर्चा, बोलणं - यांमुळे ही समस्या पूर्णपणे दूर होते. होमिओपथीमधे यावर अतिशय चांगली औषधं आहेत. पण ती महिना-पंधरा दिवस देऊन उपयोग नाही.

आमच्या डॉक्टरांनी औषधं तर दिलीच. शिवाय 'रोज रात्री मुलाला झोपेतून उठवणं ताबडतोब थांबवा' असं आम्हाला सांगितलं. कारण मग मुलांना तीच सवय लागते. (फक्त दुसरीकडे कुठे गेलं, रात्री राहण्याची वेळ आली, तरच मधे उठवा त्याला - असंही सांगितलं.)

डॉक्टरांनी मुलाला महिन्याभराचं एक कॅलेण्डर करून त्यात ज्या रात्री अंथरुणात शू होणार नाही, त्या तारखेला खुणा करायला सांगितल्या. एकूण असे ८ दिवस भरले, तर तुला अमुक एक गिफ्ट, १५ भरले तर अमुक एक गिफ्ट, - असं सांगून ठेवलं. आणि त्या-त्या प्रमाणे मुलाला भेटीदाखल काही वस्तू दिल्या. (अगदी छोट्या-छोट्या - पेन्सिल, रंगीत खडू, सेण्टेड खोडरबरांचा बॉक्स, गोष्टीचं पुस्तक, इ. पण मुलांना या गोष्टीचं अप्रूप असतं.) यानं खूपच चांगला परिणाम घडून आला.

आम्ही जवळजवळ वर्षभर हे केलं आणि मुलाची समस्या कायमची दूर झाली. (तेव्हा तो ६-७ वर्षांचा होता.)

मूल झोपत असताना - झोप लागत असताना पहिली १५ मिनिटे पॉझिटिव्ह प्रेझेण्ट टेन्स मध्ये थॉट रिइन्फोर्समेण्ट केले तर फायदा होतो असा माझ्या ओळखीच्या अनेकांचा अनुभव आहे.

माझ्या मुलगा वय ५ वर्षे - कोणतीही आणि कसलीही स्वप्न पडायची सकाळी तो घाबरून उठायचा किंवा थकलेला वाटायचा. झोपण्यापूर्वी पॉझिटिव्ह प्रेझेण्ट टेन्स मध्ये थॉट रिइन्फोर्समेण्ट केल्याने त्याची वाईट स्वप्ने बंद झाली आणि तो झोपेतून उठताना आनंदी असतो.
मी सांगितलेल्या गोष्टी - "We sleep peacefully in night. our mind is calm. in sleep we receive strength, positive energy, happiness, love and healing energy from universe. our mind body and soul gets healed with the healing energy of universe. when we wake up we spread positive energy, happiness and love everywhere."

तुम्ही असं बोलू शकता. "you sleep peacefully in night. your mind is calm. your bladder muscles are strong to hold urine through out the night. bladder muscles know that urine should be passed only in bathroom. In night in case your bladder gets full you wake up yourself to go to wash room. throughout night you sleep on dry bed. when you wake up you are happy to see your bed is still dry."

bed wetting वरून त्याला घरातले कोणी काही चिडवत असतील किंवा तुम्ही चिंता व्यक्त करत असाल तर त्या बंद करा. त्याच्या समोर चिंता व्यक्त करू नका.

बरेच दिवसात इथे येणं जमलंच नाही. सगळ्यांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
ललिता-प्रीति : तुमचा उपाय करून बघेन. धन्यवाद.
वेल : चिडवत कोणीच नाही. त्याच्या समोर चिंता व्यक्त करणंही बंद करेन. आणि तुम्ही सांगितलेला उपायही करून बघेन. धन्यवाद.

~साक्षी.

वेल ने खुपच छान सांगितलेले आहे.
आम्हांला पण क्लासमध्ये शिकवले होते. मुल झोपण्याच्या वेळेला पण पुर्ण झोपलेले नाहिये अशा वेळेला(अल्फा / गॅमा स्टेट असते) बोलायचे मुलाशी ५ मिनीटे. त्याचे नाव घेउन बोलावे व मुलाला कल्पना दे की तु मुलाशी बोलणार आहेस. वाक्ये कागदावर लिहुन काढावीत. नाहीतर बोलताना विसरयला होऊ शकते.
धन्यवाद वेल इथे लिहिलेस. मी हे विसरले होते.

माझा मोठा मुलगा साडेनऊ वर्षांचा झाला तरी अजूनही जवळजवळ दर रात्रीआड बेड ओला करतो. त्याला खूप वेळा सांगितलं. पण तो म्हणतो, पप्पा, सू कधी होते ते मला कळतच नाही. रात्री झोपण्याआधीही तो बाथरूमला जाऊन येतो. छोटा त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असूनही बेड वेटींग करीत नाही. मोठ्याला सकाळी उठला की स्वतःलाच लाज वाटते. ए पिल्सही घेऊन पाहिल्या. पण फरक पडत नाही.

टोच्या - मुळात त्याला सांगा की लाज वाटून घेणं बंद कर, हे आपोआप बंद होईल. त्या दरम्यान तुम्ही युरॉलॉजिस्टला भेटाल का? केवळ फॅमिली फिजिशियन वर अवलंबून राहू नका. कारण नऊ हे तसे मोठे वय आहे. खूप मोठे नसले तरी. कदाचित हा नर्व्हस सिस्टीमचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा कोणती तरी डेफिशियन्सी. याशिवाय वर सांगितलेले उपायही करून पाहा. जमल्यास काऊन्सिलरला भेटा. त्याला तुम्हाला माहित नसलेला स्ट्रेस असू शकतो.

धन्यवाद वेल.
आपण खूप मोलाचा सल्ला दिलात. बहुतांश मुलांना हा प्रॉब्लेम असतो त्यामुळे ‘होईल बंद आपोआप’ या विचाराने आम्ही थोडे दूर्लक्ष केले. पण आता त्याला युरॉलॉजिस्टकडे घेऊन जातो. तसा तो शाळेत हुशार आहे, वागण्या-बोलण्यातही हुशार आहे. घरातलं वातावरणही मोकळं आहे. त्यामुळे स्ट्रेस असण्याचपण, बाहेर डेअरींग कमी पडते. रात्री बाथरूमला जायलाही त्याला कुणीतरी सोबत लागते. अंधाराला जास्त घाबरतो तो, पण दाखवत नाही.

बाळाला काही मानसिक प्रॉब्लेम तर नाही ना हे चेक करा.
माझ्या लहानपणी हा माझा प्रॉब्लेम होता. माझ्याबाबत आजाराचे कारण थोडे उशीरा समजले. मी डावखोरी आहे व होते पण अगदी पहिल्यांदा हातात पेन्सील घेतली तेव्हा मी ती डाव्या हातात घेतली, पण शाळेमधे मला उजव्या हाताने लिहायची सक्ती होती. उजव्या हाताने लिहिताना सगळी अक्षरे मी मिरर इमेज मधे काढायचे. आणि मग नीट लिहीत नाही म्हणून पट्ट्या खाव्या लागायच्या. मग आईने शाळेत भेटून बाईंना सांगितले होते की कृपया उजव्या हाताचा आग्रह धरू नका आणि मग माझे डावखोरेपणाचे शल्य संपले. उजव्या हाताने लिहायची मोकळीक मिळाल्यानंतर त्रास कमी होत गेला व शेवटी संपला. ह्या दोन गोष्टींचे कनेक्शन होते हेदेखील आम्हाला उशीरा समजले होते.

धन्यवाद वेल, सुमेधा व्ही. फारच चांगला सल्ला आहे. नक्की त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करू. आम्हालाही अस वाटल की आज थांबेल उद्या थांबेल पण तस झाल नाही. अभ्यासात हुशार आहे, बाकी कसलाही त्रास नाही. अजुन युरॉलॉजिस्ट कडे गेलो नाही आहे. पण आता नक्की जाऊन येवू.

मी देखील चौथीपर्यंत गोधळी ओली करायचो. कारण होते घरी भावाचा जबरी धाक होता. कधीकधी आई बांबाची देखील भांडणे व्हायचे. माझ्यापेक्षा मोठी असलेली बहिण मला तिच्या खेळात घ्यायची नाही. त्यामुळे मी खूपच खट्टू रहायचो. परिणाम, गोधळी ओली व्हायची Happy

'धन्वंतरी तुमच्या घरी ' हे भा . का . गर्दे ह्यांचे एक चांगले पुस्तक आहे . त्यात ह्या संबंधी उपाय दिले आहेत . अर्थात डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध घेणे चांगले. डॉक्टरांना विचारून त्यातील औषधे घेऊ शकता . काही घरगुती उपाय देखील आहेत.