जरासा उमटु दे येथे ठसा मग बोलु या...

Submitted by वैभव देशमुख on 14 January, 2014 - 05:37

जरासा उमटु दे येथे ठसा मग बोलुया
जरासा मोडु दे हा वारसा मग बोलुया

जरा खोलात पसरू दे मुळे माझी इथे
सरू दे काळ थोडा पावसा मग बोलुया

कळे ना कान हा माझा ठणकतो आज का
तुझाही खवखवत आहे घसा मग बोलु या

"असावे पारदर्शक बंध पाण्यासारखे"
तुझा आहेच जर हेका असा मग बोलु या

दिवसभर फार कटकट ऐकली ऑफिसमधे
जरासा ठेव माझा भरवसा मग बोलु या

अजुनही वेळ आलेली कुठे बोलायची
अजून ना राख झाला कोळसा मग बोलु या

सकाळी पाचला आहे मला जागायचे
अता झालेत बारा माणसा मग बोलु या

- वैभव देशमुख

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कळे ना कान हा माझा ठणकतो आज का
तुझाही खवखवत आहे घसा मग बोलु या

असावे पारदर्शक बंध पाण्यासारखे
तुझा आहेच जर हेका असा मग बोलु या

व्वा. मत्ला शेवटचा शेरही छान.

वाह वैभव अनेक शेर खूप आवडले
मतला , पावसा , घसा , भरवसा , कोळसा आणि शेवटचा शेर अधिक आवडले
वापसा मात्र मला तितकासा समजला नाही (शिवाय वापसा हा शब्द मी आजवर वाफसा असाच ऐकत बोलत आलो आहे त्यामुळे जरास्से अन्यूज्युअल वाटले व्यक्तिशः मला)
असो
शेवटचा शेर फार आवडला मी एक शेर केला होता तो आठवला

पहाटे पाचला उठल्यात माझ्या वेदना
दुपारी चारला करतोय त्यांचे शेर मी

धन्यवाद वैभव अजून एका शैलीदार गझलेसाठी Happy