गोड बोलुया!!

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago
Time to
read
1’

तिळगूळ खाऊन आपण सर्व जण गोड बोलुया!! Happy

tilgul.jpg

विषय: 
प्रकार: 

सर्वाना सक्रान्तीच्या शुभेच्छा. तीळगुळ ( वर अ‍ॅड्मीन यानी दिलेला) घ्या, गोग्गोड बोला.

तिळगूळ खाऊन आपण सर्व जण गोड बोलुया!!

माझ्याकडून तरी DONE Happy

सर्व मायबोलीकरांना संक्रातीच्या तहेदिलसे शुभेच्छा....!!!

-दिलीप बिरुटे

चार ओळींनी ठरवले
बोलायचे आज गोड
झालं गेलं गंगेला मिळालं
वाईट सारे सोड

मनातली कटूता
सहजपणे घालवा
जिभेवर असू दे
तिळगुळाचा गोडवा !!

तिळगुळ घ्या गोड बोला !

अमोल केळकर

अगदी अनुनासिक स्वरात सांगतो.

आम्हाला संक्रांतीला गोड बोलायला सांगणं म्हणजे तेंडुलकरांना चांगली फलंदाजी करायला सांगण्यासारखं आहे. आम्ही नेहमीच गोड बोलतो त्यामुळे इथे मायबोलीवर, फेसबुकावर, व्हॉट्स अपवर संक्रांतीचे मजकुर, तिळगुळाचे फोटो वगैरे पोस्ट करु नये. अगदीच वाटल्यास प्रत्यक्ष भेटून खलबत्त्यात वेलची घालून कांडलेला तिळगुळ द्यायला हरकत नाही.

-- बी

तिळगुळ घ्या गोड गोड बोला. शुभेच्छा सर्वांना.

बी, अगदी टिपीकल पुणेरी पाटी (झालात खरे पुणेकर).