ऑस्ट्रेलियन ओपन - २०१४

Submitted by Adm on 10 January, 2014 - 04:34

तर मंडळी, नवीन वर्षाचा टेनीसचा नवीन सिझन सुरू झालाय आणि त्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा येत्या सोमवार पासून म्हणजे १३ तारखेपासून सुरु होते आहे.

पुरूष एकेरीत यंदा बेकर वि. एडबर्ग वि. लेंडल (!) असा सामना रंगणार आहे. (राफा के लिये अंकल टोनी काफी हय!)
अग्रमानांकीत नदालला तुलनेले अवघड ड्रॉ आला आहे (म्हणे!). पहिल्या फेरीत बर्नाड टॉमिक, मग तिसर्‍या फेरीत मॉन्फिल्स, चौथ्या फेरीत केई निशिकोरी, उपांत्य फेरीत डेल पोट्री आणि उपांत्य फेरीत अँडी मरे अशी फौज त्याच्या मार्गात आहे. १८ वी ऑस्ट्रेलियन ओपन खेळणारा ऑस्ट्रेलियन लिटन हेविट पण ह्याच क्वार्टरमध्ये असणार आहे.
गतविजेता आणि दुसरा मानांकित ज्योकोविकसमोर चौथ्या फेरीपासून पुढे फॉगीनी, वावरिंका आणि फेरर ह्यांची आव्हाने असतील.
फेडररच्या मार्गात त्सोंगा असेल आणि पुढे मरे असेल तर फेरर आणि बर्डीच एका क्वार्टरमध्ये आहेत.

महिला एकेरीत अग्रमानांकित सेरेना विल्यम्स विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. तिच्या क्वार्टरमध्ये लॉरा रॉबसन, सॅम स्तोसुर, इव्हानोविक, सारा इर्रानी अश्या खेळाडू आहेत. सेरेनाची उपांत्य फेरी ना ली बरोबर होण्याची शक्यता आहे.
गतविजेत्या अझारेंकाचा ड्रॉ तुलनेत सोपा आहे.
तृतिय मानांकीत शारापोव्हा उपांत्यपूर्व फेरीत यांकोविच बरोबर खेळेल पण तिच्या क्वॉर्टरमधे स्क्विव्होनी आणि पेटकोवीक सारख्या अनुभवी खेळाडू आहेत.

हा धाग्या ह्या स्पर्धेबद्दल गप्पा मारण्यासाठी..

ऑफिशीयल वेबसाईटची लिंक :
http://www.ausopen.com/en_AU/scores/index.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खेळ खलास!

अशी फायनल होइल असे कोणाच्या कल्पनेतही आले नसेल...

राफा हरण्याची अनेक कारणे असु शकतील पण एक गोष्ट मान्य केली पाहीजे की वॉर्विंका मस्तच खेळला.. कसले इनसाइड आउट फोर्हँड विनर्स मरले त्याने.. जबरी.. आणी सर्व्हिसही जबरदस्त केली.. त्याच्याकडे आज जास्त एनर्जी आहे असेच दिसत होते त्याउलट नदालचा टँक रिकामा वाटत होता.. असो

अभिनंदन वॉर्विंका!

वावरिंका चे अभिनंदन !
पहिला दिड सेट मॅच मस्त झाली.. नंतर दोघेही ढेपाळल्यागत खेळत होते.. राफा होताच ढेपाळला त्याच्या इंजुरीमुळे पण स्टॅनपण अचानक खराब फटके मारत होता...
बहुतेक राफाने त्याचा खेळ स्लो केल्यावर स्टॅनची लय बिघडली.. स्टॅनने जहबहरीही सिंगल हँडेड बॅकहँड मारले !

युएस ओपन २००९ नंतर आत्ता राफा, फेडरर, ज्योको आणि मरे व्यतिरिक्त इतर विनर झालाय..

राफाच्या मेडीकल टाईम आऊटला आणि तिसर्‍या सेटमध्ये स्टॅनने एव्हडी चिडचिड का केली न कळे !

रच्याकने.. 'त्यांना' सांगा.. ह्याला म्हणतात सर्व्ह अ‍ॅंड व्हॉली.. Proud

अरे वा नवा ग्रँड स्लॅम विजेता Happy वावरिंकाचे अभिनंदन !

मी नाही बघितली मॅच. आमचा उपघोडा असा गारद होताना बघवलं नसतं तसं पण Wink

हिम्स, 'पाठ'दुखीने 'मान' कशी काय बॉ काढली ? Wink

लोकहो,

राफा हा चेंडूचा सदैव पाठलाग करणारा खेळाडू आहे. प्रत्येक चेंडू टोलवावा लागल्याने खूप धावपळ करावी लागते. तीही एका सरळ रेषेत न होता तीत सतत दिशाबदल होत असतो. अशाने स्नायूबंधांवर अतोनात ताण येतो. वयाच्या पंचविशीनंतर स्नायूबंध लचकण्याचं प्रमाण वाढतं.

राफाला आपला खेळ बदलावा लागेल. धावपळ कमी करून फटक्यांतलं वैविध्य वाढवावं लागेल. २७ व्या वर्षी नवे फटके शिकायला वा आहेत ते सुधरायला उशीर झाला असला तरी अशक्य खास नाही. विशेषत: राफासारख्या जिद्दी माणसाला तर नाहीच नाही.

आ.न.,
-गा.पै.

तळटीप : तरीपण मी फेडेक्सपंखाच आहे. Happy

नादाल जखमी दिसत होता. वॉर्विंका वॉव खेळला. सुपर्ब सर्व अँड व्हॉली. जबरदस्त फोरहँड व विशेष म्हणजे टेरिफिक सिंगल हँडेड बॅक हँड. बघायला मस्त वाटते. संप्रासला जरा बर वाटल असेल. असाच खेळला तर विंबल्डन चँप मटिरियल आहे. तिथे काय जुना घोडा पण चालेल.
तर पुन्हा भेटू विंबल्डनला. Happy

वावरिंका चे अभिनंदन!

@ पराग
रच्याकने.. 'त्यांना' सांगा.. ह्याला म्हणतात सर्व्ह अ‍ॅंड व्हॉली..
थोड असहमत आहे या बद्द्ल.

वावरिंका वॉज एबल टू ड्रॉ शॉर्ट रीटर्न त्यामुळे व्हॉली हे कंपलशन होत नॉट बाय चॉईस. नदाल चे परतीचे फटके बरेच कमजोर होते आणि शॉर्ट पडत होते. यात वावरिंकाची तडखेबंद सर्विस असेल किंव नदालच कोर्ट कवरेज इंज्युरी मुळे कमी पडत असेल. कारण कहीही असेल. (नदाल चा इंज्युरी टाइम हा स्वतंत्र चर्चे चा विषय आहे. )

नदाल सारख्या हार्ड हीटर ला व्हॉली करणे ही बाब नक्कीच सोपी नाही. नदाल चा फोरहँड फटका इतका जोरकस असतो की जरी नदाल पास करण्यात अपयशी ठरला तरी ही कॅन फोर्स अ‍ॅन एरर ऑन हीज अपोनंट स्टॅडींग रेडी टू व्हॉली अ‍ॅट नेट.

काही खेळाडू शॉर्ट रीटर्न ची स्ट्रेटेजी वापरतात पण तो रीटर्न हा सर्विस लाइन आणि बेस लाइन च्या मधे असतो नेट जवळ नाही. एकदा अपोनंट सर्विस लाइन आणि बेस लाईन च्या मधे आला की साइड्लाइन आणि बेसलान कॉर्नर जवळ रीटर्न देतात. नदाल हे वापरत नाही. तो बेस लाइन टू बेसलाइन लाँग रॅली प्रीफर करतो.

यात वावरिंकाची तडखेबंद सर्विस असेल >> सर्व्ह अँड व्हॉलीची बेसिक रिक्वायरमेंट. पहिल्या सेट मधे नदाल ठिक असतानासुद्धा वॉरविंका स्वतःच्या सर्विसवर, नेहमी नाही पण कधी कधी नेटवर येत होता. शॉर्ट रिटर्न मुळे नाही.
पण वॉरविंकाच फर्स्ट सर्व्ह परसेंटेज फार कमी होत. टॉप लेव्हलला रहाण्यासाठी हे सुधाराव लागेल.

सेमी नंतर अचानक एव्हढी कसली इंज्युरी झाली?

सेमी पर्यंत फक्त बिल्स्टर्स चाच प्रॉब्लेम होता ना?

लि ना आनि वावरींका चं अभिनंदन .. लि ना एकदम हसवत होती म्हणे भाषणात ..

स्टिफ बॅक. कधी पण होउ शकते की. वॉर्म अप करतानाच थोडा त्रास झाला, दुसर्‍या सेटपासून जास्तच त्रास झाला.

रच्याकने, त्याच्या इंजुरीबद्दल तो स्वतः सोडून इतरच बोलताहेत.

जखमी >>> Biggrin इन्जुअर्ड असेल खेळाडू तर मराठीत 'जखमी' असं म्हणतात का? दुखापत झाली असं ऐकलं आहे.

Pages