ऑस्ट्रेलियन ओपन - २०१४

Submitted by Adm on 10 January, 2014 - 04:34

तर मंडळी, नवीन वर्षाचा टेनीसचा नवीन सिझन सुरू झालाय आणि त्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा येत्या सोमवार पासून म्हणजे १३ तारखेपासून सुरु होते आहे.

पुरूष एकेरीत यंदा बेकर वि. एडबर्ग वि. लेंडल (!) असा सामना रंगणार आहे. (राफा के लिये अंकल टोनी काफी हय!)
अग्रमानांकीत नदालला तुलनेले अवघड ड्रॉ आला आहे (म्हणे!). पहिल्या फेरीत बर्नाड टॉमिक, मग तिसर्‍या फेरीत मॉन्फिल्स, चौथ्या फेरीत केई निशिकोरी, उपांत्य फेरीत डेल पोट्री आणि उपांत्य फेरीत अँडी मरे अशी फौज त्याच्या मार्गात आहे. १८ वी ऑस्ट्रेलियन ओपन खेळणारा ऑस्ट्रेलियन लिटन हेविट पण ह्याच क्वार्टरमध्ये असणार आहे.
गतविजेता आणि दुसरा मानांकित ज्योकोविकसमोर चौथ्या फेरीपासून पुढे फॉगीनी, वावरिंका आणि फेरर ह्यांची आव्हाने असतील.
फेडररच्या मार्गात त्सोंगा असेल आणि पुढे मरे असेल तर फेरर आणि बर्डीच एका क्वार्टरमध्ये आहेत.

महिला एकेरीत अग्रमानांकित सेरेना विल्यम्स विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. तिच्या क्वार्टरमध्ये लॉरा रॉबसन, सॅम स्तोसुर, इव्हानोविक, सारा इर्रानी अश्या खेळाडू आहेत. सेरेनाची उपांत्य फेरी ना ली बरोबर होण्याची शक्यता आहे.
गतविजेत्या अझारेंकाचा ड्रॉ तुलनेत सोपा आहे.
तृतिय मानांकीत शारापोव्हा उपांत्यपूर्व फेरीत यांकोविच बरोबर खेळेल पण तिच्या क्वॉर्टरमधे स्क्विव्होनी आणि पेटकोवीक सारख्या अनुभवी खेळाडू आहेत.

हा धाग्या ह्या स्पर्धेबद्दल गप्पा मारण्यासाठी..

ऑफिशीयल वेबसाईटची लिंक :
http://www.ausopen.com/en_AU/scores/index.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिंकला राफा ! पण लईच फाईट झाली..
नदालने अनुभवाचा वापर केलेला दिसतोय.. तिसर्‍या सेटमध्ये निशोकोरी सर्व्हिंग फॉर सेट असताना तो टायब्रेकर ला घातला.. !

मयेकर काय बोलले काही कळलं नाही.. Uhoh

मयेकरांचा बाळ्या कोण?

शारापोव्हा गेली का?

या सगळ्या मॅचेस्वर स्टेफी ग्राफच्या कमेंट्स वाचायला आवडतात मला. अगदी आपुलकीने लिहिते प्लेयर्सबद्दल, गेमबद्दल Happy

या सगळ्या मॅचेस्वर स्टेफी ग्राफच्या कमेंट्स वाचायला आवडतात मला. अगदी आपुलकीने लिहिते प्लेयर्सबद्दल, गेमबद्दल>> हे कुठे आहे म्हणे???????

>> मयेकर काय बोलले काही कळलं नाही..

कालच्या मॅचमध्ये राफा कडून दोन व्हायोलेशन्स् झाली .. एक कोच व्हायोलेशन ते काय नीट कळलं नाही मला .. अंकल टोनी आणि राफा मध्ये काही इनअ‍ॅप्रोप्रिएट खाणाखुणा झाल्या असं रेफ्री ला वाटलं असा माझा अंदाज आहे ..

दुसरं व्हायोलेशन त्याने पॉइंट्स मध्ये जास्त वेळ घालवला म्हणून ..

(ह्या दोन व्हायोलेशन्स् मध्ये एकदा पडला आणि रोल झाला कोर्टवर मग बूटाची लेसच तुटली .. मग कोर्ट सोडून लॉकर रूम मध्ये गेला तेव्हाही कॉमेन्टेटर्स बडबडतच होते "एव्हढा जामानिमा घेऊन येतो तर एक्स्ट्रॉ पेअर ऑफ शूज् नाही का आणले")

मॅच संपल्यानंतर निगुतीने बाजूला ठेवलेलं केळं तसंच ठेऊन निघून गेला की .. Wink

तो डिमिट्राव्ह एकदम सही कॅरॅक्टर वाटतो मला .. Happy

राफाच्या तळव्याला सामन्यादरम्यान जखम झाली होती तेव्हा ही टाइम व्हायोलेशनची कॉमेंट्री ऐकली. तेव्हा ते आधीच्या शूलेस प्रकरणाबद्दल कळले. तो भाग पाहिला नव्हता.
कोचिंग व्हायोलेशन नाही दिसले. टाइम व्हायोलेशनसाठी त्याची एक सर्व्हिस गेली.
He made me eat the crow, but since it was served with a win by raising the game at the right moment I don't mind it.

तरीसुद्धा रेफरीज राफाबद्दलच लिनियंट असतात हे तुणतुणे चालूच होते असेच माझे तुणतुणे आहे.

अच्छा असं झालं होय !

इव्हानोव्हीक गेली बाहेर?? काय बोर आहे !!!

हो त्सोंगाला अगदीच किरकोळीत काढला.. !

उद्या 'फेडरर वि. मरे' आहे, साधारण दुपारी ३ (IST) वाजल्यापासून सुरू होईल.
आत्ता तर जोकरच जिंकेल वावरिंका विरुध्द.

जोकर सेट हरलाय एक.. पहिलाच सेट आहे हरलेला.. आणि तिसर्‍या सेट मध्ये पण एक सर्व्हिस ब्रेक झाली आहे..

नोवाक जोकोविच ..........................जय हरी विठ्ठल..............:)

वरचे सेमी आणि फायनल चे बदल करा कोणीतरी आता Happy

अरेरे! करीअर सम्पलं की काय >> एवढा अविश्वास? डायहार्ड फ्यान ना तुम्ही? अहो पडत्या काळात समर्थपणे ऊभं रहायचं असतं आपल्या घोड्यामागे. आता तुम्ही घोडा बदलून दुसर्‍याच घोड्यावर पैसे लावले असतील गोष्टं वेगळी आहे. Proud
वावरिंकाने अमेरिकन ओपनचं ऊट्टं काढलं, नव्हे तिथे तो थोडासा कमी पडला होता जो ईथे पुरून ऊरला?

फेडरर परवडला पण वावरिंका आवर, असं झालं असेल त्याला. एकंदर काय तर स्विस चॉकलेटं काही पचवेना झालीयेत. फॉर्म ईज टेंपररी आणि काय ते पर्मनंट असतंय म्हणे? Lol

अरेरे! करीअर सम्पलं की काय >> खेळेल हो परत जोमाने पुढच्यावेळी. चांगला आहे तो. Happy
पहिल्याने फेडरर-नदाल फायनल्स अवघड असायच्या, मरे-जोको आल्यानंतर सेमीज सुद्धा जीवनामरणाचा खेळ झाल्या. आणि आता वावरिंका, त्सोंगा वगैरेंनी क्वार्टर्ससुद्धा जिंका किंवा मरा करून टाकल्या. चांगलंच आहे की. चालुद्या म्हणायचं नी काय.

चमन ला किती आवाज फुटला एकदम .. Happy

अहो आम्हाला तो अजूनही आवडतो .. आम्ही त्याच्यामागे आजन्म समर्थपणे उभे राहू पण खेळायला हवं ना .. ऑस्ट्रेलियन ओपन तर "अपनी गलि" होती .. तिथेही पराभव, तोही क्वार्टर्स् मध्येच मग आम्ही तरी काय म्हणावं .. आमची बुद्धी काही आम्हाला ऑप्टिमिस्टीक वाटू देत नाही ..

चमन, खुश तो बहुत होंगे आज तुम >> खरं तर वाईटच वाटलं जोकोसाठी, बिचार्‍याला कसे संधीसाधू आणि त्याच्या क्षमतेवर आजिबात विश्वास नसलेले फ्यान मिळाले म्हणून. Proud

>> संधीसाधू आणि त्याच्या क्षमतेवर आजिबात विश्वास नसलेले फ्यान मिळाले म्हणून

तुला तसं वाटत असेल तर तुबुदो .. Happy

अरे तुच म्हणालीस ना त्याचं करिअर संपलं आणि तो आता पुन्हा स्लॅम जिंकू शकेन असं मला (म्हणजे तुला) वाटतं आणि माझी बुद्धी मला त्याच्या यशाबद्दल ईच्छावादी राहू देत नाही म्हणून.

आणि तरी हा माझा बुद्धीदोष म्हणे, किती त्या पलट्या मारणार. तरी बरं वरचं चांगलं पांढर्‍यावर धडधडीत काळ्या शाईने लिहिलं आहे. Lol

चमन, आढावा छान घेतलास माझ्या आधीच्या पोस्ट्स चा ..

पण "मी ज्योको ची संधीसाधू आणि त्याच्या क्षमतेवर अजिबात विश्वास नसलेली फॅन आहे" हे जे इंटरप्रिटेशन तू केलंस हा तुझ्या बुद्धीचा दोष असं मी म्हणतेय .. Proud

बरं बरं ठीक आहे माझ्या बुद्धीचा दोष. आपण ज्योकोचे डिझर्विंग फ्यान आहोत हे तुमच्या बुद्धीला पटले ना मग झाले तर, मला तरी अजून काय पाहिजे. Proud

मी तर वरच म्हणालो, नाऊमेद होऊ नका, खेळेल तो पुढच्या वेळी (वाट बघा)

Pages