Submitted by रेव्यु on 9 January, 2014 - 05:16
शेवटचा टप्पा
हातातून पळं, तास निसटताहेत
व्यस्ततेच्या बुरख्याखाली, मनातील चलबिचल
लपवण्याचा प्रयत्न मी करतो आहे
एक बाल्य, शैशव अन तारुण्य
लवकरच ओझर होणार आहे
अन त्याबरोबरच
व्यस्तता कशी सांभाळायची या ऐवजी
फावलेपणा कसा आपले
भक्ष्य करणार नाही याची चिंता आहे
जे आपल्यास कधीच जमले नाही
त्या अध्यात्मात कसे गुरफटून का घ्यायचे ?
ही व्यथा आहे
जे आपण व्यर्थ मानले
जे आपणास शक्य नाही
ते आता करायचे आहे
जसे- स्वाध्याय, आत्मपरिक्षण , अन काही बाही
बघूया कसे जमते ते
पण त्या शैशवाचा , बाल्याचा अन तारुण्याचा संग
मात्र मला वाकुल्या दाखवणार आहे
खंत एवढीच की
जेव्हा ते माझीया सान्निध्यात होते
तेव्हा मी कुणाच्या तरी पाट्या टाकत होतो
अन ते क्षण माझ्या ओंजळीतून
वाळूच्या कणासमान निसटत होते!!!!
-एक व्यथित बाप-----
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फ्लो आवडला. 'पाट्या टाकणे'
फ्लो आवडला. 'पाट्या टाकणे' जरा खटकला या कवितेत..
आनंदयात्री पाट्या टाकणे
आनंदयात्री
पाट्या टाकणे ---------
धन्यवाद पण खरी भावना तीच आहे , काय करू??
मला भावना पोचल्या पण कविता
मला भावना पोचल्या पण कविता म्हणून हे लेखन वाचू शकलो नाही काव्य असे फारसे नाही जाणवले ह्यात आपण लिहितानाही जे मनात आले ते प्रांजळपणे उतरवणे इतकेच मनात ठेवून लिहिले असावे कदाचित पण एक कविता वाचण्याचा आनंद मला तरी घेता आला नाही
मत न पटल्यास क्षमस्व