पाहू मरून आता ..

Submitted by सुशांत खुरसाले on 8 January, 2014 - 02:45

दुबळे प्रयत्न सगळे झाले करून आता
जगणे तरी कळेना पाहू मरून आता !

मी झिंगतोच आहे धुंदीमधे स्वतःच्या
तू नेहमीप्रमाणे घे सावरून आता

ह्रदयातुनी कधीही जमले न काढणे पण ..
काढून नाव टाकू ओठावरून आता

हलचल मनात माझ्या काहीच होत नाही
वाटेल तेवढे तू घे बावरून आता

बोलायला कुणाला लावू नकोस काही
अंदाज घे कळीचा देठावरून आता !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्रदयातुनी कधीही जमले न काढणे पण ..
काढून नाव टाकू ओठावरून आता >>> हा सर्वात छान वाटला.

-----------------------------------------------------------------------------------
हलचल मनात माझ्या काहीच होत नाही >>> इथे हलचल हा अमराठी शब्द वापरण्याचे निश्चित प्रयोजन समजले नाही. 'खळबळ' हा शब्द अपेक्षित खयाल व्यक्त करीत असावा असे वाटते.

(खयाल हा अमराठी शब्द मीही वापरला आहे. त्याऐवजी विचार/आशय हा शब्द लिहू शकलो असतो. परंतु, गझलेविषयी बोलताना 'खयाल' अधिक संयुक्तिक वाटतो.)

छान.

दुबळे प्रयत्न सगळे झाले करून आता
जगणे तरी कळेना पाहू मरून आता !

मी झिंगतोच आहे धुंदीमधे स्वतःच्या
तू नेहमीप्रमाणे घे सावरून आता

ह्रदयातुनी कधीही जमले न काढणे पण ..
काढून नाव टाकू ओठावरून आता <<<

वा, छान!

छान....

दुबळे प्रयत्न सगळे झाले करून आता
जगणे तरी कळेना पाहू मरून आता !........खयाल जुनाच पण शेर आवडला

मी झिंगतोच आहे धुंदीमधे स्वतःच्या
तू नेहमीप्रमाणे घे सावरून आता.........वा वा !

ह्रदयातुनी कधीही जमले न काढणे पण ..
काढून नाव टाकू ओठावरून आता...........क्या बात !

शेवटचे दोन तितकेसे स्पष्ट होत नाही आहेत रे !

-सुप्रिया.

शेवटच्या शेरात असा बदल बघा आवडतोय का-
(वात्रटपणाबद्दल क्षमस्व!)

बोलायला कुणाला लावू नकोस काही
अंदाज घे मनाचा चर्येवरून आता !

बाकी सगळे छान! आवडले.

छान आहे, ओठावरून आता विशेष

मतल्यात `तरी' च्या ऐवजी `जरी' केल्यास कसे?