Submitted by विजय देशमुख on 5 January, 2014 - 06:52
आज ISRO ने GSLV-D5 चे यशस्वी उड्डान करुन भारताच्या इतिहासात एक सोनेरी अध्याय जोडला आहे. क्रायोजेनिक इंधन वापरुन हे रॉकेट बनवले होते. क्रायोजेनिक इंधन तंत्रज्ञानास परदेशातुन मदत न मिळाल्याने ते तंत्रज्ञान ISRO च्या शास्त्रज्ञांनी स्वतः शोधले.
या तंत्रज्ञानाचा वापर करुन अतिशय कमी खर्चात उपग्रह त्याच्या कक्षेत स्थापित करण्यास मदत होईल. त्यामुळे आता भारताला इतर विकसनशील देशांचे उपग्रहही अंतराळात स्थापित करणे शक्य होणार आहे.
सर्व शास्त्रज्ञांचे आणि अश्या प्रकल्पास अप्रत्यक्षपणे मदत केलेल्या प्रत्येकाचे (अगदी राजकारण्यासह) अभिनंदन.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारताला खरोखर अभिमान वाटावा
भारताला खरोखर अभिमान वाटावा अशी घटना आहे. पण आपले सन्माननीय न्युज चॅनल्स काहीतरे भलतेच गुर्हाळ लावून बसले आहेत.
प्रकल्पामधील प्रत्येक सदस्याचे हार्दिक अभिनंदन.
अभिनंदन इस्रो टीमचं!
अभिनंदन इस्रो टीमचं!
अभिनंदन इस्रो !
अभिनंदन इस्रो !
प्रकल्पामधील प्रत्येक
प्रकल्पामधील प्रत्येक सदस्याचे हार्दिक अभिनंदन.>> +१
क्रायोजेनिक तंत्रज्ञान डेव्ह्लपमेंट बद्दल ईस्रो चा अभिमान वाटतो.
टाळ्या !!!!
टाळ्या !!!!
ळाट्या च्या उलटे
ळाट्या च्या उलटे
गानू आजोबा, >> ळाट्या च्या
गानू आजोबा,
>> ळाट्या च्या उलटे
ते ळ्याटा च्या उलटं हवं होतं ना?
आ.न.,
-गा.पै.
इस्त्रो च्या शास्त्रज्ञान्चे
इस्त्रो च्या शास्त्रज्ञान्चे अभिनन्दन.... विजय- चाग्ला धागा सुरु केल्याबद्दल धन्यवाद.
इस्रोचे अभिनंदन. लेट्स सेंड अ
इस्रोचे अभिनंदन. लेट्स सेंड अ मॅन टु मून...
गामा तुझी विपु बंद का असते
गामा तुझी विपु बंद का असते रे?
इस्त्रो च्या शास्त्रज्ञान्चे
इस्त्रो च्या शास्त्रज्ञान्चे अभिनन्दन.... विजय- चाग्ला धागा सुरु केल्याबद्दल धन्यवाद.
प्रकल्पामधील प्रत्येक सदस्याचे हार्दिक अभिनंदन.
सहमत.
भारतीय जनतेचे अभिनंदन.
वा, भारतीयांसाठी अभिमानाची
वा, भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट. अभिनंदन.
अभिनंदन! पूर्वी क्रायोजेनिक
अभिनंदन!
पूर्वी क्रायोजेनिक इंजिन शब्द मीडिया मधे (काही वर्षांपूर्वी) काहीतरी कारणाने सतत चर्चिला जात होता - बहुधा तेव्हा भारत इतर कोणत्यातरी देशाकडून ते मिळवायचा प्रयत्न करत होता, त्याबद्दल असावे.
भारतीय शास्त्रज्ञांचे अभिनंदन
भारतीय शास्त्रज्ञांचे अभिनंदन !
अवांतर : देशमुख सध्या आपण द. कोरियास्थित आहात काय ....तिकडे दु:खद घटना ह्या धाग्यावर कोरियातील एका पाशवी घटनेचा जिक्र करण्यात आला आहे तिकडे अधिक माहितीसाठी तुमच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत सर्वजण आहेत तिकडे जरा पहाल का ?
विजय देशमुख, समयोचित
विजय देशमुख, समयोचित लेख.
अभिनंदन
इस्रोचे
इस्रोचे अभिनंदन.
https://www.facebook.com/isro.org
पूर्वी क्रायोजेनिक इंजिन शब्द
पूर्वी क्रायोजेनिक इंजिन शब्द मीडिया मधे (काही वर्षांपूर्वी) काहीतरी कारणाने सतत चर्चिला जात होता - बहुधा तेव्हा भारत इतर कोणत्यातरी देशाकडून ते मिळवायचा प्रयत्न करत होता, त्याबद्दल असावे. >>>>>>>>>>>>>>>>>
खरय फारएण्ड. खरं तर क्रायोजेनिक तापमान (~ -२७० सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी), जे लिक्विड हेलिअम वापरुन तयार केलं जातं, वापरणं, अतिशय कठीण काम आहे. त्यात नुस्तच तापमान मेन्टेन करणे नाही तर त्या तापमानाला इंधन वापरणं, त्याहुनही कठीण. मागे रशिया, हे तंत्रज्ञान द्यायला तयार होता, पण अमेरिकेने खोडा घातला होता. {बहुदा या क्षेत्रातली मोनोपॉली गमवायची नसेल, म्हणुन}.
त्यामुळेच क्रायोजेनिक इंजिन यशस्वीरित्या वापरणे, एक मैलाचा दगड आहे.
इसकाळ वरुन :-
क्रायोजेनिक इंजिन म्हणजे काय?
क्रायोजेनिक तंत्रज्ञान अतिशय क्लिष्ट आणि अवघड असते. या तंत्रज्ञानात इंधन म्हणून उणे 183 अंश सेल्सिअस तापमानातील द्रवरूप ऑक्सिजन आणि उणे 253 अंश सेल्सिअस तापमानातील द्रवरूप हायड्रोजनचा वापर होतो. क्रायोजेनिक इंजिनात असणाऱ्या टर्बो पंपाद्वारे या दोन्ही इंधनांचा उच्च दबावाखाली पुरवठा ज्वलनासाठी व्हावा लागतो. हा पुरवठा अतिशय योग्य प्रमाणात आणि सातत्याने होणे अत्यंत आवश्यक असते.
द्रवरूप ऑक्सिजन आणि द्रवरूप हायड्रोजन कमी तापमानावर ठेवण्यासाठी अवरोधक असतो. त्यानंतर या इंधनाचे ज्वलनसुद्धा योग्य प्रकारेच व्हावे लागते. अन्यथा द्रवरूप ऑक्सिजन आणि द्रवरूप हायड्रोजनचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे ज्वलन प्रक्रिया योग्य प्रकारे सुरू होऊनही ती तशीच सुरू राहणे महत्त्वाचे असते. दोन टनाहून अधिक वजनाच्या उपग्रहाला अंतराळात ठराविक कक्षेत सोडण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होतो. सध्या फक्त अमेरिका, युरोपीय अवकाश संस्था, जपान, रशिया, चीन आणि भारत यांच्याकडेच हे तंत्रज्ञान आहे. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान वापरण्यास भारत लायक नाही, असे कारण देत इतरांनी ते देण्यास आधी नकार दिला होता. हे तंत्रज्ञान नाकारल्याने भारताने ते स्वत:च विकसित करण्यासाठी कंबर कसली. वीस वर्षांहून अधिक काळ सतत संशोधन करून भारताने हे तंत्रज्ञान प्राप्त केले.
इस्त्रोचे मनपूर्वक अभिनंदन
इस्त्रोचे मनपूर्वक अभिनंदन
खूप अभिमान वाटला इस्रोचा!
खूप अभिमान वाटला इस्रोचा!
ISRO.org या साईटवर देवनागरी
ISRO.org या साईटवर देवनागरी नाव आता इसरो असं दिसतय. पुर्वी इस्रो असं होतं वाटते. याआधी कुणीतरी मला करेक्ट केलं होतं, त्यामुळे मी ISRO वापरलं.
खरोखरच अभिमान वाटावा अशी
खरोखरच अभिमान वाटावा अशी गोष्ट.
ह्या प्रकल्पात आमच्या एक स्नेहींनी आपल्या टीम सह फारच महत्वाची भुमिका बजावली. असे प्रकल्प अतिषय गोपनिय रित्या हाताळावे लागतात. कुटुंबियांनाही त्या बद्दल कल्पना नसते. त्यांच्या पत्नीलाही काहीही माहित नव्हते. आता यशस्वी प्रकल्पा नंतर त्यांच्यावर देश-विदेशातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यामुळे आम्हालाही खुप आनंद झाला आहे.
आपले शास्त्रज्ञ कोणत्याही प्रकारे कमी नाहीत.
वा, भारतीयांसाठी अभिमानाची
वा, भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट. अभिनंदन. >>>> +१००
क्रायोजेनिक इंजिन म्हणजे काय? >>>>> ही सर्व माहिती सविस्तर दिल्याबद्दल व हा धागा सुरु केल्याबद्दल विजय देशमुख यांचे मनापासून आभार .....
धन्यवाद शशांक. खरं तर मी
धन्यवाद शशांक. खरं तर मी क्रायोजेनिक तापमानावर काम करणार आहे, त्यामुळे माझ्यासाठीच्या सिस्टमची माहिती आहे मला, पण क्रायोजेनिक इंजिन वेगळं आणि अधिक गुंतागुंतीचं असते.

ती माहिती सकाळकडुन साभार
खरोखरच अभिमान वाटावा अशी
खरोखरच अभिमान वाटावा अशी गोष्ट.!!!
हा धागा सुरु केल्याबद्दल मनापासून आभार .....
खूप अभिमान वाटला इस्रोचा! >
खूप अभिमान वाटला इस्रोचा! > +१
देशमुख साहेब माहिती बद्दल आभारी
विजय देशमुख, माहितीबद्दल
विजय देशमुख, माहितीबद्दल धन्यवाद!
अतिशीत साठ्याच्या डोकेदुख्या वेगळ्याच असतात. द्रवरूपातील उदजन (हायड्रोजन) आणि प्राणवायू अतिशय हळूहळू तापवीत ज्वलनघटामध्ये (कंबशन चेंबर) आणायचे आणि तिथे पेटते ठेवायचे. अवघडे!
आ.न.,
-गा.पै.
इसरो टीमचं मनःपुर्वक अभिनंदन
इसरो टीमचं मनःपुर्वक अभिनंदन !!!
भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट.
भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट. अभिनंदन.
.... आपणही जगातल्या कोणत्याही देशापेक्षा कमी नाही!
खरचं खुप भारी!
खरचं खुप भारी!
इस्रोचे अभिनंदन.
इस्रोचे अभिनंदन. ..............:-)
Pages