Submitted by मयुरेश साने on 3 January, 2014 - 05:44
छळतात ही उन्हे अन् छळतात सावल्याही
ठरवून टाकले की बरसायचेच नाही
ॠतु चक्र आठवांचे सोसायचे कसे रे
बदलायचा ॠतूंना सांगा उपाय काही
निवडून कोण येतो याची नकोच चिंता
या फाटक्या खिशाला लुटणार लोकशाही
बाकी बरीच आहे अश्रुंसवे उधारी
आणू कुठून हासू ओठावरी तुझ्याही
मृत्यू समीप असतो श्वासागणीक अपुल्या
तो भेटणार आहे कोठूनही कसाही
.......मयुरेश साने
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सगळेच शेर खूप आवडले मयुरेश
सगळेच शेर खूप आवडले मयुरेश छान झालीये गझल
या फाटक्या खिशाला लुटणार लोकशाही< <<< ही ओळ मस्त रोमहर्षक वाटली
ऋतुचक्र हा शब्द असा एकसंधच असेल असे वाटते
निवडून कोण येतो याची नकोच
निवडून कोण येतो याची नकोच चिंता
या फाटक्या खिशाला लुटणार लोकशाही>>>
व्वा
व्वा ! आवडली गझल !
व्वा ! आवडली गझल !
मस्त अमोल केळकर
मस्त
अमोल केळकर
काही, कसाही वा वा !
काही, कसाही वा वा !
पुर्णच गझल आवडली सगळेच शेर
पुर्णच गझल आवडली
सगळेच शेर मस्तच
लोकशाही जरा जास्तच
चांगली आहे गझल…. शुभेच्छा.
चांगली आहे गझल….
शुभेच्छा.
संपूर्ण गजल मस्तच ... मृत्यू
संपूर्ण गजल मस्तच ...
मृत्यू समीप असतो श्वासागणीक अपुल्या
तो भेटणार आहे कोठूनही कसाही >>>> हा विशेष आवडला .....
मृत्यू समीप असतो श्वासागणीक
मृत्यू समीप असतो श्वासागणीक अपुल्या
तो भेटणार आहे कोठूनही कसाही
व्वा.
'लोकशाही' सर्वात छान वाटला.
'लोकशाही' सर्वात छान वाटला.
बाकी बरीच आहे अश्रुंसवे
बाकी बरीच आहे अश्रुंसवे उधारी
आणू कुठून हासू ओठावरी तुझ्याही<<< छान शेर!
शीर्षक ओळही आवडली.
वाह!!!
वाह!!!
नाईस!
नाईस!
गझलकाराला नक्की कोणत्या
गझलकाराला नक्की कोणत्या गोष्टी छळत नाहीत.
बेमिसाल... आवडली गझल . मतला
बेमिसाल... आवडली गझल .
मतला विशेष आवडला .