पाणी आणि गॅलरीतील झाडे

Submitted by हर्ट on 2 January, 2014 - 00:46

आमच्या बावधनच्या घराला ३ बाल्कन्या आहेत. त्यापैकी एबाल्कनीमधेत आम्ही कुंडीत अनेक झाडे लावलीत. होत अस की आम्ही अधूनमधून अकोल्याला जातो. तर त्या तेवढ्या चार पाच दिवसात झाडे उन्हामुळे आणि पाणी न मिळाल्यामुळे कोमेजून मरुन मरगळून जातात. परत नव्यानी झाडे आणून नाही लावली तर गॅलरी भकास उजाड दिसायला लागते. कारण आमच्या घरी आम्ही सर्व जण झाडांवर जीवापाड प्रेम करणारे आहोत. आमच्या अकोल्याच्या घरी हा प्रश्न कधीच निर्माण झाला नाही कारण सगळी झाडे जमिनीत लावली आहेत. शिवाय पाण्याचा निचरा इकडून तिकडून होतच राहतो. परिणाम, झाडांना मुबलक पुरेसे पाणी मिळत राहते.

तर, गॅलरीतील झाडे वाचावी म्हणून काही सोपे उपाय कुणी सांगू शकेल का?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी, बिसलेरी किंवा तत्सम बाटलीच्या झाकणाला भोक पाडून घे. मग त्या बाटलीत पाणी भरून बाटलीला हे झाकण लाव. मग ती बाटली कुंडीत उलटी (झाकण मातीत जाईल अशी) खूपसून ठेव आणि जो भाग वर आहे त्याला टाचणीने छिद्र करून ठेव. अगदी कडकडीत ऊन नसेल तर ३-४ दिवस झाडे मस्त रहातात.

माधव, उपाय आवडला पण असे जर केले तर मातिमधे पाणी बाटलीतून झिरपेल कसे? बाटलीला छिद्र वर आहे आणि खाली झाकण बंद केलेले आहे.

बी, अरे झाकणाला पण भोक पाडलय की आधीच. पाणी त्यातून ठीपकते Happy वरचे भोक हे फक्त बाटलीत निर्माण होणार्‍या पोकळीत हवा भरण्यासाठी आहे. ते नसेल तर पोकळितल्या अत्यंत कमी दाबामुळे पाणी ठीपकणे थांबेल.

तर त्या तेवढ्या चार पाच दिवसात झाडे उन्हामुळे << पुरेसे उन येत असेल तर बाटलीच्या तळाकडील बाजूस सुईने एक छिद्र पाडायचे आणि बाटली अर्धी भरीन झाकण व्यवस्थित लावुन कुंडीमधे उभीच ठेवायची. बाटलीवर उन पडल्यामुळे बाटलीच्या आतली हवा प्रसरण पावते आणि त्या दाबाने तळाकडील छिद्रातून पाणि टपकते. ते छिद्र मातीपासुन १ सें.मी उंचीवर घ्यावे.

आमच्या बावधनच्या घराला ३ बालकन्या आहेत

हो का?? छान छान, ह्या "बाल"कन्या शाळेत बिळेत जातात की नै????

३ बालकन्या ? काय नावे आहेत त्या बालकन्यांची Wink

असो.

आता संक्रांत येईल त्यावेळी बाजारात मातीची छोटी भांडी मिळतील (ज्याला सुगड म्हणतात). त्यामधे पाणी घालून कुंड्यांमधे ठेवली असता ते पाणी अगदी हळूहळू खाली झिरपते. गावाला जाताना मातीचे एकच पण मोठे भांडे / दोन लहान भांडी कुंडीत ठेवून जायचे. शिवाय कुंडीखाली जरा खोलगट ताटल्या पाणी भरून ठेवायच्या.

एखाद्या झाडाला याहूनही जास्त पाणी लागणार असेल तर ते मोरी / सिंक मधे पाणी भरलेल्या टबात कुंडी ठेवून त्यात ठेवून जायचे.

साधना हाहा! झाडांसकट जातात का शाळेत?
माधव, बाटली उलटीच का ठेवायची, जर दोन्हीकडून छिद्र असेल तर?
शिवाय, मातीत जर खुपसून बाटली ठेवली तर मुळांना धक्का नाही लागणार का?
बी, विश्वासातील असेल तर मोलकरिण अथवा जवळचे कुणी नाही का एक दिवसाआड पाणई घालू शकणार?

बाटली उलटीच का ठेवायची, जर दोन्हीकडून छिद्र असेल तर? >>> कारण ती बाजू निमुळती असते त्यामुळे झाडाला धक्का न लावता मातीत खुपसता येते. सुलटी ठेवायची झाल्यास आधी तेवढ्या व्यासाचा खड्डा करून घ्याला लागेल, त्याने झाडाची मुळे दुखावू शकतात.

साधना, Rofl

एक उपाय करा...... एक पाण्याची छोटी बादली अथवा बाटल्या वर भिंतींना अडकवुन ठेवा... आणि त्यात एक जाड कॉटन चा धागा बाटल्यांच्या तळापर्यंत पोहचेल इतका आत घाला...... दुसरे टोक...... कुंड्यांमधे सगळीकडे धागा फिरेल असे करा..... जेणे करुन पाणी सर्वत्र पोहचेल.....

आता बाटल्यांमधे पाणी भरुन ठेवल्यावर ते पाणी आपोआप धाग्यांमार्फत खाली असलेल्या कुंड्यांमधे येत राहिल...

साधारण २-३ लिटर पाणी ४-५ दिवस पुरते...

( कुंड्या आणि धागे सावलीतच यायला हवे......अन्यथा उन्हाने लवकर वाळुन जातील आणि खाली पाणी येणार नाही)

जुनी भरणी मातीची जी संक्रातीला वाणातुन दिली जातात ती भरुन कुंडीत बसेल अशि ठेवा. हळूहळू पाणी झिरपेल झाडे वाचतील.
साधना बालकन्या म्हणजे गॅलरी हो.

बालकनी म्हणजे गॅलरी.

आणि

बालकन्या म्हणजे गॅलर्‍या.

बी हॉस्पिटल मधल्या सलाईन्सही लावतात कुंडींमध्ये. पण एकदम स्लो म्हणजे १०-१५ मिनिटांनी एखादा थेंब पडेल अशी व्यवस्था करा. हॉस्पिटलमध्ये फुकट गेलेल्या सलाईन्स तुम्ही मागू शकता.

मी बाहेरगावी जाते तेव्हा माझी कामवाली येऊन पाणी घालून जाते. तुमची कामवाली जर विश्वासू असेल तर घराची चावी शेजारी कोणाकडे तरी ठेऊन तिला येऊन पाणी घालायला सांगता येईल.

वि.सु. शेजार्‍यांकडे निदान तुम्ही नसताना दोन चाव्या ठेवा. कामवाली कधी चुकून एखादी चावी न घेताच दार बंद करून बाहेर पडली तर दुसरी चावी हाताशी असते. स्वानुभवाचा सल्ला.

हे कधीच शक्य होईल असे दिसत नाही. कारण ती एक मोठी सोसायटी आहे. दोन महिन्यात बाईवर काय भरवसा बसणार! आमच्याकडे फक्त फरशी पुसायला एक बाई येते ती तर आम्हालाच चार गोष्टी सुनावून जाते.

बी आमचे समास भारी आहेत की तुमचे व्याकरण भारी आहे??? Rofl

आमच्याकडे फक्त फरशी पुसायला एक बाई येते ती तर आम्हालाच चार गोष्टी सुनावून जाते

आता पुण्यात राहायचे ठरवलेत तर मग बाईलाही चार गोष्टी सुनवायची सवय करुन घ्या.. Happy

>>>बिसलेरी किंवा तत्सम बाटलीच्या झाकणाला भोक पाडून घे. मग त्या बाटलीत पाणी भरून बाटलीला हे झाकण लाव. मग ती बाटली कुंडीत उलटी (झाकण मातीत जाईल अशी) खूपसून ठेव आणि जो भाग वर आहे त्याला टाचणीने छिद्र करून ठेव. अगदी कडकडीत ऊन नसेल तर ३-४ दिवस झाडे मस्त रहातात.<<

+१

उपाय २) दुसरा एक उपाय, टॉवेल पाण्यात भिजवून चारी बाजू (झाडाच्या तळाच्याचार बाजू) लावायचे. त्यावर पातळ प्लॅस्टीकची पिशवी भोकं पाडून पुन्हा तशीच चारी बाजून कवर करायची. २-३ दिवसात मस्त रहातो ओलावा.

एका वर्षाला आम्ही हा प्रकार केलेला. कष्ट आहेत पण झाडं मस्त राहिलीत.
http://www.providentliving.org.nz/bottle-drip-irrigation/

पुण्यात अनेक ठिकाणी प्लास्टिकची झाडं मिळतात. अगदी हुबेहूब नॅचरल असावीत अशी. हात लावून पाहिला तर अगदी खरी असल्याचा फील येतो. तशीच लॉन देखिल मिळते.
कितीही दिवस पाणी घातले नाही तरी तितकीच टवटवीत दिसतात.

माझे वैयक्तिक मत. -
जमत नसेल, जिवंत झाडे पाळू नयेत. पाळलीत, तर त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था नीट करावी. उगं सलाईन लावू नये. अन बेस्ट म्हणजे, आपल्या वागण्याने झाड मेले, तर उगं झाडांवर प्रेम वगैरे टाहो फोडू नये. घरात ५५ ठिकाणी लाकूड वापरलेले आहे आपण Wink

ता.क.
प्लास्टिकची झाडे मरत नाहीत. नो टेन्शन. ग्यालरी तितकीच हिरवी दिसेल. धूळ बसली की अलगद स्प्रे मारून धुवून काढावी. पुन्हा फ्रेश दिसतात.
खालच्या मजल्यावरचे फ्लॅटवाले 'आमच्या वाळत घातलेल्या कपड्यांवर पाणी सांडले' म्हणून भांडायला येणार नाहीत. बावधनचे शिंदे जरा ब्येक्कार अस्तात बर्का Wink

मी बाहेरगावी जाते तेव्हा माझी कामवाली येऊन पाणी घालून जाते. >>>+१
पाणी न मिळाल्यामुळे कोमेजून मरुन मरगळून जातात.>> तुम्ही बाहेर जाताना कुंड्या सोसायटीच्या गार्डनमधे आणून ठेवा/ दाराबाहेर ठेवा आणि शेजार्‍यांना किंवा वॉचमनला त्याचे ड्युटी अवर्स संपल्यानंतर पाणी घालायला सांगा.

बिसलेरी किंवा तत्सम बाटलीच्या झाकणाला भोक पाडून घे. .......+१
बाटलीत पाणी तर ठेवायचेच, पण कुंडीमधे वर दगड ठेवावेत. त्यामुळे झाडांना थंडावा मिळतो.... मी हे भारतात येताना माझ्या हाऊसप्लॅन्ट साठी करते. तिकडची हवा कशी आहे त्यावर हा उपाय लागु पडेल.

पाण्यासाठी बिस्लेरीसारखे उपाय वर आले आहेतच. तसंच अगदी थेट आणि खूप कडक ऊन येत असेल अशा जागी ठेवू नकोस झाडं - निदान तुम्ही नसताना. तीन गॅलर्‍या आहेत म्हणजे एखादी तरी पश्चिमेकडे असेल ना?

अधूनमधून बाहेरगावी जावं लागतं म्हणून प्लॅस्टिकची झाडं ठेवावीत आणि झाडांवर प्रेम असल्याचा दावा करू नये हे अतीच!

तुमच्या कुंड्या मातीच्या असतील तर एक सोपा उपाय आहे. मातीची कुंडी अजून एका मोठ्या कुंडीत ठेवावी.त्यात पाणी घालून ठेवावे.,म्हणजे मातीची कुंडी ते पाणी शोषून घेईल.

अधूनमधून बाहेरगावी जावं लागतं म्हणून प्लॅस्टिकची झाडं ठेवावीत आणि झाडांवर प्रेम असल्याचा दावा करू नये हे अतीच!
<<
Proud
"त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था नीट करावी. अन्यथा, घरात लाकूड, कपाटात पुस्तके (dead tree format) आहेत, याचे भान असू द्यावे," हे माझे म्हणणे जरा अतीच होतेय, हे मान्य.

कुणीही, बिन्धास्त जिवंत जीव पाळावा, अन त्याला घरात कोंडून अधूनमधून बाहेरगावी जावे Wink एकदा दोनदा मेलीत झाडे तर नव्या कुंड्या आणाव्यात. माबोवर धागा काढला, की जबाबदारी संपली. हाकानाका.

नेहेमी जावे लागते, तरी कुंडीत झाडे तर लावणारच.काय करणार! भकास 'दिसते'! व कुणा माणसाला पाणी घालायला सांगायची सोय करा सांगीतलं, तर, 'फरशीपुसवाली दोन शब्द सुनावते.'

असो. हेही जरा अतीच!

बी यांनी व्यवस्थीत प्रश्न विचारला. त्याने खर्‍या निसर्गप्रेमींना गावी जावेच लागले, तर कुंडीतील झाडे जगविण्याचे काही पॉईंटर्स मिळतील हे मुद्दे अध्यहृत आहेत हे मान्य.

मी जरा अतीच केलं हे तर अगदीच मान्य. ते उडवायलाच आलेलो. पण असूच देत आता.

बी, गावाला जाताना झाडे बाल्कनीतून घरात आणून ठेव. तेवढेच ऊन कमी लागेल, बॉटलने पाणी देण्याचा उपाय आमच्याकडे तरी बर्‍याचदा काम करतो. दहा पंधरा दिवस असे घरात ठेवून आणि बिसलेरीच्या दोन दोन लिटरच्या बाटल्यांमधे पाणी भरून आम्ही गेलो आहोत.

लेकीला बालकन्या बद्दल सांगत होते तर तिने कोण बी? आइने अकबरी वाला का? म्हणुन विचारले. ते सगले प्रकरण आठवून हसून हसुन मेले मी. Happy Happy

Pages