जे हवे ते घडायचे नाही

Submitted by वैभव फाटक on 31 December, 2013 - 03:05

जे हवे ते घडायचे नाही
एक नक्की, खचायचे नाही

मिसळणे तू जपून ठरवावे
जर तुला विरघळायचे नाही

कर लबाडी खुशाल जगताना
पण कधी सापडायचे नाही

शेवटी तीच जिंकते बाजी
भांडणे परवडायचे नाही

तू नको अवतरूस भगवंता
सूत अपुले जुळायचे नाही

धाक आहे जबाबदाऱ्यांचा
दु:ख माझे झरायचे नाही

वैभव फाटक ( ३१ डिसेंबर २०१३)

http://vaibhavphatak12.blogspot.in/2013/12/blog-post.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तू नको अवतरूस भगवंता
सूत अपुले जुळायचे नाही<<< ताजा खयाल, सुलभ मांडणी, शांतपणे मारलेला पंच! असे शेर गझलेला गझल बनवतात.

धाक आहे जबाबदाऱ्यांचा
दु:ख माझे झरायचे नाही<<< उत्तम!!

जे हवे ते घडायचे नाही
एक नक्की, खचायचे नाही

तू नको अवतरूस भगवंता
सूत अपुले जुळायचे नाही
धाक आहे जबाबदाऱ्यांचा
दु:ख माझे झरायचे नाही>>>>>>>> मस्त द्विपदी

मिसळणे तू जपून ठरवावे
जर तुला विरघळायचे नाही

धाक आहे जबाबदाऱ्यांचा
दु:ख माझे झरायचे नाही

व्वा !
छान आहे गझल.

क्या बात है !क्या बात है !क्या बात है !क्या बात है !क्या बात है !क्या बात है !क्या बात है !क्या बात है !क्या बात है !क्या बात है !क्या बात है !क्या बात है !क्या बात है !क्या बात है !क्या बात है !क्या बात है !क्या बात है !क्या बात है !

कर लबाडी खुशाल जगताना
पण कधी सापडायचे नाही

तू नको अवतरूस भगवंता
सूत अपुले जुळायचे नाही >>> हे दोन सर्वात छान.