हसवा रे...

Submitted by पल्ली on 30 December, 2013 - 09:07

कुणीतरी मजला हसवा रे
फसवे तरीही हसवा रे
फसले आहे जरी कितीदा
चला जरासे विसरु दे..
सावलीच्या आधारा गेले
उन्हात वणवण फिरते आहे
सावल्या उतरल्या उन्हही गेले
अता जरासे विझवा रे....
गुंफले हात गुंफली बोटे
फिरुनी सारखे पुन्हा एकटे
थकले आहे शिणले आहे
अता जरासे निजवा रे...
कुणीतरी मजला हसवा रे...
कुणीतरी?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शब्द स्तब्ध प्रतिबिंब आभासे; संरचना कांचेचे झुंबर
उलाल रेषा अगतिक निष्फळ जुळवू पाहे समान अंतर..........................

नववर्षाच्या हसर्‍या शुभेच्छा................ कीप स्माइलिंग..... Happy