तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी राहण्याची माहिती

Submitted by आरती. on 30 December, 2013 - 04:24

तिर्थक्षेत्रांसाठी एक धागा असावा अस वाटल म्हणून हा धागा उघडला आहे. मी एक महिना सर्च करून खालील माहिती /फोन नंबर्स गोळा केले. पंढरपूर राहण्यासाठी चांगल नाही हेच प्रत्येकजण सांगत होत पण ते चुकीच ठरल.

आम्ही तिर्थयात्रेला गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर व पंढरपूरला गेलो होतो.

गांणगापूर रेल्वे स्टेशनला सकाळी ८ वाजता पोहचलो. तिथे ६ सीटर री़क्षा मिळाली. त्यांनी ३०० रु. घेतले मंदिरापर्यंत सोडायचे. सीटवर गेल तर प्रत्येकी ३० रु. सांगितले आणि १२ माणस एका रीक्षात कोंबतात. दत्त मंदिराकडे पोहचायला आम्हाला १ तास लागला. रस्ते खूपच खराब होते.
मंदिरातील दत्त स्वामी ह्यांनी मंदिराच्या बाजूला असलेल्या धर्मशाळेत सोय करून दिली. एका दिवसाचे भाड २०० रु. आहे आणि गरम पाण्याची एक बादली प्रत्येकी २०रु.ला रुमवर आणून देतात. रुम्स स्वच्छ नव्हत्या पण आम्हाला फक्त काही तासांसाठी रूम हवी होती आणि मंदिराजवळ म्हणून घेतली. मंदिरात दर्शन करुन संगमावर गेलो तिथे जाण्यासाठी ६ सिटर रीक्षा मिळाली त्यांनी १००रु. घेतले जाऊन परत मंदिराकडे सोडायचे.
दत्त स्वामींना जेवण कुठे चांगल मिळेल विचारल असता मंदिरात जेवणाची सोय आहे पण १ वाजेपर्यंत चालू होत. आम्हाला वेळ कमी असल्यामूळे त्यांनी मंदिराकडे जाताना मेडीकल स्टोअरच्या समोर एक हॉटेल आहे तिथे जेवून घ्या. घरगुती जेवण मिळेल. कानडी पद्धतीच जेवण होत त्यामूळे आम्ही पोटभर जेवून घेतल. Happy
थोडावेळ रूमवर आराम करून ३ वाजता परत ६ सीटर री़क्षाने गाणगापूर स्टेशनला आलो. तिथून चेन्नई मेलने अक्कलकोटला गेलो.

अक्कलकोट स्टेशनवरून बसने अक्कल कोट डेपो आणि तिथून परत ३ सीटर रीक्षाने मंदिराजवळ गेलो. जायच्या एक दिवस अगोदर तेथील यात्री निवासचा नंबर मिळाला जे अन्नछत्रच्या बाजूला आहे. खूप दमलो होतो म्हणून त्या दिवशी बाहेरच जेवण केल. अन्नछत्रजवळच होत पण खूप लाईन होती म्हणून दुसर्‍या दिवशी प्रसाद घ्यायचा अस ठरवल.

अक्कलकोटच्या यात्रीनिवासमध्ये एसी आणि नॉन एसी रुम्स उपलब्ध आहेत. एसी रुम्सच भाड ८५०रु आणि नॉन एसी रुम्सच भाड ५०० रु. आहे. यात्रीनिवासच्या रुम्स स्वच्छ आहेत तसेच प्रत्येक रूममध्ये गरम पाण्याची सोय आहे. सकाळी ४.३० ते ७ पर्यंत गरम पाणी असत. आणि बरोबर पहाटे ४.३० ला प्रत्येक रूमचा दरवाजा दोन - तीन वेळा येऊन ठोठावून सांगतात गरम पाणी चालू झाल चेक करा. पहाटे ५.०० वाजता काकड आरती असते पण आम्ही नाही गेलो. खूप दमल्यामूळे आम्ही उशीराच उठलो. १०.०० वाजता दर्शन करून अन्नछत्रमध्ये प्रसाद घेतला. मंदिरात जातानाच ओमनी बुक केली. त्यांनी तुळजापूर आणि पंढरपूरला ड्रॉपचे २००० रु घेतले. दुपारी ३ वाजता कारने स्वामींच्या समाधीकडे गेलो आणि तिथून तुळजापूरला रवाना झालो. तुळजापूरला दर्शन करून पंढरपूरकडे गाडी वळली. वाटेत सोलापूर पूणे हायवेला जंगली हॉटेल लागत तेथून रात्रीच्या जेवणाच पार्सल घेतल. धन्यवाद मा.बो. सोलापूरकर्स Happy

इस्कॉर्न मंदिरात रुम बुक करताना त्यांनी किती वाजता येणार विचारल होत तेव्हा मी संध्याकाळचे ६.३० वाजतील अस सांगितल पण आम्ही ६.३० ला पोहचलो नाही तेव्हा त्यांनी बरोबर ६.३० ला फोन करून विचारल किती वाजेपर्यंत येणार आणि मी त्यांना सांगितल की ८- ८.३० होतील त्यांनी सांगितल काही काळजी करु नका आम्ही वाट पाहू. त्यांची सेवा पाहून खूपच छान वाटल.पंढरपूरला इस्कॉन मंदिरात रात्री ८ वाजता पोहचलो. इथे एका दिवसाच भाड ५००रु. आहे. इस्कॉन मंदिर चन्द्रभागा नदीकिनारी आहे. मंदिरात राहायची व्यवस्था खूप छान आहे. आजूबाजूचा परीसर पण खूप सुंदर आहे. भरपूर नारळाची झाड आहेत. खूप क्लिन रुम्स आहेत. गरम पाणीसाठी मजल्यावर एक नळ दिला होता.तिथून घ्याव लागल. मंदिरात सकाळी ९ आणि दुपारी ४ वाजता प्रसाद देतात. पण कुणी अवेळी आल तर त्यांना प्रसाद दिला जातो, आग्रहाने प्रसादासाठी विचारल जात. पहाटे ४.३० ला हरे कॄष्णाची आरती सुरु होते. दुसर्‍या दिवशी सकाळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गेलो. आणि दुपारी पंढरपूरवरुन सोलापूरकडे रवाना झालो. सर्वात जास्त आम्हाला इस्कॉन मंदिरात खूप आवडल. तिथे आम्ही परत जायच ठरवल. मस्त ३-४ दिवस फक्त तिकडे राहायला सही आहे.

त्यांचे गो प्रॉडक्टसपण खूप चांगले आहेत. वेळे अभावी काही घेता नाही आल. गाईच तूप ८००रु किलो आहे पण खूपच चांगल आहे. बंगलोरातील आमच्या गाईची आठवण झाली तेथील गो शाळा पाहून. Sad

साई दत्त स्वामी : ०९९१६४६३६४७ ह्यांनी दत्त मंदिराच्या समोर असलेल्या धर्मशाळेत व्यवस्था केली.
बुकिंगसाठी इस्कॉन मंदिराचा नंबर - ०२१८६ - २६७२४२ / ०९१७५०४१४६२
बुकिंगसाठी अक्कलकोट यात्री निवास नंबर - ०२१८१ - २२२५८७
अक्कलकोट ड्रायव्हर पवार ह्यांचा नंबर - ९१५८८४३६४५

http://www.vitthalrukminimandir.org ह्या साईटचा बोर्ड विठठल रुक्मिणी मंदिराबाहेर पाहिला. खूप उपयोगी साईट आहे.
http://www.ganagapurdatta.com
http://srikshetraganagapur.com
गाणगापूरला जर तुम्हाला एक - दोन दिवस राहायच असेल तर वरील दोन साईटचा उपयोग होईल.

कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर
http://www.mahalaxmikolhapur.com आणि प्रकाश लॉजिंग आणि बोर्डींग महालक्ष्मी मंदिराच्या समोरच आहे. रुमच्या बाल्कनीतून मंदिर दिसत खूप छान वाटत.
प्रकाश लॉजिंग आणि बोर्डींग - + 91 - 231 - 2547494

अन्जू
अंबेजोगाई येथे हॉटेल 'कृष्णाई' परळी रोडवर आहे. फोन नं. ०२४४६- २४५२६६, २४७६०६. त्यांची वेबसाईट आहे.www.hotelkrushnai.com

Srd
१. गोंदवलेत राहाण्याची (+जेवण्याची) नि:शुल्क व्यवस्था संस्थानाचीच आहे .भरपूर खोल्या आहेत .तीन दिवस राहाता येते .(बाफ http://www.maayboli.com/node/46258 )

२. ओंकारेश्वर -खांडवा(५५०किमी मुंबई) येथे उतरून नैरोगेज रेल्वे अथवा बसने पन्नास किमी .
पुढे इंदुरचे महांकाळेश्वर
व्हाया माहेश्वर.(४०+८०किमी)
उजैन आणखी चाळीस किमी आहे .उजैन सप्तपुरींपैकी एक आहे .पन्नास रुपयात उजैन दर्शन सहल असते .क्षिप्रा नदी भात्र आता 'तीर्थ' राहिली नाही .मंगळाचे देऊळ खास आहे .
या ८०किमी च्या परिसरांत खूप हॉटेल्स आणि धर्मशाळा आहेत .पुण्य गोळा करण्यास भरपूर वाव आहे .नर्मदा दर्शन .

३. गोकर्ण -
कोकण रेल्वेने .रम्य ठिकाण
समुद्रकिनारा .

४. अंबाजी -
राजस्थान सहलीत माउंट
अबू शेवटचे ठिकाण असेल तर अंबाजीला जाऊन संध्याकाळची पाचची अवंतिका इक्सप्रेस आरामात मिळते .एसी तिकीट असल्यास अबूरोड स्टेशनची मडक्यातली रबडी आणता येते .

इंद्रधनुष्य

नृसिंहवाडीला एस्टी डेपो समोर हॉटेल गुरुदत्त मधे AC, Non AC, Dormitory ची चांगली सोय आहे.

पंढरपुरला गजानन महाराज संस्थानात रहाण्याची चांगली सोय होते.

तिरुपती बालाजी
http://www.tirumala.org/acco_tpt.htm

श्रीशैलमला पाताळेश्वर आणि चंदेश्वर सदन मंदिरा जवळ आहेत.
http://srisailamtemple.com/Srisaila_devasthanam/accommodation.html

गमभन
शिर्डी संस्थानाच्या भक्तनिवासातील खोल्या ऑनलाईन देखील बुक करता येतात.

https://online.sai.org.in/landingPage.do

माबोकरानो बाकिच्या तिर्थ़क्षेत्रांच्या ठिकाणी राहण्याच्या व्यवस्थेबद्द्ल तुम्हाला काही माहिती असेल तर इथे नक्की शेअर करा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्हाला मुंबईहून गरुडेश्वर आणि नारेश्वर येथे जायचे आहे. रेल्वेने बडोदा, भरुच आणि अंकलेश्वर पर्यंत जाऊन तिथुन बसने जायचा प्लान आहे.

या तिन्ही ठिकाणांहून गरुडेश्वर जवळजवळ ८०-१०० किमी आहे. बडोदा, भरुच किंवा अंकलेश्वर यापैकी कोणत्या ठिकाणापासुन बस कनेक्टिविटी चांगली आहे? तिथे राहण्याची, जेवण्याची सोय कशी आहे?
गरुडेश्वर्/नारेश्वर याखेरीज जवळपासची इतर कोणती स्थळे पाहता येतील का?

शेगाव ( गजानन महाराज ) ता.खामगाव जिल्हा बुलढाणा हे अत्यंत प्रसिध्द देवस्थान आहे. शेगावचे गजानन महाराज संस्थान यात्रेकरुंच्या सोयीसुवीधा साठी प्रसिध्द आहे.

यात्रेकरुंना उतरण्यासाठी भक्तनिवास १ ते ६ मंदिराच्या जवळ आहेत. नियमाप्रमाणे आधी बुकिंगची सोय नाही पण वेळ असेल आणि कालावधी सोयीचा असेल ( गुरुवार, महाराजांचा प्रकट दिन - माघ वद्य सप्तमी, समाधीचा दिवस - भाद्रपद शुध्द पंचमी ) सोडुन तर या सहाही भक्त निवासात अल्प किमतीत रहाण्याची सोय उत्तम आहे.

भक्त निवासाची सोयी प्रमाणे वर्ग वारी आहे. एसी पासुन अत्यंत साध्या पण स्वच्छ निवास व्यवस्था हे रोल मॉडेल आहे. ( काही नियम आहेत. सोबत फोटो आयडि प्रत्येकाचा आवश्यक )

हे ६ भक्त निवास उपलब्ध नसतील तर आनंद विहार या ठिकाणी आणखी सोय आहे. स्वतःच्या वहानाने गेल्यास आनंद विहार सोयीचे जास्त वाटते.

या सर्व ठिकाणी भोजनाची अल्प किमतीत सोय आहे. पाणि बिसलरीच हव असेल तर फक्त ८ रुपये किमतीत उपलब्ध आहे. संस्थान पाणी विक्रीत किंवा कशातही नफा अपेक्षीत ठेवत नाही.

तुम्ही एस.टी. ने उतरा किंवा रेल्वेने शेगावला उतरा, तेथुन मंदीरात जाण्यासाठी बसची व्यवस्था कोणत्याही आकाराशिवाय आहे.

मंदिरातल्या दर्शन रांगा व त्यातल्या सुविधा हा एक स्वतंत्र विषय आहे. अनुभव जरुर घ्यावा.

आनंद सागर हे अध्यात्मिक सहलीचे ठिकाण अवर्णनीय आहे. एकदा मंदीरात केलेली पावती जपुन ठेवली तर इथे आणखी कोणती फी द्यावी लागत नाही. मुलांसाठी बाबागाडी, छत्र्या, अल्प किमतीत भोजन, अल्पोपहार, चहा - कॉफी इ ची व्यवस्था आणि कोणताही सेवा मोबदला न घेता सेवा करणारे सेवेकरी म्हणजे महाराजांच्या चमत्काराच्या यादीतला आणखी एक चमत्कारच म्हणावा लागेल.

आपण दिलेल्या दानाचा प्र्त्येक रुपया सत्कारणी लागेल इतकी सेवा कार्ये आहेत.

आपल्याला फक्त दर्शन घेउन परतायचे असेल तर सामान ठेवण्यासाठी लॉकर्स, पारायणाच्या हॉलमधे विवीध नंबरचे वाचण्याचे चष्मे सुध्दा ( जर विसरला असाल ) तर उपलब्ध्द आहेत.

पुर्वी लोक फुले वहायचे, आता संस्थानने त्यावर सुध्दा बंदी आणुन समाधी स्थळी होणारा अनावश्यक कचरा टाळला आहे. आपण जर खुपच घाईत असाल तर काचेतुन समाधीस्थलाचे दर्शनाची सोय आहे.

१५ रुपयांची संस्थानची पावती घेतली तर अभिषेकाचे गुरुजी आपल्याकडुन कोणतीही अन्य दक्षीणा घेत नाहीत.

श्री गजानान महाराज की जय !

जानेवारी महिन्यात आम्ही इंदूर ओंकरेश्वर उज्जैन ला गेलो. ओंकरेश्वरला गजानन महराज भक्त निवास इथे रहाण्याची उत्तम सोय आहे. एक हजार रुपायात चार जणांसाठी ए. सी. खोली मिळ्ते. जेवण, ब्रेकफास्ट, चहा वैगेरे रास्त दरात मिळते. सोय स्वच्छता आणि सोंदर्य यांचा सुन्दर मिलाफ. हे भक्त निवास म्हणजे एखादे रिसो र्टच वाटते. आगाऊ बुकिन्ग होत नाही पण खोल्या मिळ्तात. खाली काही फोटो देत आहे कल्प्ना येण्यासाठी.
१) From indore
२)डायनिंग हॉल
From indore
३) गजानन महाराज मन्दिर
>From indore
४) ही कचरा कुंडी बघा म्हणजे कल्पना येइल.
From indore

५)
From indore

६) ग.म. मन्दिर
From indore

७) परिसर
From indore

८) परिसर
From indore

१)भिमाशंकर
या क्षेत्राला बरेच जण अष्टविनायक दर्शन यात्रेत भेट देतात परंतु तिकडे
थोडी (जास्तच)गैरसोय सोसून राहिलात तर फारच छान ठिकाण आहे .पावसाळ्यातली
मजा वेगळी असते. (एमटिडीसी बारा वर्षांपूर्वीच बंद झाले)

२)सोलापूरहून बदामी येथे गेल्यास (११४२३ इक्सप्रेस) पाच किमी वर बनशंकरी हे
आठव्या शतकातले शाकांबरीचे देऊळ आहे .देवळाचा तलाव आणि रथ ( पौष शु ८ ते
१५) पाहाण्यासारखे आहेत .बदामीला छान हॉटेल्स आहेत कारण ऐतिहासिक स्थळ आहे .

हा धागा "प्रवासाचे अनुभव" या ग्रूपमधे हलवला आहे.

हे सगळे अनुभव एकाच धाग्यावर लिहण्यापेक्षा प्रत्येक क्षेत्रासाठी वेगळा धागा सुरु करा म्हणजे इतरांना शोधणे सोपे जाईल.

बहुतेक वेळेस आपण तीर्थक्षेत्रांना भेट देतांना इतर प्रेक्षणीय स्थळांनाही भेट देतो. प्रवासाची साधनेही बर्‍याचदा सारखीच असतात त्यामुळे हा धागा "प्रवासाचे अनुभव" या ग्रूपमधे जास्त योग्य आहे.

वाहवा........ अतिशय छान उपक्रम
मला अक्कलकोट ला भक्त निवास नेमके कुठे आहे ते सांगाल का
मला यात्री निवास चा अनुभव आहे यात्री निवास खर्चिक आहे रु ६००/- पर रूम
गर्दीच्या दिवशी जाऊ नका रूम मिळणं अवघड होते जेवण त्याहून आणि एसटीत जागा मिळणे त्याहून अवघड

>>>गर्दीच्या दिवशी जाऊ नका रूम मिळणं अवघड होते जेवण त्याहून आणि एसटीत जागा मिळणे त्याहून अवघड>>>
हे सर्वच ठिकाणांना लागू आहे. शिवाय धार्मिक ठिकाणी भाविकतेच्या चष्म्यातून पाहिल्याने अस्वच्छता दिसत नाही. उदाहरणार्थ: उज्जैन, नाशिक पंचवटी, त्र्यंबकेश्वर.

गर्दीच्या दिवशी जाऊ नका >>>>>>>
धार्मिक ठिकाणी जाऊच नका (कचरा, गर्दी, अस्वच्छता) ... जिथे देव सगळीकडेच आहे तर तो भेटायला धर्मस्थळी का जावे लागते?

गर्दीच्या दिवशी जाऊ नका >>>>>>>
धार्मिक ठिकाणी जाऊच नका (कचरा, गर्दी, अस्वच्छता) ... जिथे देव सगळीकडेच आहे तर तो भेटायला धर्मस्थळी का जावे लागते?

बरोबर आहे जे पिंडी ते ब्रह्मांडी

Pages