Submitted by निशिकांत on 29 December, 2013 - 23:49
वावडे का या जगाला वास्तवाचे?
माजले का स्तोम इतके नाटकाचे?
घ्यावया शहरातले चौरसफुटाचे,
फुंकले खेड्यातले घर अंगणाचे
आव जो तो आणतो चांगुलपणाचा
मुल्य आकाशास भिडले मुखवट्यांचे
मातला अंधार इतका भोवताली
तेज थोडे म्लान झाले भास्कराचे
बालपण चिमटीतुनी निसटून जाता
वेदनामय पर्व आले आठवांचे
वादळे झेलीत जगल्याने कदाचित्
भय अताशा राहिले ना काहुराचे
हास्य उत्सव साजरा करण्यास मिटले,
जीवना! संदर्भ सारे वेदनांचे
चेहरा डागाळला अपुलाच असता
का उगा तुकडे करावे आरशाचे?
वाटले "निशिकांत" जे अपुले तुला ते
सज्ज झाले वार करण्या खंजिराचे
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घ्यावया शहरातले
घ्यावया शहरातले चौरसफुटाचे,
फुंकले खेड्यातले घर अंगणाचे
वादळे झेलीत जगल्याने कदाचित्
भय अताशा राहिले ना काहुराचे
चेहरा डागाळला अपुलाच असता
का उगा तुकडे करावे आरशाचे?<<<
आवडले.
वावडे का या जगाला
वावडे का या जगाला वास्तवाचे?
माजले का स्तोम इतके नाटकाचे?
घ्यावया शहरातले चौरसफुटाचे,
फुंकले खेड्यातले घर अंगणाचे
व्वा.
छानच. अंगणाचे हा शेर फार
छानच.
अंगणाचे हा शेर फार आवडला
>>> घ्यावया शहरातले
>>>
घ्यावया शहरातले चौरसफुटाचे,
फुंकले खेड्यातले घर अंगणाचे >>>>
खूप बोचला हा शेर....
धन्यवाद
सर...
काका ..अनेक शेर आणि सर्वच
काका ..अनेक शेर आणि सर्वच खयाल आवडले पहिले दोन सर्वाधिक आवडले काहुराचे हा शेरही खूप आवडला
पण आठवांचे हा शेर मला जास्त विचारात पाडून गेला तिथे एकाच शेरात २-३ बदल हवे आहेत असे वाटले
पण असो..
मला एक विचारायचे आहे की मतल्यानुसार आणि हुस्ने मतलाही ..अलामत आ असल्याचे आणि न बदलणारे अक्षर 'चे' असल्याचे लक्षात आले मग मुखवट्यांचे आठवांचे आणि वेदनांचे हे काफिये चालतात का ?...मला नाही वाटत की चालत असतील म्हणून ..(ह्या मुद्द्यावर ज्याना ज्याना मत द्यावेसे वाटेल त्यांनी अवश्य द्यावे ही विनंती )
धन्यवाद
ह्या काफियांत अलामत भंग होते
ह्या काफियांत अलामत भंग होते वैभव!
सुंदर मक्ता खास
सुंदर
मक्ता खास
जर मतल्यात तशी सुट घेतली
जर मतल्यात तशी सुट घेतली गेली तर पुढच्या शेरात चालू शकेल असे वाटते.
काहुराचे,आठवांचे, आरशाचे,अंगणाचे वा वा सुंदर शेर काका.
-सुप्रिया.
सुप्रिया, 'आ' आणि 'आं' अशी
सुप्रिया,
'आ' आणि 'आं' अशी अलामत भंगाची सुट मतल्यात घेता येत नाही.
धन्यवाद सर @सुप्रियातै माझेही
धन्यवाद सर
@सुप्रियातै माझेही हेच म्हणणे आहे की चालणार नाही म्हणून
...कारण ....कणखरजींनी दिलेच आहे तेच
माझ्यासंगे सांगतसे, तेरावे
माझ्यासंगे सांगतसे, तेरावे वर्ष सुखाने,
चौदावे हि मजेत जावो, तुम्हास आनंदाने.
येणार्या नवीन वर्षाच्या मायबोलीकरांना शुभेच्छा
माझ्या वाचनात अशा गझल आल्या
माझ्या वाचनात अशा गझल आल्या होत्या मागे नेमका संदर्भ आठवत नाही
धन्स विदिपा.
-सुप्रिया.