थोडं कधी हसावं

Submitted by स्वाकु on 28 December, 2013 - 11:57

थोडं कधी हसावं
थोडं कधी रडावं

जर टाळले फुलांनी
काट्यांस का जपावं

मरण्यास वाव होता
मग वाटले जगावं

कोमेजताच कळले
थोडं अता फुलावं

मी हा असाच वेडा
सोसूनही खुलावं

स्वानंद यात होता
दु:खातही झुलावं

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टाळले(शेर २रा) वाटले(शेर ३ रा) आणि कळले (४था शेर) हे शब्द गझलेतल्या शब्दकळेशी मॅच होत नाहीयेत
काट्यांस हा शब्दही तसाच.. फिट न बसणारा
(हे माझे मत वैयक्तिक आहे )

थोडं कधी हसावं
थोडं कधी रडावं >>>>>> ओढून ताणून दीर्घ लिहिण्यापेक्षा दीर्घच लिहा की! हसावे, रडावे असे!

बाकी गझल छान आहे.

" वैभवजी " व " मै शायर बदनाम ". तुम्हा दोघांचे आभार.

अजुनही जे सुचतं तेच लिहीतो. पण सुचलेल्या ओळींवर अभ्यासपूर्ण लक्ष देऊन त्या ओळींना पैलू पाडून गझलेचे स्वरूप देणे जमत नाही आहे.

मनापासून प्रयत्न चालू आहेतच... पण माझ्या चुकांना सांभाळून घ्या आणि स्पष्ट अभिप्राय देत रहा हीच विनंती आहे.