पोळी-भाजी केंद्रे

Submitted by स्वाती२ on 27 December, 2013 - 10:02

आजकाल बर्‍याचदा आपल्याला बाहेरच्या जेवणाची गरज भासते. कधी अचानक बाई रजेवर जाते, कधी आजारपण+ पाहुणे मंडळी असे होते. कधी कामाच्या वेळा सोईच्या नसतात. हॉटेलातले चमचमीत खाणे एक-दोन दिवस चालतेही. पण रोजच्या पोळी भाजीची सर त्याला नाही. अशावेळी मदतीला येते ते पोळीभाजी केंद्र. तुमच्या भागातील चांगल्या पोळीभाजी केंद्रांची माहिती या धाग्यावर दिलीत तर गरज पडल्यास खात्रीचे केंद्र शोधायला उपयोग होईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पार्ल्यात रानडे म्हणून आहेत. घरपोच डबा ८० रूपये. त्यांच्याकडून घेऊन गेलं तर ७५.
आम्ही बर्‍याचदा सांगतो तो डबा. भाताऐवजी आम्ही पोळ्याच घेतो त्यामुळे ६ पोळ्या, भाजी आणि आमटी असे येते. ते भरपूर असते. एक्स्ट्रॉ पोळ्या घेतल्या की आम्हाला दोघांना सकाळ व रात्र दोन्ही जेवणांना पुरते.

नवी मुंबई - ऐरोली: दिवा सर्कल ( मुलुंड-ऐरोली उडाणपूल संपतो तिथे ) - किनेकर पोळी भाजी केंद्र
एक दोन दुकाने सोडून त्याच नावाचे दुसरे एक आहे. मुंलुंडावरून ऐरोलीला जाताना उजव्या हाताला. पोळी, भाजी, पराठा, पातळ भाजी, भात, चटणी तिथेच बसूनही खाता येते किंवा घेऊन जाता येते. दर्जा, स्वच्छता चांगली होती. (किंवा भुकेच्या तडाख्यात चांगली वाटली. Lol )

मुलुन्ड वेस्ट सरोजिनी नाय्डू रोड वर स्टेशनच्या जवळ

मातृछाया मेसः ७०४५५११२२३

काल गेले तर त्या बाईंनी दुसृया एका ग्राहकाने सांगितले म्हणून आयत्यावेळी बटाट्याची भजी पण बनवून दिली.

स्नेहमयी, मी मागच्या पानावर लिहिलेलं त्याबद्दल- मुलुंड ईस्ट साईडला उतरून स्टेशनपासून सरळ चालत गेलात तर पाचेक मिनिटांनी हरीओम म्हणून फरसाण, स्नॅक्सचं दुकान लागेल. त्याच्या ऑपोझिट साईडला जोशी फरसाण आहे. त्यांच्याकडे चौकशी करा डब्याची.

Pages