डिलीट झालेल्या फाइल्स रीकवरी साठी मदत हवी आहे.

Submitted by निवांत पाटील on 23 December, 2013 - 00:51

शनिवारी थोड्याशा गडबडीत एक मोठी चुक झाली. Happy
एका डेस्क्टॉप्च्या डेस्कटॉप वर एक फोल्डर होता. त्यात गेल्या महिनाभरात क्रियेट केलेल्या ८ ते १० एक्स्सेल फाइल्स होत्या. त्याला ड्रॉपबॉक्स मध्ये शेअर करुया असा विचार करुन त्या डेस्कटॉप वर ड्रॉपबॉक्स इन्स्टॉल केला. तो कॉम्प माझा नसल्यामुळे फक्त एक फोल्डर सिन्क्रोनाइज करायचा होता जेणेकरुन मी त्या फाइल्स त्या ऑफिसबाहेरुन अपडेट करु शकेन आणि तेथे बाकिच्या लोकांना अ‍ॅक्सेस करता येइल असा प्लॅन होता. ( नमन पुर्ण)

सगळे झाल्यावर ड्रॉप बॉक्स चा फोल्डर डेक्सटॉप वर ठेवला, माझा तो फोल्डर त्या फोल्डर मध्ये ड्रॅग केला. डाटा कॉपी होत असतानाच , एकदम लक्षात आले कि पहिल्यांना फाइल्स सॉर्ट आउट करु. म्हणुन कॉपी कॅन्सल केले आणि ड्रॉप बॉक्स मधील तो फोल्डर सवयीप्रमाणे शिफ्ट डिलीट मारला. Sad

आता अगोदरचा फोल्डर कंप्लेट रिकामा आणि ड्रॉप बॉक्स पण रिकामा.

कुठेतरी वाचल्याचे आठवले, कट पेस्ट करताना लाइट गेले कि डाटा असाच गायब होतो.

मग बरेच सॉफ्टवेअर डाउन लोड करुन झाले. पण ते थोडे कॉस्टली वाटले कारण ते मशिन स्पेसिफिक आहेत. ६० $ फॉर १ इअर फॉर सेम मशिन. (त्या सॉफ्टवेअर मध्ये त्या फाइल्स दिसतात.) ( त्यात तो कॉम्प माझा नाहिय). पॅन्डोरा गेले दोन दिवस फक्त कलेक्टींग डाटा वर अडुन आहे.

कृपया कुणाला यावर उत्तर माहित असेल तर मदत करा.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सदानंद, मला आता फक्त २ एस्केल फाइल्स पाहिजे आहेत आता, लेस दॅन १०० केबीच्या. फक्त त्यातील एका फाइल मध्ये मॅक्रोज डेव्हलप केली असल्यामुळे हवी आहे. Happy

नही हो अजुन. EaseUS वापरले पण ४ दिवस कॉम्प सुरु ठेवावा लागला तरी काही झाले नाही. काहि सॉफ्टवेअरनी फाइल्स रिकवर केल्या पण सगळ्या करप्ट आहेत.

तुमच्या कडे आहे का काही?

जर डिलीट झालेल्या फाईल्सवर दुसऱ्या नवीन फाईल्स लिहिल्या गेल्या तर जुन्या फाईल्स मिळवणं अधिकाधिक कठीण होत जाईल. लिनक्स ची लाइव बूटेबल सीडी वापरून रिकवरी चा प्रयत्न करून बघा.

http://www.howtogeek.com/howto/15761/recover-data-like-a-forensics-exper...

http://www.techrepublic.com/blog/10-things/10-linux-rescue-tools-for-rec...

टग्या, धन्यवाद... हे पण करुन बघतो. आता तर त्या फाइल्स परत तयार करायच्या मानसिकतेत आहे. पण ट्राय करुन बघतो. नंतर कधीतरी उपयोगी पडेल. Happy

Pages